महाराष्ट्र मंडळ

संगीत, नृत्य व नाट्य यांचा महाविष्कार - गीत रामायण

Submitted by माध्यम_प्रायोजक on 5 July, 2017 - 10:46

गीतकार ग. दि. माडगूळकर आणि संगीतकार सुधीर फडके
यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकार झालेली, गेली ६२ वर्षे मराठी मनावर अधिराज्य गाजवणारी अजरामर कलाकृती
गीत रामायण
संगीत, नृत्य व नाट्य यांचा महाविष्कार!
rangamunch-bmm2017.jpg

शब्दखुणा: 

अधिवेशनात एकत्र भेट

Submitted by समीर on 4 July, 2017 - 14:19
तारीख/वेळ: 
7 July, 2017 - 12:00 to 9 July, 2017 - 13:00
ठिकाण/पत्ता: 
डावोस सेंटर, ग्रँड रॅपीड्स

अधिवेशनाला कोण कोण मायबोलिकर येतायत? कुठल्यातरी एका जेवणाच्या वेळी आपलं गटग करू शकतो. वेळ नक्की ठरली इथे लिहुया.

माहितीचा स्रोत: 
प्रांत/गाव: 

शेत- करी एक सन्मान......

Submitted by वि.शो.बि. on 8 June, 2017 - 03:32

Read
सध्या महाराष्ट्राची लोकसंख्या 112,374,333 आहे.तरीही महाराष्ट्राची परीस्थीती म्हणजे नाम बडे दर्शन खोटे असे.
औद्योगिक क्षेत्रात नाव खुप मोठे परंतु शेतकरी ला मान सम्मान नाहि.
त्या मानवाला आज हक्क आणि आपली बाजु मांडण्यासाठि रस्त्यावर उतराव लागत आहे. हे खुप लाजिरवाणि गोष्ट आहे.
आपन टीव्हि पाहुन या गोष्टी वर comment करत बसलो आहे.
सरकार ने हे केल पाहीजे.....ते केल पाहीजे....
असे intervew पाहुन मला या लोकांची दया व हस्य येत असुन यांना काय बोलाव तेच समजत नाहि..

रहे ना रहे हम - डॉ. मृदुला दाढे-जोशी

Submitted by जिज्ञासा on 4 June, 2017 - 13:50

सुप्रसिद्ध गायिका डॉ. मृदुला दाढे-जोशी ही माझी सख्खी आत्तेबहीण! तिच्या 'रहे ना रहे हम' ह्या कार्यक्रमाला जाण्याचा काल योग आला. हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळातील प्रयोगशील संगीतकारांच्या योगदानावर आधारीत असा हा कार्यक्रम आहे जो काल अतिशय रंगला. त्याची ओळख मायबोलीच्या सर्व रसिक वाचकांना व्हावी म्हणून तिला लिहिलेलं एक पत्र मी इथे प्रसिद्ध करत आहे. कारण हा कार्यक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. माझ्या बहिणीचा आहे म्हणून नव्हे तर ह्या कार्यक्रमातून ती जे सांगू पाहते आहे ते फार अभिरुचीपूर्ण आहे असं मला वाटतं म्हणून!

अधिवेशनाचे वृत्त - मे २०१७

Submitted by BMM2017 on 3 May, 2017 - 13:08

MI मराठी - आपलं अधिवेशन

अधिवेशनाची रूपरेषा आखणं ही खूप महत्वाची गोष्ट असते. ही रूपरेषा म्हणजे अधिवेशनाचा पाया असतो आणि त्यावरच नंतर अधिवेशनाचा संपूर्ण डोलारा उभा राहणार असतो. "अधिवेशन का करायचं?" या प्रश्नापासून ही रूपरेषा आखायला सुरुवात होते आणि एकदा "का?" या प्रश्नाचं उत्तर मिळालं, की मग "कसं?" ह्या प्रश्नाचं उत्तर मिळत जातं..

