प्रकाशचित्रण

पायवाटा जाग्या झाल्या ...

Submitted by विशाल कुलकर्णी on 11 May, 2015 - 07:26

पुलंच्या कुठल्यातरी प्रवासवर्णनात (बहुतेक 'पूर्वरंग'च असावे) एका ठिकाणच्या निसर्गाचे वर्णन करताना पु.ल. म्हणतात...

"उंच उंच आणि घनदाट वृक्षांच्या रायांतून चिंतन मनन करीत हिंडण्यासाठी पायवाटा काढल्या होत्या. थोडा चढ थोडा उतार, थोडे वळण, थोडे सरळ. या पायवाटा माणसाला अंतर्मुख करतात....
असल्या पायवाटांतून पाखरांची किलबिल ऐकत , उंच वृक्षराजांच्या छत्राखाली चालताना आपल्या जोडीला फक्त सुंदर विचार चालत असतात. उपनिषदांची, आरण्यकांची महान निर्मीती या असल्याच चालण्यातून झाली असावी.
"

त्रिनिदादच्या कूकूचे पुढे काय झाले ? ( coo coo from Trinidad )

Submitted by दिनेश. on 11 May, 2015 - 05:52

भारताच्या अगदी पुर्वेकडील राज्यांबद्दल मला माहीत नाही, पण बाकीच्या बहुतेक राज्यात भेंडी आवडीने खाल्ली जाते.

भेंडीची भाजी करणे हे थोडेसे कौशल्याचे काम आहे. जरा दुर्लक्ष झाले, चुकून झाकण ठेवले, पाण्याचा हात लागला कि भेंडीला तारा सुटायला लागतात. ती भाजी कितीही परतली तरी मनासारखी होत नाही. अर्थात याला उपायही सोपाच आहे. कुठलाही आंबट पदार्थ वापरला ( चिंच, कोकम, दही, टोमॅटो, ताक, लिंबू वगैरे ) तर तारा सुटत नाहीत. भर तेलात भेंड्या तळून घेतल्या तरी तारा सुटत नाहीत. न कापता मीठाच्या पाण्यात उकडल्या तरी तारा सुटत नाहीत.

सांजवेळ..!!

Submitted by स्मितहास्य on 11 May, 2015 - 05:09

सांजवेळ

हा शब्द अनुभवण्यासाठी मुंबईत आपल्याला तशी जागा आणि तशी वेळ मिळेलच, याची,खात्री आता उरलेली नाही. तरीपण काही हौशी मुंबईकर या धकाधकीच्या जीवनातून थोडावेळ हुडकून काढतात. मग भले ती जागा एखाद्या बीचवरील असेना किंवा एखाद्या सो कॉल्ड रिसॉर्ट ला जाऊन व्यथित केलेली का असेना.... ते आपापला आनंद शोधतात.

मी सुद्धा त्यापैकीच एक. फरक फक्त एवढाच की आम्ही आमचा आनंद आमच्या माहेरी म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत शोधतो. त्यात सगळ्या ट्रेकर्सचं माहेर असलेला "हरीश्चंद्रगड" म्हणजे पर्वणीच.

आता हरिश्चंद्रगड कुठे आला, तिथे कसं जायचं, हे सांगत बसत नाही, कारण ते सर्वशृत आहे.

कोकणच्या गालावरची खळी - "दापोली"

Submitted by जिप्सी on 10 May, 2015 - 09:42

परशुरामाच्या भुमीत.....
प्रचि ०१

हौशी छायाचित्रकारांचे प्रदर्शन

Submitted by कांदापोहे on 8 May, 2015 - 02:22

नमस्कार मंडळी. आजपासुन बालगंधर्व रंगमंदिर कलादालनात हौशी छायाचित्रकारांचे प्रदर्शन आहे. अधिक माहीती खालीलप्रमाणे. या प्रदर्शनात पक्षी, प्राणी, निसर्ग, व्यक्तीचित्र अशा अनेक वेगवेगळी प्रकाशचित्रे प्रदर्शित केली आहेत. यामधे माझाही खारीचा वाटा असल्याने सर्वांना आग्रहाचे निमंत्रण. अवश्य भेट द्या.
Invitation.jpg

