२०१३च्या बॉस्टन येथे होणार्या BMM अधिवेशनाच्या संयोजक समितीने घोषवाक्य आणि प्रतीकचिन्हाची स्पर्धा आयोजित केलेली आहे. विजेत्या स्पर्धकाला २०१३ च्या अधिवेशनात विनामूल्य प्रवेश दिला जाईल. तसेच अधिवेशन स्मरणिकेत विजेत्या स्पर्धकाचे छायाचित्र प्रकाशित केले जाईल. ही स्पर्धा उत्तर अमेरिकेतल्या(अमेरिका+कॅनडा) सर्व मराठी/ अमराठी व्यक्तींसाठी खुली आहे.
या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या स्पर्धा आहेत. एका व्यक्तीला दोन्हीतही भाग घेता येईल.
बृहन्महाराष्ट्र मंडळात दर दोन वर्षांनी अधिवेशनाच्या वेळेस खांदेपालट होतो. यंदाही नवीन कार्यकारिणीने सूत्रं हातात घेतली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेलावेअरचे श्री. आशिष चौघुले निवडून आले.
शिकागो येथील अधिवेशनात बृहन्महाराष्ट्र मंडळाचे बोर्ड ऑफ ट्र्स्टीजचे सदस्य व नवीन कार्यकारिणी: डावीकडून - श्री ठाणेदार, मोरेश्वर पुरंदरे, आनंद जोशी, आशिष चौघुले, नमिता दांडेकर, सुनील सूर्यवंशी, राहुल कर्णिक, सुचिता कुलकर्णी-लांबोरे व वसुधा पटवर्धन.
अमेरीकेत सुमा फूड व्यतिरीक्त पेणच्या गणेश मूर्ती कुठे मिळतील? काही वर्षांपूर्वी आमच्या मंडळासाठी मी ऑर्डर केली होती. सध्या सुमा फूडसकडे पेणच्या गणेश मूर्ती मिळत नाहीयेत. कृपया काही माहिती असल्यास सांगा.