आकाशकंदील - बांबूच्या चोयट्यांपासून

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

बांबूच्या चोयट्यांपासून करायच्या चौकोनी आकाश कंदीलाची कृती...
१८ इंच लांबीच्या बांबूच्या चार चोयट्या.. १० इंच लांबीच्या बांबूच्या ३२ चोयट्या.. निरनिराळ्या रंगाचा पतंगाचा कागद, फेव्हीकोल आणि भरपूर दोरा,
सगळ्या चोयट्या छोट्या सुरीने किंवा खोरपेपरने साफ करुन घ्याव्यात.
१८ इंची चोयट्या उभ्या वापरायच्या आहेत तर १० इंची आडव्या...
प्रत्येक कोपर्‍यापाशी तीन किंवा चार काड्या एकत्र येणार आहेत.
पहिल्यांदा १० इंच लांबीच्या चोयट्या वापरुन चार चौरस तयार करुन घ्यावेत. ह्या चौरसांच्या एका कोपर्‍यात एक १८ इंची काडी लावायची आहेत... अश्या चार कोपर्‍यात चार काड्या एका चौकोनाला लावाव्यात.

kandil 1.JPG
आकृती १

kandil 2.JPG
आकृती २
अश्याप्रकारे आकृती २ मध्ये दाखविल्या प्रमाणे चारही चौरस लावावेत.
kandil 3.JPG
आकृती ३
त्यानंतर उरलेल्या चोयट्या आकृती ३ मध्ये दाखविल्या प्रमाणे चारही बाजूंना लावायच्या आहेत. आकृतीत तितकेसे स्पष्ट नाही परंतू जो कोन तयार होतो त्याचे टोक बर्‍यापैकी बाहेर आलेले असते.

त्या लावल्यावर मूळ साचा तयार होईल...
नंतर सजावट... पतंगाचा कागद वापरून हवी तशी सजावट करता येईल.

हा तयार झालेला सांगाडा...

DSC09693_1.JPG

आणि हा सजावट केलेला आकाशकंदील..

DSC09714_1.JPGDSC09716_1.JPG

आणि सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा....

DSC09718_1.JPG
रांगोळी नेहमीप्रमाणेच मनाकु१९३० ह्यांनी काढलेली...

विषय: 
प्रकार: 

यावर्षीच्या कंदीलासाठी उपयुक्त धागा.
बांबूच्या चोयट्या.. >>> फोटो टाका ना.. आणी पुण्यात कुठे मिळतील, साधारण किंमत कितीअ सेल तेही सांगा Happy

वर्षा...
पुण्यात मंडईच्या मागच्या बाजूस आहे बुरुड आळी... त्यांच्याकडे ह्या आकाशकंदीलाचे सामान म्हणूनच मिळतील चोयट्या.. तश्याच ठेवलेल्या असतात. मला पुण्यात तरी ३० रुपयाला सगळा सेट असा रेट सांगितला होता...

वॉव Proud

हिम्या- एक सोपी, सोपी, सुपर सोपी, ३-४ वर्षाच्या मुलीसाठी आणि तिच्या हस्तकलाचॅलेंज्ड आईसाठी सोप्या कंदिलासाठी कृती सांग ना.

ए फोटो टाक ना. मग मी २ वर्षापूर्वी केलेल्या आकाशकंदीलाच्या फोटोचा झब्बू देईन.

भारीचे हे.. Happy

रैना : घोटिव कागदचि चटई करुन घ्ययचि आणि त्याचा सिलेंडर शेप करुन घ्यायच.. खालच्या बाजुला झिर्मिळ्या आणि वर टांगयला दोरा लावायचा.. Happy

रैनातै, घोटीव कागद म्हणजे एका बाजूला गुळगुळीत रंगीत आणि दुसर्‍या बाजूला पांढरा पण थोडासा खरखरीत कागद... ओरिगामीला वापरला जातो बर्‍याचदा दोन रंगाचा असल्यामुळे..

रैना घोटीव कागद म्हणजे गुळगुळित रंगित कागद मिळतो ना तो. (एका बाजूने रंगित आणि एका बाजूने पांढरा असतो तो कागद).
क्रेप झिरमिळ्यांसाठी वापरता येईल.

रैना, शाळेत हस्तकला नव्हती का?
घोटीव कागद आणा असं किती वेळा आमच्या शाळेतून सांगितलंय असं आम्ही पालकांना सांगायचो याला तोड नाही.. Wink

तुझ्यासाठी सुपर सोपा सांगू का? हिम्याच्या आकृती २ प्रमाणे चोयट्या जोडून त्याला वरून चार चोयट्या जोड जेणेकरून अधिकचे चिन्ह होईल. आणि चार बाजूंनी हवा तो पेपर/ कापड लपेट. वर टिकल्या बिकल्या. चार कॉर्नरांना चार झुपके लटकव खालती. वरती दोरा. मधल्या अधिकच्या चिन्हाचा उपयोग दिव्याला सपोर्ट म्हणून.

नी- इंग्रजी माध्यम Sad
कलर्ड पेपर फॉर क्राफ्ट- असे मातोश्रींना सांगायचो. आणि इतक्या घाणेरड्या गोष्टी करायचे की तीच वैतागुन, दोन दणके देऊन उरलेले करुन द्यायची. Proud
क्रेपची फुलं माझ्याइतकी भिकार कोणीही केली नसतील. आईला शिरीयसली मी चवथी नापास होईन केवळ क्रेपच्या फुलापायी असे वाटले होते. Proud

हिम्याच्या काड्या मिळाल्या तर तू लिहीलेले जमेल बहुतेक असे वाटतेय. थँक्यु. Happy

रैना, तू आणि इरा करणार आहात का? सही. फोटू टाक.

