सर्वप्रथम कॉसमॉस बीएमएम सारेगम २०१३ अंतिम फेरीत निवड झाल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन
१ अक्षय ! तुम्ही मुळचे कुठले ?
माझा जन्म मुंबईचा. मी तेथेच वाढलो. सध्या मी नॉर्थ अर्लिंगटन (NJ ) येथे राहत असून Cablevision Systems Corporation मध्ये डाटाबेस मार्केटींग म्यानेजर म्हणून काम करत आहे.
२. तुम्हाला संगीताची गोडी / आवड कशी आणि केव्हा लागली ?
माझ्या कुटुंबात संगीत भरून राहिले आहे. मी ३ वर्षांचा असताना किशोर कुमारच्या गाण्याचे स्वर मी गुणगुणायचो. हे माझ्यातील सुप्त गुण माझ्या बहिणीने तेव्हाच जाणले व तेव्हापासून मी संगीताशी इतका बांधला गेलो कि मी ५ वर्षांचा असतानाच माझा पहिला स्टेजवर कार्यक्रम झाला. ३. संगीताचे शिक्षण तुम्ही किती वर्ष घेत आहात ? आणि कोणत्या प्रकारचे संगीत शिक्षण चालू आहे ?
साधारणपणे ४ वर्षे मी हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीताचा अभ्यास केला. ६ वर्षे मी तबल्याचे शिक्षण घेतले. असे असले तरी गझल , भावगीत आदि सुगम संगीताकडे माझा जास्त ओढा आहे.
४. संगीतातील तुमचे गुरु कोण ?
पं. शंकर अभ्यंकरांची शिष्या सुनिता बिवलकर , आग्रा घराण्याचे ख्यातनाम पंडित बबनराव हळदणकर यांचे शिष्य अरुण कशाळकर आणि अलीकडे किरण घराण्याचे फिरोझ दस्तूर यांच्या शिष्या उषा साठे या सर्व गुरूंकडून गायनाचे मी धडे घेतले , आणि भाई गायतोंडे यांचे चेले नारायण परुळकर यांच्याकडून तबल्याचे शिक्षण घेतले.
५. तुमच्या संगीतातली विशेष कामगिरीबद्दल काय सांगाल ?
१. शालेय व कॉलेज जीवनात लायन्स क्लब ऑफ इडिया व रोटरी क्लूब ऑफ इंडिया आयोजित अनेक गायन स्पर्धांमध्ये विजेता
२. १९९७ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या उपशास्त्रीय गायन स्पर्धेत २रे पारितोषिक
३. २००८ मधील झिंगरबे USA च्या जगभरात online भरविलेल्या स्पर्धेत विजयी
४. २०१० मधील san fransisco येथील स्पंदन गानस्पर्धेत विजयी
५. श्री. आनंद माडगुळकर यांचेबरोबर गदिमायन कार्यक्रमात सहभाग
६. २०११ या वर्षी Los angeles येथे दिवाळी निमित्त महाराष्ट्र मंडळाने आयोजिलेल्या ' प्रेमाचा प्रवाह ' या नावाने प्रेम विषयक मराठी संगीताचा प्रवाह कसा झाला याचे निरनिराळे रंग दाखविण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभाग .
६. . संगीताच्या या आवडीसाठी तुमचे काय विशेष प्रयत्न असतात ?
मनाला आनंद व ज्यात स्वर माधुर्य आहे असं जुनं व नवं संगीत मी ऐकत असतो . संगीतातील मग ते मौखिक असो , वादनातील असो वा ठेक्यातील असो सूक्ष्म भेद जाणून घेण्यासाठी माझ्या सहकलाकारांबरोबर भाग घेत असतो. एखाद्या चांगल्या कवीच्या काव्यावर स्वरसाज चढविण्याचे काम मला मिळाले तर मी माझे भाग्य समजेन.
७. तुमचे आवडते गायक / गायिका आणि आवडते गाणे कोणते ? तुमचे आवडते एखादे गाणे ? कोणाचे संगीत ऐकायला तुला जास्त आवडते ?
सुरेश जी वाडकर आणि आशाताई भोसले हे माझे आवडते गायक गायिका आहेत.
मराठी संगीतकारांमध्ये अजय अतुल जोडी आणि अशोक पत्की मला प्रिय आहेत
प्रसिद्ध चित्रपट - जोगवा मधील 'जीव रंगला ' हे माझे आवडते गाणे असे मी म्हणेन .
खालील लिंक्स वर आपण माझी काही गाणी ऐकू शकाल .
http://www.zingerartist.com/Zartists/Akshay_Anaokar/
http://www.youtube.com/watch?v=oBgKsA-__OU
http://www.youtube.com/watch?v=K0Z7HCxyAys
कृपया इथे जाऊन मला मत द्या - http://www.bmm2013.org/culturalprograms/saregama.html
शब्दांकन - सुरेश डिके , सरिता देशपांडे (मायबोलीकर: रंगीतसंगीत). फोटो: राहुल जोशी (मायबोलीकर : वाटसरु)
अक्षय, हार्दिक अभिनंदन आणि
अक्षय,
हार्दिक अभिनंदन आणि खूप सार्या शुभेच्छा!! लवकरच भेटूच अधिवेशनात.
अक्षयना शुभेच्छा.
अक्षयना शुभेच्छा.
अर्रे आले का 'आमचे' अणावकर.
अर्रे आले का 'आमचे' अणावकर. (बाराकर आहेत - त्यात मुंबईचे!)
हार्दिक शुभेच्छा हो!
शुभेच्छा
शुभेच्छा