गद्यलेखन

ती, तो आणि चुनु.

Submitted by केशवकूल on 17 August, 2023 - 23:38

ती, तो आणि चुनु.
रविवारची संध्याकाळ. आज तिच्या माहेरच्या कुणाच्यातरी लग्नाचे रिसेप्शन होते. ती आत तयार होत होती. हा बाहेर दिवाणखाण्यात बसला होता. तेव्हढ्यात तो लहान मुलगा आला. बेल न वाजवताच आत आला.
“काका. आईला पेपर पाहिजे आहे.”
“देतो, पण आधी नाव सांग.”
“चुनु. आता पेपर द्या.”
“चुनु काय? सगळं नाव सांग. मग पेपर देईन.”
“चिंतामणी वसंत राव. पेपर.”
“आडनाव?”
“सांगितलेकी. राव.”
“राहतोस कुठे?”
“तुमच्या शेजारीच.”
“लाडू खाणार?” त्याला त्याच्याशी गप्पा मारायला छान वाटत होते.
“नको.”

जगण्याचे सोने व्हावे…

Submitted by झुलेलाल on 13 August, 2023 - 08:11

जगणे आणि जिवंत असणे यातला फरक जेव्हा कळतो तेव्हा जगणे अधिक आनंदी होते. हा फरक सूक्ष्म असतो, पण अनेकदा तो समोर आला तरी जाणवत नाही. बऱ्याचदा तो सहजपणे समोर येऊनही, पकडून ठेवायचं सुचत नाही. मग आपलं जगणं म्हणजे केवळ जिवंत असण्यापुरतंच उरतं. जगण्याचा साक्षात्कार व्हावा, केवळ जिवंतपणाच्या सपक जाणिवेतून बाहेर पडून जगण्याचा जिवंत अनुभव घ्यायचा असेल, तर त्याचा जाणीवपूर्वक शोधही घ्यावा लागतो. अनेकदा, अचानक हा अनुभव समोर येतो, आणि ज्याच्या शोधात आपण चाचपडत होतो असे वाटते, तो शोध संपतो.

ऑफिस - एकमेकां साह्य करु अवघे पडू निवांत!

Submitted by मीपुणेकर on 11 August, 2023 - 00:25

ए आय टीम - आम्ही पाण्याचं मॉडेल टाकी मधे सोडलय. जरा पाणी येतय का चेक करा.

बॅकएंड टीम- माझ्या बाजुने चालतयं . फिटींग नीट आहे

वेबअ‍ॅप टीम - आमच्या बाजूने नळाची तोटी पण चेक केली आहे, काही लिकेज नाहीये

त्रासलेली टेस्टिंग टीम - मग नळाला पाणी का येत नाहीये?

<जरा वेळाने, परत हाक दिल्यावर >

वेबअ‍ॅप टीम- नळ सोडताना आम्ही 'खुलजा सिम सिम' असा आवाज दिला आहे पण बॅकेंडकडून 'सायमन चले जाव' असा मेसेज येतोय.

शब्दखुणा: 

बूमर लाइफ, बूमर थिंग्ज

Submitted by अश्विनीमामी on 9 August, 2023 - 23:32

हाय, पन्नाशी पुढची वाटचाल असा धागा काढला होता त्याला बरीच वर्षे झाली. आता ह्या वर्शी साठी लागणार. त्या निमित्ताने हा धागा!! पुढील वाटचाली साठी. ह्या ह्या ह्या. कोटी आपण हूनच झाली. ऑफिशिअली ज्येना लाइफ. त्यामुळे ह्या वयोगटातील माबोकर तर मोस्ट वेलकम आहेतच पण ज्यांचे पालक नातेवाइक ह्या वयोगटात आहेत त्यांनी ही प्रतिसादात लिहा. हे असे का वागतात असा प्रश्न पडत असेल तर मी त्यांचे पर्स्पेक्टिव्ह लिहायचा प्रयत्न करेन.

बेबी....

Submitted by kamalesh Patil on 4 August, 2023 - 05:00

बेबी. नुकतीच वयात आलेली एक गोड मुलगी. रंगाने काळी. नाही तिचा बापच म्हणयचा ती जन्माला आल्यापासून की या कळीशी कोण लग्न कतयंय. तमाम पालकांना पडतो तसा हा गहन प्रश्न बेबीच्या जन्मापासूनच पडला होता त्याला.सगळं सगळं करयाची बेबी घरातलं, बाहेरचं, त्या बापाच्या डोळ्यात थोडी तरी माया तिच्याबद्दल पाझरावी म्हणून. माणसं आशावादी असतात. समोरच्या माणसांनी आपली कितीही कुचंबना केली तरी ती व्यक्ती जर आपल्यासाठी महत्त्वाची असेल तर त्यांनी केलेल्या कुचंबणेला पाठीशी घालून बऱ्याचदा स्वतःच महत्व वाढवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो.बेबी तेच करायची. तिला कळायचंच नाही आपल्या या प्रयत्नांना कधीही फळ येणार नाही.

माझी शाळा- एक नोंद!

Submitted by वावे on 23 July, 2023 - 00:09

आमच्या गावातली प्राथमिक शाळा या शैक्षणिक वर्षी अधिकृतपणे बंद झाल्याचं मला काही दिवसांपूर्वी कळलं. जिल्हा परिषदेची, मराठी माध्यमाची एका खेडेगावातली ही छोटीशी शाळा. गेली काही वर्षे ती बंद पडण्याच्या दिशेने जात असल्याचं लक्षात येत होतंच. तरीही, ती खरोखरच बंद झाल्यावर खूप वाईट वाटलं. मी शाळेत असताना साधारणपणे साठ ते पासष्ट विद्यार्थी शाळेत असायचे. पहिली ते चौथी, हे चारही वर्ग मिळून ही संख्या होती. ही संख्या त्याआधी आणि त्यानंतरही अनेक वर्षे स्थिर होती. नंतर मात्र सावकाश, पण निश्चित ओहोटी सुरू झालेली होती.

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन