रांगोळी पोर्ट्रेट्स

Submitted by अश्विनी के on 27 August, 2012 - 11:48

रांगोळी पोर्ट्रेट्स काढायला लागले तेव्हाच्या सुरुवातीच्याच पहिल्या दोन रांगोळ्या.

१) बाबा आले.....

हे पोर्ट्रेट माझे रांगोळी प्रकारातील पहिले पोर्ट्रेट आहे (कळतंच आहे ते Proud ) टेक्निकल बाबी काहिच माहित नसल्याने डायरेक्ट जमिनीवर आणि तेही चौरस न आखता काढलं होतं साध्या फळ्यावरच्या खडूने काढून मग रंगवलं होतं. प्रोफेशनल कलर्स वापरले नव्हते. फोटो काढेपर्यंत रांगोळी हलली गेली आहे. तरी गोड मानून घ्या Happy जुन्या मायबोलीवर काही दिवस टाकली होती.

BABA AALE.JPG

२) स्वामी विवेकानंद -

यातही प्रोफेशनल कलर्स वापरलेले नाहीत. यावेळी खाली ब्राऊन पेपर चिकटवला असल्याने रांगोळी जास्त हलली नाही. चौरस काढून पेन्सिलीने स्केच काढून मग त्यावर रांगोळी घातली आहे.

SWAMI VIVEKANAND.JPG

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही रांगोळी आहे??????????????????????
Wow

Surprise

ऑसम! हॅट्स ऑफ

बापरे,, तु कधीपासुन इतक्या सुंदर रांगोळ्या घालायला लागलीस.??? विवेकानंदांची रांगोळी आहे यावर माझा तरी विश्वास नाही बसत इतकी सुंदर रांगोळी तु घातलीयस.

अप्रतिम..... बाकी काही शब्दच नाहीत..... तुम्ही रांगोळीचे रंग वापरुन पोट्रेट्स इतके सुंदर व अचुक काढता तर तुम्ही इतर माध्यमे वापरुन चित्र किती पर्फेक्ट काढत असाल.....

यातही प्रोफेशनल कलर्स वापरलेले नाहीत. यावेळी खाली ब्राऊन पेपर चिकटवला असल्याने रांगोळी जास्त हलली नाही. चौरस काढून पेन्सिलीने स्केच काढून मग त्यावर रांगोळी घातली आहे.

रांगोळीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रोफेश्नल कलर्स वापरतात व खाली ब्राउन पेपर का चिकटवावा लागतो

मस्तच ग. कलेची मोठ्ठी देणगी दिली आहे देवाने तुला. रीयासारखीच माझी स्थिती झाली आहे. तुझी कला अशीच वाढत राहो! प्रदर्शन भरवायचा विचार जरूर कर.

साधारण १४-१५ वर्षांपुर्वीची आहेत ही पोर्ट्रेट्स. नंतरही काही काढली होती. त्यात एक कृष्णधवल रंगातील मधुबालाही होती. ती सुद्धा जुन्या माबोवर टाकली होती. मृण्मयीला आठवत असेल मधुबाला कदाचित. बाकीचे फोटो जुन्या राखलेल्या कागदांच्या रद्दीत खुपसून ठेवलेले मिळतील नंतर कधीतरी.

आता कॅनव्हास, रांगोळी, भरतकाम सगळ्यातच खंड पडला आहे काही वर्षं. पण मायबोलीवर हे काल परत टाकावंसं वाटलं आणि पुन्हा कोणे एके काळी मी अशीही होते त्या कलात्मक आठवणी जाग्या झाल्या. तुम्हा सर्वांना धन्यवाद देणेही फार अपुरे ठरेल असं काहीतरी मनात दाटून आलंय. तरी कालानुरुप जास्त महत्वाची ठरलेली इतर व्यवधानं सांभाळत हे ही कासवाच्या गतीने चालू करावंसं वाटत आहे.

वर्षा व्हिनस, हे प्रोफेशनल कलर्स थोडे मऊ दगड टाईप असतात. ते घासून घ्यावे लागतात. त्याच्या शेड्स फेड होत नाहीत. चमक चांगली राहते. २-३ दिवस झाले तरी रांगोळीचा गोळा होत नाही. म्हणून प्रदर्शनांच्या रांगोळ्या याच रंगांत असतात. खाली पेपर चिकटवला की त्याला रांगोळी धरुन राहते, बाजूने वावरणार्‍यांच्या पावलांच्या व्हायब्रेशन्सनी हलत नाही.

आशू, __/\__ (दुसरं फार आवडलं.)

तुम्ही रांगोळीचे रंग वापरुन पोट्रेट्स इतके सुंदर व अचुक काढता तर तुम्ही इतर माध्यमे वापरुन चित्र किती पर्फेक्ट काढत असाल...

>>>

अगदी !! तेव्हा आशू म्याडम शुरू हो जाओ Happy

ओ ताई, एवढ्यावरच का थांबलायत???? अजून येऊ द्या की Happy

पहिलं आठवतय, फार सुन्दर आहेत दोन्ही Happy

अश्विनी के... काय सुरेख आहे कल्पना..
पहिल्या रांगोळीला दिलेला मथळा अतोनात समर्पक आहे.. सुपर्ब!!
जियो!!! Happy

धन्स अश्विनी ताई Happy रांगोळीबद्दल हे आजच कळले...... बाकी ती पहिल्या चित्रातील मुलगी किती गोडुली दिसते

अतिशय सूंदर... !!! मुख्यतः कलर शेडिंग अप्रतीम. माझ्या माहीती प्रमाणे वेगवेगळी रांगोळी एकत्र करून आपल्याला पाहीजे तशी रंग छटा बनवणे हे सूद्धा अवघड काम आहे. पण दोन्ही फोटोत रंगाच्या शेड्स, सावली खूप छान दिसते आहे. असो मला कागदाची कल्पना मात्र आवडली नाही, तूम्ही म्हणता त्याच्या अगदी उलट, खाली कागद वापरण्याचा मोठा धोका तो म्हणजे थोडा जरी कागदाला धक्का लागला तरी आजुबाजुची रांगोळी 'ब्लर' होते. आता एखादे ब्लॅक्-व्हाईट रांगोळीपण येऊ देत..शुभेच्छा!!

चंबू, आधी त्या कागदावर स्केच काढायचे आणि तो जमिनीला टेपने चिकटवायचा. कागद कसा हलणार? नंतर जमिनीवर बसकण मारुन, चक्क चित्रावरही बसून रांगोळी घालायची Happy मी बर्‍याचश्या शेड्स आधी बनवून घेते म्हणजे रांगोळी काढण्याचा टेम्पो मध्येच जात नाही.

Pages