येडोबाच्या नावानं.........चांगभलं

Submitted by बाजीराव-अवी on 30 April, 2015 - 01:37

जवळपास सहा वर्षानंतर माझ्या आजोळी यात्रेला जाण्याचा योग आला. मा़झे आजोळ येराड ता. पाटण जि. सातारा हे श्री. येडोबा देवामुळे तिर्थक्षेत्र म्हणुन प्रसिध्द आहे. श्री.जोतिबा प्रमाणेच श्री. येडोबादेवाचे भक्तही संपुर्ण महाराष्ट्रात आहेत. दरवर्षी यात्रेला अलोट गर्दी असते. हनुमान जयंती म्हणजे पोर्णिमेपासुन यात्रा सुरु होते. पाच दिवस चालणार्‍या यात्रेत दोन दिवस सभिण्यांचे असतात. पहिल्या दिवसी धाकटा आणी दुसर्‍या दिवसी मोठा सभिणा, तिसरा दिवस देवाला पुरण पोळी वाहण्याचा तर बा़की दोन दिवस मोठा बाजार भरतो आणी पाचव्या दिवशी यात्रेची सांगता होते.

वुड डक्स ...

Submitted by rar on 27 April, 2015 - 10:00

तुम्हाला कोणाला सावंतवाडीला मिळणारी लाकडाची खेळणी आठवतात का? त्या खेळण्यात एक बदक असायचं, विविध रंगांचं. स्प्रींगमुळे त्याची मान हलायची.... ते बदक म्हणजे 'वुड डक' !
उत्तर अमेरिकेतल्या अनेक पानथळीच्या जागी हे वुड डक्स आपला संसार थाटतात. त्यातले काही स्थलांतरही करतात.
वुड डक हा एक अतिशय देखणा, रंगांची मुक्त उधळण असलेला पक्षी. थोडासे लाजाळू, स्वतःला सांभाळून असणारे हे वुडडक्स म्हणजे फोटोग्राफीसाठी पर्वणीच !

ट्यूलिप फेस्टीव्हल... (नवीन फोटोंसहित)

Submitted by rar on 21 April, 2015 - 11:47

अमेरिकेतील पॅसीफीक नॉर्थवेस्ट (म्हणजे कॅलिफोर्नियाच्या उत्तरेचा भाग) ट्युलिप्सच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे.
विविध प्रकारच्या ट्युलिप्सच्या जाती इथे तयार केल्या जातात . विविध रंगछटांच्या या जाती तयार करण्यासाठी बरेच प्रयोगही केले जातात.
नुसताच वुडबर्न, ऑरेगन इथल्या ट्युलिप फेस्टीव्हलमधे काढलेले काही फोटो.
मागे बर्फाच्छादित माऊंट हूड, ट्यूलिप्स आणि मस्त सूर्यप्रकाश असलेला दिवस...
(कॅमेरा : Nikon coolpix)

Grey teal

Submitted by उनाड पप्पू on 19 April, 2015 - 03:15

Grey teal हा बदकाच्या कुटुंबातला एक पक्षी असून पंखांवर तपकिरी रंगाचे ठिपके आणि सफेद+हिरव्या रंगांचे पट्टे असतात. नर आणि मादी यांच्या रंगात फारसा फरक दिसून येत नाही. नराच्या चेहऱ्यावर आणि मानेवर थोडे फिक्कट रंग असतात. हा पक्षी त्याच्या आवडीच्या तलावा जवळ किंवा एखाद्या झुडुपात जमिनीवरच घरटे करून राहतो. आपल्या नेहमीच्या बदका सारखी पक-पक नसली तरी बऱ्यापैकी आवाज करणारा आहे, खास करून रात्रीच्या वेळी. यातही नराचा आवाज थोडा कमी आणि मंजुळ असतो तर मादीचा मात्र काही प्रमाणात कर्कश्श असतो.
अतिशय सुंदर आणि शांत असणारा हा पक्षी प्रकाशचित्रणासाठी उत्तम...

हे प्रकाशचित्रण करताना
कॅमेरा : canon 600D

Pages

Subscribe to RSS - प्रकाशचित्रण