गद्यलेखन
आमचे धोत्रे गुरुजी (भाग ५)
तरी मला घरी पोहोचायला जिथे दहा मिनिटे लागत तिथे वीस मिनिटे लागली. मनाला एक प्रकारचं रिकामपण आलं होतं. एरव्ही जोरजोरात होणारे मनातले संवाद आता पूर्णपणे थांबले होते. पावणे आठच्या सुमारास मी घरात पोहोचलो.लिफ्टने जाण्यापेक्षा मला उडत जावं असं वाटतं होतं. दिशा आणि मुलांची काय अवस्था असेल याची काळजी मला वाटू लागली. आता संवाद परत आले. फ्लॅटचा दरवाजा सताड उघडा असून सगळे लाईट लावलेले होते. आत मधे आमचे सेक्रेटरी विधाते , शेजारचे शिंदे आणि पो.इन्स्पेक्टर वाघ आणि त्यांचे सहकारी यांचं निरीक्षण चालू होतं. मी आल्याबरोबर विधातेंनी माझी इन्स्पेक्टरना ओळख करून दिली.
वर्ल्डकप फायनल : २० वर्षांनंतर पुन्हा एकदा... भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
मागील महिन्यात एकदिवसीय विश्वचषक सुरूवात झालं, आणि आता पाहता पाहता अंतिम सामना येऊन ठेपला आहे. मागच्या वेळी वर्ल्डकपच्या सेमीफायनल मॅचमध्ये भारतीय संघाला न्यूझीलंड कडून पराभव स्वीकारावा लागला होता. आताही सेमीफायनल सामन्यात हीच न्यूझीलंडची टीम समोर उभी ठाकली होती. पुन्हा एकदा अटीतटीचा सामना रंगला. पहिल्या डावात कॅप्टन रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर व के एल राहुल या पिचवर उतरलेल्या प्रत्येक बॅटरने आपापल्या निरनिराळ्या शैलीत उत्कृष्ट बॅटिंग करून ३९७ धावांचा डोंगर उभा केला होता ; पण न्यूझीलंड बॅटिंगला उतरल्यानंतर मात्र सामन्यात अनिश्चितता निर्माण झाली होती.
एकदा काय झालं....
साधारणत: पन्नास वर्षापूर्वीची गोष्ट. त्यादिवशी दहीहंडी उत्सव होता. ठिकठिकाणी दहीहंडी बांधली असल्यामुळे घोडपदेवला गोविंदाची गर्दी दिसत होती. मी देखील या गर्दीतला एक भाग होतो. त्यावेळेला कोंबडी बाजा वाद्य होते. त्या वादयाच्या तालावर गोविंदा एका रांगेत नाचत नाचत पूढे जात होते. मागे बैलाच्या लाडीसावर सुंदर वेशभूषा धारण करून मुले राम-कृष्ण हंनुमान बनून शोभारथ त्या गोविंदाची शोभा वाढवीत होते. खूप आनंदी वातावरण असायचे. त्यादिवशी इकडे तिकडे फिरत असताना अमरज्योत मंडळाचा गोविंदा निघाला. बुवाचाळी पासून सुरू झालेल्या गोविंदाचा आनंद घेत मी देखील सामील झालो.
नमो नमो .... एक अखंड गजर
' नमो ' म्हटले कि तुमच्या भुवया नक्कीच उंचावतील. वाचण्यापूर्वीच तुम्हाला वाटेल आला आणखी एका नमो भक्तांचा लेख . पण येथे 'नमो नमो' हा भक्तीचा गजर नाही तर पोटोबाचा जागर आहे.
आणि हा लेख कोणा नमोभक्तानी लिहलेला नसून एका 'खाऊ' भक्तानी लिहिला आहे.
आमचे धोत्रे गुरुजी ( भाग ४)
मी कपाटा मागे लपलो,ते कपाट किती जुनं होतं माहित नाही. पण वर्षानुवर्षाचा कुबट वास त्याला येत होता. अजून मला त्या स्त्रीचं नाव माहीत नव्हतं. तिला विचारायची संधीच मिळाली नाही. दरवाज्या उघडल्याचा आवाज झाला. नंतर लाथेने दरवाज्या ढकलून दोघेजण आत शिरले. त्याबरोबर ती स्त्री जमिनीवर भेलकांडली आणि पुढील शब्द ऐकू आले. " काय ग ए भवाने,कोनाला आनलंस घरात? कुटं हाय त्यो ?
क्रॉसओव्हर आणि परत माघारी-३ शेवट.
“त्याचे काय?” चिंटूच्या डोक्यात अजूनही प्रकाश पडत नव्हता.
त्याने आपल्या कोटाच्या खिशातून पिस्तुल काढून टेबलावर ठेवले. चिंटू मनातून चरकला. हा रुणझुणरुणझुणवाला दिसतो तितका साधा नाही.
“आता मी जे काही बोलणार आहे ते ह्या चार भिंतींच्या पलीकडे जाणार नाही अशी मला आशा आहे. माझ्या म्हणण्याचा मतितार्थ असा की मी जे काही बोलणार आहे ते ह्या चार भिंतींच्या पलीकडे जायला नाही पाहिजे.”
हार्डी बॉइजच्या कथा वाचून चिंटूला एक गोष्ट चांगली माहीत होती की ज्याच्याकडे पिस्तुल असते त्याच्याशी कधी आर्ग्युमेंट करायचे नसते. हो नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता.
क्रॉसओव्हर आणि परत माघारी -२
क्रॉसओव्हर आणि परत माघारी -२
त्या चपट्या बाटलीतले रंगीबेरंगी रसायन प्याल्यावर चिंटूच्या मेंदूत अभूतपूर्व बदल झाले. त्याला कथा लिहिण्याची सुरसुरी स्फुर्ति आली. चिंटूने धाडकन एक विज्ञान कथा लिहून टाकली.
क्रॉसओव्हर आणि परत माघारी -१
क्रॉसओव्हर आणि परत माघारी
नोकरीसाठी वणवण पायपीट करणाऱ्या चिंटूसाठी आजचा दिवस महत्वाचा होता.
नोकरीसाठी दिसेल त्या ठिकाणी अर्ज टाकण्याचा त्याने सपाटा लावला होता. एमएस्सी फिजिक्स करून देखील त्याला म्हणाव्या तश्या नोकरीचे इंटरव्यू कॉल देखील येत नव्हते. नोकरी मिळायची तर गोष्टच निराळी, त्याने कुठे कुठे अर्ज नाही केले? काही दिवस त्याने कुरिअर बॉयची नोकरी केली, काही दिवस मॉलमध्ये सामान हलवून शेल्फवर लावायची हमाली केली. काही दिवस कॉल सेंटर मध्ये नोकरी करत परदेशी लोकांच्या शिव्या खाल्ल्या. ज्या वेगाने त्याने नोकऱ्या धरल्या त्याच वेगाने सोडल्या. कारणंही तशीच होती.
योग्य निर्णय
योग्य निर्णय
निमा आणि विनु शेजारच्या फ्लॅट मधल्या रूपेश दादाकडे आलेले. तिघे हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते. जवळपास वर्षभरापूर्वी दुसऱ्या शहरातून आपल्या आईवडिलांसोबत रूपेश इथे राहायला आला होता. आपल्या प्रेमळ, मनमोकळ्या स्वभावाने थोड्या दिवसात आसपासच्या सगळ्यांना त्यानं आपलसं केलं होतं. लहानग्यांशी छान मैत्री केली होती. शेजारी राहत असल्याने विनू व निमाशी तर त्याची खास गट्टी जमली होती.
" वर्षभरात आपण खूप मज्जा केली ना. " निमा उत्साहाने बोलत होती. " मकर संक्रांतीला, होळीला, रंगपंचमीला, गणपती बसवल्यावर. दादा यावेळी तू असल्यामुळे आम्हाला अजूनच मजा आली."