माझी फुलांची रांगोळी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 September, 2010 - 04:50

आमच्या साखरचौतीच्या गणपतीच्या दिवशी मी ही रांगोळी काढली होती. खुप फुले उरली होती त्यातुनच ही रांगोळी काढली झर्ब्रेरियाची फुले आदल्या दिवशी वाहिलेल्या कंठीतुन काढली. त्यावरच ते मणी होते. खालची टोकेरी पाने गेलार्डीयाच्या काडीतील कापुन घेतले. हिरविगार गोलकार पाने आमच्य कंपाउंडच्या झाडाची काढली आहेत. त्यावर तगडीच्या कळ्या लावल्या आहेत. तसेच मध्ये मध्ये गेलार्डीया आणि ऑरगंडी ची फुले लावली आहेत. ऑरगंडीच्या फुलांच्या खाली कडू मेहंदीची पाने लावली आहेत. हयावर्षीची ही रांगोळी खास आकर्षण ठरली होती.

Rangoli2.JPGRangoli3.JPGRangoli4.JPGRangoli_0.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

गणेशचतुर्थिच्या नंतरची संकष्टी म्हणजे साखरचौत. ह्या दिवशी गुळा ऐवजी साखर घालुन मोदक करतात.

आर्या, समिर धन्स.
आर्या माझ्या माहेरी पण ताट भरतात त्यात गोल कापलेली मोठी काकडी, केळ अशी काही फळ असतात त्यावर झेंडूची देठासकट फुले तुर्‍यांसारखी लावतात व ते ताट धरुन आरती करतात.

जागु, काय मस्त मांडलीस गं फुले.. मी मिसली Sad
गेलार्डीया, ऑरगंडी आणि कडु मेहंदी हे पहिल्यांदाच ऐकले.. आता एक लेख टाक यांच्यावर..

सुरेख! Happy

सुंदरच!!!

कडु मेहंदी>>>> कडु मेहंदी तीच ना जिला सफेद रंगाची छोटी छोटी फुले येतात आणि त्यात भरपूर मध असतो? आम्ही लहानपणी ती फुल तोडुन त्यातला मध प्यायचा Happy

सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.
योगेश तीच ही पांढर्‍या फुलांची कडू मेहेंदी ही कुंपणाला लावतात. ह्याची पाने अतिशय कडू असतात. त्यामुळे गुरे कुंपण खात नाहीत.

छानच.. माझा या दिवाळीला लक्ष्मीपुजनाला फुलांची रांगोळी काढायचा विचार आहे.. Happy अर्थातच श्रीयाने (लेकीने) ती ठेवली पाहिजे.. Happy

योगेश तीच ही पांढर्‍या फुलांची कडू मेहेंदी ही कुंपणाला लावतात>>>>येस्स्स, आमच्या येथे सुद्धा आधी कडु मेहंदी आणि मेहंदी लावली होती आणि आता सगळं काढुन कॉंक्रीटच कुंपण Sad :(.
या कडु मेहंदीला एक पिवळ्या रंगची वेलही यायची. त्याच्या चश्मा करून डोळ्यांना लावायचो. Happy

जागु, तुमच्या रांगोळीमुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्य. Happy धन्स Happy

रुपाली श्रियाही काढेल थोड्या वर्षांनी रांगोळी
चिंगि, जुई, गजानन धन्यवाद.
योगेश त्या पिळ्या वेलाला अमरवेल म्हणतात. ती अमरवेल तोडून दुसर्‍या झाडावर टाकली तरी ती दुसर्‍या झाडावर जीव धरते अस म्हणतात. बकुळीच्या फुलांचा गजरा करण्यासाठीही ही वेल वापरतात. मी पण लहानपणी त्या वेलीचा चष्मा करायचे. अजुनही कुठे कुठे दिसते ही अमरवेल. परत दिसल्यावर फोटो काढेन.

Pages