रंग
आला पावसाळा रंग बदला
मानवी जीवनात आला पावसाळा म्हटल की डोळ्यासमोर येते ती पावसाळ्याच्या तयारीची धांदल. पावसापासुन संरक्षण करण्यासाठी आपण छत्र्या, कोट, पावसाळी चप्पल, घरांची डागडूगी अशी धांदल चालु होते. पण काही प्राण्यांची पावसाळ्याची चाहुल लागताच स्वसंक्षणासाठी रंग बदलण्याची लगबग दिसते. अर्थात हे रंग बदलण्याची किमया त्यांना नैसर्गिक आहे. आपल्यासारखी त्यांना विकत घ्यावी लागत नाही. त्यातीलच हा एक प्राणी.
उन्हाळ्यात कसातरीच दिसणारा हा सरडा आता पहा कसा रंगित आणि सुंदर दिसतोय.
सखी गं
तुझे काळे काळे रूप
मला आवडते खूप
तुझ्या रंगात साठली गुंगी गूढ
सखी गं सखी गं सखी गं
तुझ्या रूपाचा प्रभाव
जाणवतो चारी ठाव
काळ्या सावळ्या रंगास किती ओढ
सखी गं सखी गं सखी गं
तुझे असणे केवळ
करी जगणे प्रेमळ
तुझे नसताना आयुष्य अगोड
सखी गं सखी गं सखी गं
तुझे बोलणे लाघवी
रोमारोमात पालवी
तुझे लाजणे जिवास लावी वेड
सखी गं सखी गं सखी गं
(सावळ्या मुलीची गाणी / तुषार जोशी, नागपूर)
फेयर अॅण्ड लवली आणून देना बाबा मला
टिव्ही मधे दाखवती गोरे गोरे रंग
क्रीम कोणते मी लावू गोरे होण्या अंग
मला पण हवा माझा चेहरा चांगला
फेयर अॅण्ड लवली आणून देना बाबा मला
तुझा आहे तोच रंग गोड आहे बेटा
रंग बदलण्याचा नको ग आटापिटा
रंग जो मिळाला जन्मताना आपल्याला
तोच रंग छान रंग तोपण चांगला
बागेमध्ये मोगऱ्याची फुले असती ना
गुलाबाची पण असतात काय हो ना
गुलाबाने मोगरा व्हायचे नसते गं
गुलाबाचे वेगळे सौंदर्य असते गं
आवडतेस तू आहे तशीच आम्हाला
रंग गोरा करण्याचा विचार कशाला
मज्जाखेळ [३-५]: रंगाची जादू
वेगवेगळे रंग एकत्रकरून नवीन रंग बनवण्याचा खेळ. लहान मुलांना ही जादुच वाटते.
साहित्य:
सात आठ प्लास्टिकचे पारदर्शक ग्लास. वॉटरकलर्स, पाणी,
किंवा
लाल , निळा आणि पिवळ्या रंगाचे प्लास्टिकचे पारदर्शक तुकडे/कागद
कृती:
ग्लास मध्ये अर्धा ग्लास पाण्यात थोडा लाल रंग मिसळून लाल पाणी करून घ्या.
तसेच वेगवेगळया ग्लास मध्ये पिवळे आणि निळे पाणी करून घ्या.
आता रिकाम्या ग्लास मध्ये वरच्या तीन पैकी कुठलेही दोन रंगांच पाणी अगदी थोडं एकत्र करा आणि कुठला रंग होतो ते बघा.
किंवा
प्लास्टिकचे कागद एका पुढे एका धरून प्रकाशात बघा. कुठला रंग दिसतोय ते बघा.
हे निरीक्षण मुलांसमोरच लिहून ठेवा.
माझी दिवाळीची तयारी झाली, तुमची?
यावेळी दिवाळीची तयारी थोडी लवकर सुरू केली होती.
गणपतीच्या वेळी पणत्या चाकावर करणे, त्यांना हवा तसा आकार देणे, त्या वाळवणे, वाळल्यावर भट्टीत भाजणे. भाजून आल्यावर मग घरभर रंगाचा पसारा मांडून हवी तशी मनसोक्त रंगरंगोटी करणे. असे सगळे केल्यावर मग मायबोलीच्या शोनूकडच्या गेटटुगेदरला त्या घेवून जाणे, सगळ्यांना पणत्या विकत घ्या असा आग्रह करणे, आणि त्यांनी पण काही न म्हणता प्रेमाने पणत्या घेणे हे सगळे फक्त मायबोलीमुळेच शक्य आहे.
असा सगळा द्राविडी प्राणायाम केल्यावरचे हे काही फोटो.
१.
Pages
