गद्यलेखन

क्रॉसओव्हर आणि परत माघारी-३ शेवट.

Submitted by केशवकूल on 13 November, 2023 - 02:37

“त्याचे काय?” चिंटूच्या डोक्यात अजूनही प्रकाश पडत नव्हता.

त्याने आपल्या कोटाच्या खिशातून पिस्तुल काढून टेबलावर ठेवले. चिंटू मनातून चरकला. हा रुणझुणरुणझुणवाला दिसतो तितका साधा नाही.

“आता मी जे काही बोलणार आहे ते ह्या चार भिंतींच्या पलीकडे जाणार नाही अशी मला आशा आहे. माझ्या म्हणण्याचा मतितार्थ असा की मी जे काही बोलणार आहे ते ह्या चार भिंतींच्या पलीकडे जायला नाही पाहिजे.”

हार्डी बॉइजच्या कथा वाचून चिंटूला एक गोष्ट चांगली माहीत होती की ज्याच्याकडे पिस्तुल असते त्याच्याशी कधी आर्ग्युमेंट करायचे नसते. हो नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता.

क्रॉसओव्हर आणि परत माघारी -२

Submitted by केशवकूल on 12 November, 2023 - 12:23

क्रॉसओव्हर आणि परत माघारी -२
त्या चपट्या बाटलीतले रंगीबेरंगी रसायन प्याल्यावर चिंटूच्या मेंदूत अभूतपूर्व बदल झाले. त्याला कथा लिहिण्याची सुरसुरी स्फुर्ति आली. चिंटूने धाडकन एक विज्ञान कथा लिहून टाकली.

क्रॉसओव्हर आणि परत माघारी -१

Submitted by केशवकूल on 12 November, 2023 - 03:21

क्रॉसओव्हर आणि परत माघारी
नोकरीसाठी वणवण पायपीट करणाऱ्या चिंटूसाठी आजचा दिवस महत्वाचा होता.
नोकरीसाठी दिसेल त्या ठिकाणी अर्ज टाकण्याचा त्याने सपाटा लावला होता. एमएस्सी फिजिक्स करून देखील त्याला म्हणाव्या तश्या नोकरीचे इंटरव्यू कॉल देखील येत नव्हते. नोकरी मिळायची तर गोष्टच निराळी, त्याने कुठे कुठे अर्ज नाही केले? काही दिवस त्याने कुरिअर बॉयची नोकरी केली, काही दिवस मॉलमध्ये सामान हलवून शेल्फवर लावायची हमाली केली. काही दिवस कॉल सेंटर मध्ये नोकरी करत परदेशी लोकांच्या शिव्या खाल्ल्या. ज्या वेगाने त्याने नोकऱ्या धरल्या त्याच वेगाने सोडल्या. कारणंही तशीच होती.

योग्य निर्णय

Submitted by प्रथमेश काटे on 10 November, 2023 - 01:25

योग्य निर्णय

निमा आणि विनु शेजारच्या फ्लॅट मधल्या रूपेश दादाकडे आलेले. तिघे हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते. जवळपास वर्षभरापूर्वी दुसऱ्या शहरातून आपल्या आईवडिलांसोबत रूपेश इथे राहायला आला होता. आपल्या प्रेमळ, मनमोकळ्या स्वभावाने थोड्या दिवसात आसपासच्या सगळ्यांना त्यानं आपलसं केलं होतं. लहानग्यांशी छान मैत्री केली होती. शेजारी राहत असल्याने विनू व निमाशी तर त्याची खास गट्टी जमली होती.

" वर्षभरात आपण खूप मज्जा केली ना. " निमा उत्साहाने बोलत होती. " मकर संक्रांतीला, होळीला, रंगपंचमीला, गणपती बसवल्यावर. दादा यावेळी तू असल्यामुळे आम्हाला अजूनच मजा आली."

गो केकू गो! भाग -१

Submitted by केशवकूल on 9 November, 2023 - 22:08

गो केकू गो!
“रावडी केशव कुलकर्णी(केकू)”
Fully Configured.
Level 3 entered. Scene 1. ready to go. Start New Session.
ID No. ID zx 120 2792023 T=00
“Go Keku. Go.”

आमचे धोत्रे गुरुजी (भाग ३)

Submitted by मिरिंडा on 9 November, 2023 - 04:50

आजकाल मी गुरुजींना मॉर्निंग वॉकला घेऊन जायला सुरुवात केली. ते बरोबर आले तरी फारसे बोलत नसंत. किंबहुना बोलतच नसंत, असं म्हंटलं तरी हरकत नाही. पण एकतर्फी संवाद झाला,तरी मी तो चालू ठेवीत असे. कधी कधी ते रडवेला चेहरा करीत.कधी किंचित हसत.पण खळाळून हसत नसंत. अजूनही त्यांना आणल्याचा पश्चात्ताप होत नव्हता. कदाचित तो दिशाला होत असावा. पण ती माझ्या भीतीने बोलत नसावी. आता गुरुजींना येऊन महिना होत आला. माझी मुलं सुद्धा त्यांना आजोबा म्हणून हाक मारीत असंत. ते माझ्याकडे अनोळखी माणसाकडे पाहावं तसं पाहात.

मी वाचलेले, पाहिलेले आणि ऐकलेले पु ल देशपांडे

Submitted by प्रथमेश काटे on 8 November, 2023 - 12:21

  पु. लं. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व. काही पुस्तके, कादंबऱ्या भावनिक करतात. अंतर्मुख करतात, तर काही खळखळून हसवतात. मात्र पु. लं हे असे लेखक होते. ज्यांची पुस्तके, कादंबऱ्या वाचताना कधी हसता हसता डोळ्यांतून अश्रू येतात. कधी एका क्षणी त्यांच्याच शब्दांनी गंभीर, जरासं अस्वस्थ झालेलं मन पुढच्याच क्षणी त्यांच्याच शब्दांनी हलकं होऊन जातं, आणि ओठांवर हलकंसं स्मित उमटतं.

•••••••

साहित्यिक पु. लं

मान्यता !.. (एक अंकी नाटक )

Submitted by Sujata Siddha on 8 November, 2023 - 03:07

मान्यता !.. (एक अंकी नाटक )

प्रवेश पहिला

स्थळ : ( कै. अरविंद जातेगावकरांचा बंगला , जुन्या पद्धतीने सजवलेल्या भल्या मोठ्या दिवाणखान्यात पितळी कड्या असलेल्या झोपाळ्यावर जातेगावकरांची धाकटी मुलगी मयूरी हलके हलके झोके घेता घेता पुस्तक वाचते आहे , तिच्याच समोर त्याच झोपाळ्याच्या पितळी कडयांना टेकून ,पाय लांब करून बसलेली तिची वाहिनी ईशा लॅपटॉप वर काही कामे करते आहे ,तिच्या गोऱ्यापान नाजूक पायातले पैंजण तिच्या हालचाली बरोबर मध्येच किणकिणत आहेत )

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन