Submitted by आर्पित on 26 June, 2012 - 12:26
रांगोळी
नविन कोरे रंग दुकानातून आणले
आणता आणता रंग आपापसात भांडले
सोडून पुड्या डब्यात भरल्या
भारता भारता थोड्या थोड्या सरल्या
पंढरी रांगोळी पायलीभर घेतली
रांगोळीची हौस म्हणून खिश्यांवर बेतली
ठिपके जोडून रांगोळी आखली
रंग भरताना मात्र कंबर वाकली
काही रंग मनातही भरले
भरताना मन रंगतच हरले
सुरेख रांगोळी अंगणात काढली
नक्षत्र नाव चिन्हे तुळशी समोर फाडली
माझ्या रांगोळीचा एकाच हेतू
क्षणभर का होईना फक्त सुखच वाटू
अल्पायुशी माझी रांगोळी गुणी
हसून करते स्वागत होता होता जुनी
कृष्णगंधा
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
माझ्या रांगोळीचा एकच
माझ्या रांगोळीचा एकच हेतू
क्षणभर का होईना फक्त सुखच वाटू
सुंदर हेतू.
शेवट आव् ड्ला.
शेवट आव् ड्ला.