मंडळी नमस्कार,
नुकतीच (३०जून रोजी) आषाढी एकादशी झाली. ‘जाता पंढरीसी, सुख वाटे जीवा । आनंदे केशवा भेटतांचि ॥’ असे म्हणत शेकडो वर्षे चालत आलेला वारकर्यांचा हा आनंद सोहोळा. ह्रुदयात वसणारा राम, आकर्षित करणारा किंवा रमविणारा कृष्ण आणि ऐक्य साधणारा परमात्मा स्वरूप विष्णु म्हणजेच हरी अशा अर्थाने अभिप्रेत असलेला वारकरी संप्रदायाचा महामंत्र जय जय राम कृष्ण हरी म्हणत हजारो वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूरात गेले असतील. या वारकर्यांचे आणि पंढरपूरातले व्यवस्थापन यांतून Event Management चे courses design करता येतील.
बृह्न्महाराष्ट्र मंडळाच्या १६ व्या अधिवेशनाचे मुख्य निमंत्रक श्री बाळ महाले यांच्याशी नुकताच संवाद साधायची संधी मिळाली.
1) अधिवेशनामधे तुमचं कार्यक्षेत्र कुठलं आणि संयोजनात तुमची कुठली भूमिका आहे?
अधिवेशनात मुख्य निमंत्रक म्हणून माझी प्रमुख भूमिका म्हणजे अधिवेशनासाठी लागणाऱ्या संघटनेची उभारणी, वेगवेगळ्या समित्यांमधील समन्वय आणि जनसंपर्क. मला सांगायला खूप आनंद होतोय की आमची दोनशेहून अधिक उत्साही स्वयंसेवकांची संघटना तयार झाली आहे आणि ही संघटना दर महिन्याला वाढतेय.
मंडळी नमस्कार,
नुकतीच, म्हणजे १ मे २०१२ रोजी महाराष्ट्राच्या स्थापनेला ५२ वर्षे पूर्ण झाली. एस. एम. जोशी, आचार्य अत्रे, कॉम्रेड डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे या पंचकाच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली संयुक्त महाराष्ट्राची, मराठी अस्मितेची चळवळ पंडित नेहरुंनी संयुक्त महाराष्ट्राचा कलश यशवंतराव चव्हाण यांच्या हाती देऊन सफल झाली. तो दिवस होता १ मे १९६०.
कोकणासाठी हवी जलवाहतूक
कोकणाच्या निसर्गाचा बाज काही निराळाच. तिथलं प्रसन्न करणारं वातावरण, हिरवळ हवीहवीशी वाटते. मात्र, उन्हाळ्याची सुट्टी, गणेशोत्सवात कोकणात जाणं कठीण होत असतं. या काळात ट्रेनचं बुकिंग न मिळणं, खाजगी बसेसची मुजोरी अशा समस्या येत जातात. मात्र, त्याच वेळी जलवाहतुकीचा चांगला पर्याय चाकरमान्यांना मिळाल्यास फायदा होऊ शकेल. सर्वसामान्यांना जलवाहतुकीने मोठा आधार मिळू शकेल. त्याशिवाय स्थानिक पातळीवरदेखील रोजगारनिमिर्तीस हातभार लागू शकेल.
मंडळी, नमस्कार!
कळविण्यास अत्यंत खेद वाटतो की बृहन्महाराष्ट्र मंडळाचे (बृ. म. मंडळ) विश्वस्त श्री. आनंद जोशी यांचे १७ फेब्रुवारी रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले. श्री. आनंद यांच्या निकटवर्तीयांनी ती बातमी कळविली. क्षणभर खरंच वाटेना. आनंद जोशी आणि माझा परिचय हा गेल्या ५-६ वर्षांचा. पहिल्यांदा आमची ओळख झाली ती त्यांची मुलगी हेमांगी हिच्या माय मराठी प्रकल्पाच्या संदर्भात. २०११ च्या जुलै मधे मी बृ. म. मंडळ अध्यक्षपदावर निवडून आल्यावर मग आमचा नियमीत संपर्क होऊ लागला.
मंडळी, नमस्कार!
महाराष्ट्राच्या तीन आठवड्याच्या socio-economic-cultural भेटीनंतर १८ जानेवारीला अमेरिकेत परतलो. मनापासून सांगायचं तर इथले उद्योग, मित्रपरिवार, स्पोर्टस् हे नाही म्हटलं तरी आपलं विश्व झालेलं असतं आणि २ आठवड्यानंतर started missing it. नाही म्हणायला east coast वरची थंडी आणि snow मात्र महाराष्ट्रात miss केलं नाही.
मंडळी, नमस्कार!
मुंबईच्या जानेवारीतल्या गुलाबी थंडीत बसून मी तुमच्याशी संवाद साधतोय. भारतभेटीला येऊन जवळ जवळ १० दिवस झाले. मित्र आणि आप्तेष्टांबरोबर अलिबागच्या किनाऱ्यावरुन २०११ला निरोप देताना सर्व वर्ष झर्रकन् डोळ्यासमोरून गेले. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने, आशिर्वादाने २०१२ तेवढेच यशस्वी आणि आनंददायी घालवू या.