घोटीव कागदाचा दंडगोल करून कंदील करत असशील तर दंडगोलाच्या उंचीपेक्षा जास्त उंचीचा एक रंगीत कागद आण आणि त्याला उभ्या चिरा दे. आणि त्या दंडगोलाभोवती मधल्या भागात फुगीरपणा येईल असा गुंडाळ आणि वर आणि खाली दोन्ही टोकांना चिकटव/टाचण्या टोच.

दंडगोल करण्यापूर्वी कागदावर लहान-लहान आरपार छिद्रांची फुले कोर (पंच करतो त्यापेक्षा थोडी लहान छिद्रे). दंडगोलाच्या दोन्ही टोकांना मजबुतीसाठी जाड पुठ्ठ्याचे किंवा कागदाचे कडे लाव.

kandil.JPG

हिम्स... भारी!

रैना... आणखी एक आयडिया आहे सोप्या आकाशकंदिलाची ..... पांढर्‍या ड्रॉईंग पेपरवर चौकोन, त्रिकोण, गोल वगैरे भौमितिक आकार काढून ते ब्लेडने कातरून घ्यायचे म्हणजे तिथे त्या आकारांची भोके तयार होतील. आतील बाजूने त्या ड्रॉईंग पेपरला डार्क रंगाचा कागद लावायचा (तांबडा, जांभळा, हिरवा इ.) ड्रॉईंग कागद सिलेंड्रिकल शेपमध्ये फोल्ड करायचा, ओव्हरलॅप होणार्‍या कडा एकमेकींना चिकटवून टाकायच्या. वर गजानन ने जी काळी-पांढरी रेखाकृती दाखवली आहे तसे. वरच्या बाजूने पुठ्ठ्याची चकती लावायची. तिला बल्ब + होल्डर आत जाईल इतपत मोठे भोक पाडायचे. सिलेंडरच्या ओपन एन्डला कागदी / चकमकत्या कागदाच्या इत्यादी झिरमिळ्या कापून चिकटवायच्या / स्टेपल करायच्या.

माझ्या काकांनी एका वर्षी त्या सिलेंडरवर राधा कृष्णाची सुरेख चित्रे काढून रंगवली होती. त्याशिवाय या बाहेरच्या बाजूला टिकल्या, स्टार्स, चमचम इ. इ. प्रकार लावता येतील.

हिम्सकूल, फोतो पहायची उत्सुकता.
<< घोटीव कागद आणा असं किती वेळा आमच्या शाळेतून सांगितलंय असं आम्ही पालकांना सांगायचो याला तोड नाही.. >> Lol सेमपिंच नी.
बरेच सोपे आकाशकंदील मिळाले की. करून पहायला हवेत.

गजानन,
जबर्‍या. जबर्‍या. खूप खूप धन्यवाद. सोपी वाटतेय. करुन पाहते. Happy

अकु,
गजाननाचा कंदिल करता आला की पुढच्या पायरीवर तुझा करणारच. थँक्यु. थँक्यु.

हिम्याच्या कंदिलाच्या फोटुची आतुरतेने वाट पाहिंग.

अगं रैना गजापेक्षा अकुचा सोप्पा आहे. ड्रॉइंग पेपरप्रमाणेच टिंटेड शीटसमधे पण करता येईल. Happy

रुणु, अर्ध्या वेळांना शाळेतून सांगितलेला नसायचा पण घोटीव कागदाचं आकर्षण भारी. Happy

पण घोटीव कागदाचं आकर्षण भारी>>>>> +१
कितीही अगोदर शाळेत सांगितलं असलं तरी मला अगदी आदल्याच दिवशी आठवायचं आणि नेमकी संध्याकाळीच दुकानात खेप मारायला लागायची. "आत्ताच कसं नेमकं उजाडतं तुला" हे ऐकून घेतलंय मी चिक्कर वेळा! Proud

मस्त कंदील. तुमच्या कंदील झाला कि फोटो टाका प्लिज.

घोटिव कागद म्हणजे मार्बल पेपर. स्टेशनरी दुकानात या पैकी कोणत्याही एका नावाने मागितल्यास मिळतो.

मी वर लिहिलंय तसा हा झटपट घरच्या घरी फारसे साहित्य न वापरता (किंवा हाताशी असलेले साहित्य वापरून) बनवलेला सोपा आकाशकंदिल. तुम्ही यापेक्षा चांगले साहित्य वापरू शकता, मी जे मिळेल ते वापरले... थोडक्यात घरातल्या टाकाऊ वस्तूंतून हा कंदिल बनवलाय Happy

तसेच हा छोट्या आकारातला कंदिल आहे. यापेक्षा मोठा कंदिलही बनवू शकता. (मी लोडशेडिंग होते त्या वेळातला टीपी म्हणून हा कंदिल केलाय Wink फक्त अर्ध्या तासात झाला!)

साहित्य : वर्तमानपत्रातून येणारी तीन गुळगुळीत कागदाची माहितीपत्रके, इकलेअर च्या दोन चांद्या, कंदिल टांगण्यासाठी जुनी राखी, स्केचपेन, कात्री, स्टेपलर, पेन्सिल, गोल झाकण, चिकटवाचिकटवी करायला गोंद / फेव्हिकॉल/ ग्लूस्टिक इ.
सजावटीसाठी टिकल्या, चमचम, स्टिकर्स वापरू शकता.

हा कंदिल झिरमिळ्या लावायच्या आधी :

aksh1 copy.jpg

आणि हा झिरमिळ्या लावल्यानंतर (त्यासाठी मला तब्बल २ इक्लेअर्स खावी लागली!! :हाहा:) त्याला प्रकाश आरपार जाण्यासाठी हवी तशी भोके आधी / नंतर पाडू शकता.

aksh2 copy.jpg

Pages