कॉसमॉस बीएमएम २०१३ स्पर्धेचा विजेता टोरांटोचा रवी दातार
कॉसमॉस बीएमएम २०१३ स्पर्धेचा विजेता टोरांटो कॅनडाचा रवी दातार.
दुसरा क्रमांक टोरांटो कॅनडाची समीधा जोगळेकर
तिसरा क्रमांक न्यूजर्सी चा अक्षय अणावकर
कॉसमॉस बीएमएम २०१३ स्पर्धेचा विजेता टोरांटो कॅनडाचा रवी दातार.
दुसरा क्रमांक टोरांटो कॅनडाची समीधा जोगळेकर
तिसरा क्रमांक न्यूजर्सी चा अक्षय अणावकर
पहिल्या दिवसाची क्षणचित्रे:
१. ढोल्/ताशे/लेझीमच्या जोडीने आलेल्यांचे स्वागत.
२. नाश्त्यासाठी उपमा/दिलपसंद 
३. आभाने (अजय/भावना ची मुलगी) गायलेले राष्ट्रगीत. मान्यवरांची भाषणे आणि उद्घाटन सोहळा. हा कार्यक्रम काही इतर कामांमुळे येता जाता पहायला मिळाला.
४. लग्नाच्या पंगतीचं पुणेरी जेवण : अळू, बिरड्या, बटाट्याची भाजी, पुरणपोळी, जिलेबी, मठ्ठा, मसालेभात..
बी.एम.एम.च्या अधिवेशनाला - ५ जुलै रोजी सकाळी- सुरुवात होत आहे. गेली दोन वर्षे बॉस्टनचे बाळ महाले आणि त्यांच्या सहकार्यांनी या अधिवेशनाची कसून तयारी केली आहे. अगदी स्वतःच्या घरातला कार्यक्रम असल्याप्रमाणे सर्वांनी मन लावून काम केल्याने, आता या शेवटच्या घटकेला उत्सुकता अगदी ताणली गेली आहे. त्यातच महाराष्ट्रातून महेश मांजरेकर, प्रशांत दामले, पद्मजा फेणाणी-जोगळेकर, संगीतकार अजय-अतुल, सुकन्या कुलकर्णी, राहुल देशपांडे, अजित भुरे, नटरंग-फेम सोनाली कुलकर्णी आणि इतर पन्नासहून अधिक कलाकार इथे येऊन दाखल झाले आहेत. दिलीप वेंगसरकर हेही खास या कार्यक्रमासाठी आले आहेत.
प्रॉव्हिडन्स शहर बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या १६ व्या अधिवेशनासाठी सज्ज झाले आहे. अमेरिकेतल्या एका शहरातल्या स्थानिक शासनाकडून लावलेल्या बॅनरवर " नव्या बांधुया रेशिमगाठी, जपण्या अपुली मायमराठी ! " ही मराठी अक्षरे पाहून काय वाटलं ते शब्दात सांगणे अशक्य आहे. (फोटो : वृंदा ढोले)
सर्वप्रथम आपली या कॉसमॉस बीएमएम सारेगम २०१३ अंतिम फेरीत निवड झाल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन
१ श्रेयस ! तुम्ही मुळचे कुठले ?
मी मुळचा साताऱ्याचा. सांगलीच्या वालचंद कॉलेजमधून इंजिनिअरिंगची पदवी घेतली. मग पुण्यात दोन वर्षे नोकरी करून, पदव्युत्तर शिक्षणासाठी इकडे आलो. इथल्या Texas A&M , College station या युनिव्हर्सिटीमधून MS पूर्ण केलं.
२. तुम्हाला संगीताची गोडी / आवड कशी आणि केव्हा लागली ?
सर्वप्रथम कॉसमॉस बीएमएम सारेगम २०१३ अंतिम फेरीत निवड झाल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन
१ अक्षय ! तुम्ही मुळचे कुठले ?
माझा जन्म मुंबईचा. मी तेथेच वाढलो. सध्या मी नॉर्थ अर्लिंगटन (NJ ) येथे राहत असून Cablevision Systems Corporation मध्ये डाटाबेस मार्केटींग म्यानेजर म्हणून काम करत आहे.
२. तुम्हाला संगीताची गोडी / आवड कशी आणि केव्हा लागली ?
१ रवि, तुम्ही मुळचे कुठले ?
मी माझ्या जन्मापासून टोरांटो , कॅनडा येथेच आहे. त्यामुळे मी अस्सल कॅनडा चा आहे.
२. तुम्हाला संगीताची गोडी / आवड कशी आणि केव्हा लागली ?
माझे वडील आणि आजोबा या दोघांना संगीताची अतिशय आवड , तसेच ते दोघेही उत्तम गायक आहेत त्यामुळे आमच्या घरात संगीताचे वातावरण आहे. आणि या मुळे माझ्यातही संगीताची हि परंपरा भिनली आहे. आणि संगीताचा हा वारसा माझ्या पर्यंत पोचला आहे.
३. संगीताचे शिक्षण तुम्ही किती वर्ष घेत आहात ? आणि कोणत्या प्रकारचे संगीत शिक्षण चालू आहे ?

नमस्कार मंडळी,
अधिवेशन आता अगदी जवळ म्हणजे एक महिन्यावर येऊन ठेपले आहे.
तुम्ही जर अजूनही अधिवेशनाला येण्याबद्दल "येऊ का नको" अशा द्विधा मनस्थितीत असलात तर मित्रमंडळींना भेटायला, सुग्रास भोजनासाठी, करमणुकीच्या कार्यक्रमांसाठी, खरेदीसाठी, शाळाकॉलेजांच्या प्रवेशांबद्दल माहितीसाठी आणि हवे असल्यास अगदी वर किंवा वधू संशोधनासाठी देखील येण्याचा विचार करा.
१ समिधा ! तुम्ही मुळच्या कोणत्या गावाच्या आहात ?
कॅनडाच्या पूर्व किनार्यावरच्या एका गावात माझा जन्म झाला आणि पुढे अनेक वर्ष टोरांटो पासून साधारणपणे १२० किमी अंतरावर, पंच्याऐंशी हजार लोकवस्तीच्या एका छोट्या गावांत वास्तव्य
२. तुम्हाला संगीताची गोडी / आवड कशी आणि केव्हा लागली ?