बृहन्महाराष्ट्र मंडळ- अध्यक्षीय: फेब्रुवारी, २०१२

Submitted by Ashish_Chaughule on 10 February, 2012 - 11:23

मंडळी, नमस्कार!

महाराष्ट्राच्या तीन आठवड्याच्या socio-economic-cultural भेटीनंतर १८ जानेवारीला अमेरिकेत परतलो. मनापासून सांगायचं तर इथले उद्योग, मित्रपरिवार, स्पोर्टस् हे नाही म्हटलं तरी आपलं विश्व झालेलं असतं आणि २ आठवड्यानंतर started missing it. नाही म्हणायला east coast वरची थंडी आणि snow मात्र महाराष्ट्रात miss केलं नाही.

डिसेंबर, जानेवारी महिना म्हणजे reunion चा. आमच्या शाळेत (पार्ले टिळक विद्यालय) कोणाचे २०, कोणाचे २५ तर माझ्या आईच्या बॅचचे च, ५०वे reunion होते (६२ एस्. एस्. सी.). शाळा, शाळेतले मित्र,मैत्रिणी, त्यांच्याबरोबरच्या बालपणच्या आठवणी हा आपला एकमेव दुवा असतो जो तुम्हाला नेहमी चिरतरुण ठेवतो. व्यावसायिक क्षेत्रामध्ये कोणी कितीही यशस्वी असले, मोठे असले तरी शाळेतील मित्र भेटले की हुद्दे राहतात बाजूला आणि सर्वजण आपापल्या बालपणात रमून जातात आणि अशा भेटी पुढील वर्षासाठी पुरेशी संजीवनी देतात.

अशीच आपल्या नात्यांची कनेक्शन्स ही theme आपल्या पुढील अधिवेशनामध्येही असेल. त्याबद्दल तुम्ही वेळोवेळी बीनटाऊनच्या बातम्या या सदरात वाचालच. भारतातल्या या क्वालिटी टाईमची शिदोरी बांधूनच नव्या जोमाने उत्तर अमेरिकेत २०१२च्या भरगच्च अजेंड्याला सुरुवात करतोय. एप्रिल-मे महिन्यात सुयोग संस्थेचे गाजलेले नाटक ’वाह गुरु’ याचे बृहन्महाराष्ट्र (बृ. म.) मंडळातर्फे नऊ शहरात प्रयोग होतील. मला खात्री आहे की दिलीप प्रभावळकरांचा दर्जेदार अभिनय पाहण्यासाठी अमेरिकेतील चोखंदळ रसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.

उत्तर अमेरिकेत उत्तमोत्तम कार्यक्रमांची आणि संकल्पनांची सतत निर्मिती होत असते. असे कार्यक्रम विविध मंडळात पोचवण्यासाठी आमची समिती वचनबद्ध आहे. कृपया अशा दर्जेदार कार्यक्रमांची माहिती आम्हाला कळवावी. जेणे करून आम्ही असे कार्यक्रम टॅलेंट ट्रान्सफर उपक्रमात सामील करू आणि २०१३च्या अधिवेशनासाठीही शिफारस करु. प्राधान्य अर्थातच मंडळांनी बसवलेल्या कार्यक्रमांना असेल.

मुंबईच्या भेटीत महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याशी वार्तालाप झाला. महाराष्ट्र पर्यटन, महाराष्ट्रातील कला, संस्कृती यांच्या देवाणघेवाणीवर ठोस चर्चा झाली. उत्तर अमेरिका आणि महाराष्ट्राला सांस्कृतिकरित्या जोडले की इतर विकासाच्या गोष्टी आपोआपच घडतील असे माझे स्पष्ट मत आहे. कोकण भूमी प्रतिष्ठान या संस्थेने Global Kokan साठी त्यांचा Brand Ambasaador म्हणून मला नेमले- हा मी माझा महाराष्ट्राशी नाळ जोडण्याचा एक भाग मानतो.

मंडळी, बृ. म. वृत्त हे उत्तर अमेरिकेतील सर्वात जुने मासिक आहे हे तुम्हाला माहीत आहे का? १९८१ पासून प्रकाशित होत असलेल्या या मासिकाला जयाताई हुपरीकर, विद्या हर्डीकर-सप्रे, मोहन रानडे, शीला पिंपळसकर, सुरेश बिलोलीकर, देवदत्त कुलकर्णी, हनुमंत देशमुख, नीलिमा कुलकर्णी, संजय गोखले आणि विनता कुलकर्णी अशा दिग्गज संपादकांचे सहकार्य लाभले. काळानुरूप वृत्तात बदलही होत गेले. प्रत्येक संपादकीय मंडळाने जिवापाड मेहनत घेऊन अंक प्रकाशित केले आणि उत्तर अमेरिकेतील वाचकांना सादर केले. संपादकीय मंडळ आणि बृ. म. मंडळाची कार्यकारिणी वृत्ताच्या दर्जाबाबत तडजोड न करता प्रत्येक महिन्यात दर्जेदार अंक वाचकांना सादर होईल यासाठी दक्ष असते.

बृ. म. मंडळाचे हे मुखपत्र १५०० लोकांपर्यंत सीमित न ठेवता २०,००० वाचकांपर्यंत पोचले तर? असा विचार करुन येत्या २-३ महिन्यांत वृत्ताची ऑनलाईन प्रत www.bmmonline.org वरुन विनामूल्य वाचण्याची संधी उपलब्ध करुन देणार आहोत. त्यासाठी फक्त तुमचा ई मेल बृ. म. मंडळाच्या संकेतस्थळावर नोंदवावा लागेल. माझ्या मते अधिक वाचक, अधिक मजकूर, आणि नियमित संपर्क बृ. म. मंडळ, स्थानिक मंडळे, वाचक, जाहिरातदार अशा सर्वांसाठी फायद्याचा ठरेल.

कळावे, लोभ असावा.

आपला

आशिष चौघुले ( अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ )

ईमेल: achaughule@gmail.com

फोन: 302-559-1367

Group content visibility: 
Public - accessible to all site users