बेबी....

Submitted by kamalesh Patil on 4 August, 2023 - 05:00

बेबी. नुकतीच वयात आलेली एक गोड मुलगी. रंगाने काळी. नाही तिचा बापच म्हणयचा ती जन्माला आल्यापासून की या कळीशी कोण लग्न कतयंय. तमाम पालकांना पडतो तसा हा गहन प्रश्न बेबीच्या जन्मापासूनच पडला होता त्याला.सगळं सगळं करयाची बेबी घरातलं, बाहेरचं, त्या बापाच्या डोळ्यात थोडी तरी माया तिच्याबद्दल पाझरावी म्हणून. माणसं आशावादी असतात. समोरच्या माणसांनी आपली कितीही कुचंबना केली तरी ती व्यक्ती जर आपल्यासाठी महत्त्वाची असेल तर त्यांनी केलेल्या कुचंबणेला पाठीशी घालून बऱ्याचदा स्वतःच महत्व वाढवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो.बेबी तेच करायची. तिला कळायचंच नाही आपल्या या प्रयत्नांना कधीही फळ येणार नाही. जन्म झाल्यापासून ज्या बापाने आपल्याला एक नकोशी असलेली मुलगी म्हणून वाढवलं त्या बापाकडून प्रेमाची अपेक्षा करणं हा मूर्खपणा आहे हे बेबीला कळत नव्हतं.

कमशः

Group content visibility: 
Use group defaults