मंडळी नमस्कार,
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडव्याच्या तुम्हा सर्वांना बृहन्महाराष्ट्र मंडळ ( बृ.म.मं /BMM ) परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. घरोघरी, मंडळातून आपण सर्वांनी हा सण उत्साहाने साजरा केला. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गुढीही उभारली. नकळत मन लहानपणातल्या आठवणीत गेले. गुढीबरोबर लागणार्या बत्ताशांची आठवण आली. कारण तेव्हा त्यांच्यावरच माझा डोळा असायचा. अमेरिकेतून भारतात जाताना 'तिकडे सर्व मिळते' यामुळे नातेवाईकांसाठी काय न्यायचे हा आपल्याला प्रश्न पडतो. थोड्याफार प्रमाणात भारतातल्या पाहुण्यांना अमेरिकेतल्या आप्तेष्टांसाठी काय न्यायचे असाही संभ्रम पडतो. यावर गेल्या ३-४ वर्षातला एक नवीन शोध म्हणजे टेबलगुढी आणि कारगुढी. तुम्हाला खोटं वाटेल पण आमच्याकडे अशा भेट मिळालेल्या डझनभर गुढ्या आहेत. २२ मार्चला या सर्व गुढ्यांना सालाबादप्रमाणे सूर्यदर्शन झाले. २४ तारखेला कनेटिकट महाराष्ट्र मंडळाने (CTMM) त्यांच्या पाडव्याच्या कार्यक्रमासाठी बोलावले होते.
CTMM Got Talent' या कार्यक्रमांतर्गत मंडळाच्या छोट्यामोठ्या सभासदांनी आपापले कलाविष्कार सादर केले. 'America Got Talent' च्या धर्तीवर voting, judging ठेवले होते. गेली २१ वर्षे अमेरिकेत राहूनही कनेटिकटला प्रथमच जाण्याचा योग आला. सुनिल सुर्यवंशी आणि त्यांच्या सहकार्यांनी कार्यक्रमाचे नियोजन उत्तमरित्या केले होते.
२५ तारखेला प्रॉविडन्स, र्होड आयलंड च्या पर्यटन कार्यालयातर्फे आम्हाला तेथील ’कन्वेंशन सेंटर्सची तसेच जवळच्या ह़ॉटेल्सची टूर दिली. याबद्दल अधिक माहिती या वृत्तात पान तीनवर आहेच. मला हे Providence गांव खूप आवडले. मुख्य म्हणजे we will be a big fish in small city. We will get good attention and good support. तिथेच बृ.म. मं. अधिवेशनाचे स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांची सभाही ठेवली होती. त्यांच्या समवेत अधिवेशनाचे बोधचिन्ह आणि घोषवाक्य जाहीर केले. तुम्हा
सर्वांना ते नक्कीच आवडेल
प्रॉविडन्स, ऱ्होड आयलंडच्या ह्या भेटीत मी बृ. म. मंडळ अधिवेशनाच्या कार्यक्रम समितीबरोबर आणि स्वयंसेवकांबरोबर चर्चा केली. यंदाच्या अधिवेशनात कार्यक्रम सादर करताना मंडळाकडून आलेल्या कार्यक्रमांना अग्रक्रम दिला जाईल. मंडळे सुद्धा कार्यक्रमांचे प्रपोजल सादर करतांना त्यांत सहभाग असणार्या व्यक्ती मंडळांचे सदस्य असतील ही पात्रता ठेवतील. या नवीन विचारसरणीने साहजिकच आपल्या स्थानिक मंडळाचे आणि अप्रत्यक्षपणे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे सभासद असण्याचे फायदे अधोरेखित केले जातील. शेवटी काय BMM म्हणजे उत्तर अमेरिकेतल्या मंडळांचीच umbrella organization आहे. या प्रक्रियेत तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याची अपेक्षा करतो. मंडळांबद्दल सांगताना विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे या महिन्यात mumbaibuzz.com ही संस्था BMM ची associate member झाली आहे. उत्तर अमेरिकेत मराठी संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार करणार्या संस्थांची बृहन्महाराष्ट्र मंडळाशी संलग्नता दाखवण्याची आस्था नक्कीच स्वागतार्ह आहे.
एप्रिल महिना म्हणजे spring break चा महिना. आठवडाभर मेक्सिको मधे सुट्टीसाठी घालवताना तिथे एखादे मराठी मंडळ आहे की नाही हे अस्मादिक पाहणार हे नक्की!!!
आपला
आशिष चौघुले ( अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ )
ईमेल: achaughule@gmail.com
फोन: 302-559-1367
आपल्या ह्या उपक्रमास हार्दिक
आपल्या ह्या उपक्रमास हार्दिक शुभेच्छा