विषय: 
शब्दखुणा: 

BMM2017 - भोजन-समितीबरोबर गप्पा

Submitted by समीर on 21 April, 2017 - 01:44

एखादा घरगुती कार्यक्रम असो अथवा मोठे अधिवेशन, त्यात भोजनाचा मेन्यू काय आहे, याची सर्वांना उत्सुकता असते. जेवण उत्तम असेल तर कार्यक्रमाचे निम्मे यश निश्चित होते. यजमानांना ही व्यवस्था कशी करावी, याबद्दल बरीच तयारी करावी लागते. उत्तर अमेरिकेत होणारे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशनही याला अपवाद नाही. मायबोली टीमने २०१७च्या ग्रँड रॅपीड्स अधिवेशनाच्या भोजन समितीबरोबर या विषयावर सविस्तर चर्चा केली.

BMM2017 - भोजन-समिती - आम्ही सारे खवय्ये

Submitted by BMM2017 on 20 April, 2017 - 11:58

’बृहन्महाराष्ट्र मंडळ २०१७’ अधिवेशनातील भोजन-समितीचे सर्व सदस्य आधी एक खवय्ये आहेत. खाणे आणि खिलवणे हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. हे अधिवेशन त्यातल्या भोजन व्यवस्थेमुळे तुमच्या लक्षात राहील, यासाठी त्यांचे सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत.

BMM 2017 - उत्तर अमेरिकेतील कार्यक्रमांची माहिती

Submitted by BMM2017 on 6 March, 2017 - 11:21

नमस्कार मंडळी! कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपल्या अधिवेशनाचे कार्यक्रम आता जवळपास निश्चित झाले आहेत! काही कार्यक्रमांचे करार होणे अजून बाकी आहे. पण कार्यक्रमांचं वेळापत्रक प्रसिद्ध झाल्यावर ते बघून आपल्याला जेवढा आनंद होईल तेवढीच "कुठला कार्यक्रम बघू आणि कुठला नको!" अशी आपली अवस्था व्हायची दाट शक्यता आहे! ह्याचं कारण असं, की भारतातून दर्जेदार कार्यक्रम तर आपण आणतोच आहोत, पण उत्तर अमेरिकेतल्या विविध प्रांतातील उत्तमोत्तम कार्यक्रम सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहेत.

संयोजकांचे आवाहन

Submitted by BMM2017 on 24 February, 2017 - 15:10

नमस्कार मंडळी,

anjali_anturkar.pngBMM २०१७.. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या ह्या १८व्या अधिवेशनात तुमचे सहर्ष स्वागत! महाराष्ट्र मंडळ ऑफ डेट्रॉइट (MMD) जुलै २०१७ मध्ये, केवळ नॉर्थ अमेरिकेतल्याच नव्हे तर जगभरातल्या मराठी बांधवांचा पाहुणचार करण्यास उत्सुक आहे. एवढं मोठं अधिवेशन करायचं म्हणजे सोपं काम नाही. पण डेट्रॉइटच्या माणसांनी दाखवलेली कष्टाची तयारी, इतर मंडळांनी दाखवलेला विश्वास आणि देऊ केलेला मदतीचा हात, ह्या जोरावर आम्ही हे शिवधनुष्य पेलण्यास सज्ज होत आहोत.

BMM 2017 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१७

Submitted by माध्यम_प्रायोजक on 24 February, 2017 - 15:07

मंत्र श्रमाचा, ध्यास गतीचा
गर्व मराठी संस्कृतीचा!!
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या १८ व्या अधिवेशनाबद्दलचं हितगुज.
(जुलै २०१७)
मायबोली.कॉम या अधिवेशनाची ऑनलाईन माध्यम प्रायोजक आहे.

https://www.bmm2017.org

प्रांत/गाव: 

Pages

Subscribe to RSS - महाराष्ट्र मंडळ