कोकणच्या गालावरची खळी - "दापोली"

Submitted by जिप्सी on 10 May, 2015 - 09:42

परशुरामाच्या भुमीत.....
प्रचि ०१

मे महिन्याच्या सुरूवातीलाच आलेल्या सलग सुट्ट्यांचा फायदा उचलत चार दिवस दापोली बाईक भटकंतीची योजना आखली गेली. तसंही ब-याच दिवसात कुठलीही भटकंती झाली नव्हती, त्यामुळे हे चार दिवस वाया जाऊ द्यायचे नाहीच असं मनोमन ठरवलं आणि दापोली तेही बाईकने जायचं ठरलं. माझ्या विशलिस्टमध्ये पावसाळ्यात माळशेज घाटात आणि कोकणात बाईकने जायचे हे होतेच. त्यापैकी पावसाळ्यात माळशेज घाटात ब-याचदा जाऊन आलो आता बाईक सफर करायची होती ती कोकणची. मुंबईहुन दापोली साधारण २२५ ते २३० किमी अंतरावर आहे. याआधीही मी दोनदा दापोली भटकंती करून आलो.
मुंबई, दापोली परीसर, केळशी, वेळास आणि पुन्हा मुंबई असा आमचा प्लान साधारण होता. पुढे त्यात थोडासा बदल करून कोस्टल रूटने प्रवास करायचा ठरलं.
मुंबई - पनवेल - माणगाव - आंबेत मार्गे दापोली, पन्हाळकाजी (मुक्काम) व तेथुन बुरोंडी - लाडघर - मुरूड कर्दे - पाळंदे (मुक्काम) - हर्णे - आंजर्ले - केळशी - वेळास - बाणकोट - वेसवी (वेसवीहुन जंगल जेट्टीने बाईक्स बागमांडला पर्यंत) - बागमांडला - हरीहरेश्वर (मुक्काम) - श्रीवर्धन - दिवेआगर - दिघी (बोटीने बाईक राजापुरी पर्यंत) - मुरूड (जंजिरा किल्ला) - नांदगाव - काशिद - बोर्ली मांडला - रेवदंडा - चौल - नागाव - आक्षी - आलिबाग - पेण पनवेल मार्गे मुंबई. Happy

याच प्रवासातील काही क्षणचित्रे.

चला सफरीला......
प्रचि ०२
कड्यावरचा गणपती (आंजर्ले)
प्रचि ०२
बुरोंडी
प्रचि ०३
तामसतीर्थ (लाडघर)
प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६
पन्हाळेकाजी लेणी
प्रचि ०७

प्रचि ०८
हर्णे बंदर
प्रचि ०९

प्रचि १०
पाळंदे
प्रचि ११
सुवर्णदुर्ग आणि हर्णे गाव
प्रचि १२
पाजपांढरी गाव
प्रचि १३
उटंबर
प्रचि १४
श्री महालक्ष्मी मंदिर (केळशी)
प्रचि १५
केळशीचा समुद्रकिनारा
प्रचि १६

प्रचि १७
कोकणचा मेवा
प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३
रातांबे
प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

(पूर्वप्रकाशित)

सुगंधीतकोकण
सोनचाफा
प्रचि ०२७
तामण
प्रचि २८
देवचाफा
प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

पोस्टर पिक नेहमीप्रमाणेच..
कोकणचा मेवा पाणी आणतोय तोंडाला..

व्वा , मस्त फोटो ..
एकतिसाव्या फोटोसाठी जोरदार निषेध >> +१११

या सगळ्या जागा प्रत्यक्ष पाहील्यामुळे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे एकदम पर्फेक्ट कॅप्चर केलं आहेस! खूप मस्त फोटोज. एकदम आवडले.

जिप्सीच्या फोटोन्ची आतुरतेने वाट पहात असतो. अप्रतीम आलेत फोटो.

तरी म्हणल आमचे नातेवाईक दर वर्षी उड्या मारत दापोलीला का पळतात. मेरा नम्बर कब आयेगा?

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!! Happy

अलिबागचा "कुलाबा किल्ला" ते "तेरेखोलचा किल्ला" असा प्रवास (सागरी किल्ले) करायची जबरदस्त इच्छा आहे. बघु कधी योग येतो ते. Happy Happy

पाजपांढरी गाव>> काय सुंदर टिपले आहे हे चित्र. मला ईटलीच्या खेड्यांची आठवण झाली.

सगळे चित्र छान आहेत. आणि चित्र बघून जावेसे वाटत आहे तिथे.

वॉव.. जिप्सी.. काय फोटो आहेत रे एकेक.. तो लालचुटुक फळाखालचा काजू, फणस, आंबे .. नजारे आहाहा!!
रातांब्या च्या आतला गर मँगुस्तिन सारखा दिस्तोय..

हर्णे, लाडघर चे तामस्थीर्थ पाहून,'श्याम ची आई' हे माझे अतिप्रिय पुस्तक आठवले.. आणी धन्य वाटलं. Happy

कधी जातोय या ठिकाणी असं वाटवणारे फोटोज..

मस्त!मस्त!!!

एकच नंबर!

कोकणातले बहुतेक समुद्र किनारे हे डोंगरा खाली आहेत. त्यामुळे डोंगरा वरुन खोल वर दिसणार्‍या समुद्राचे आणि किनार्‍यांचे वर्णन शब्दात सांगणे कठिण आहे... आणि आता तर त्यात खाडी पुलांची भर पडली आहे. समुद्र किनार्‍यां प्रमाणेच या खाडीपुलां शेजारील निसर्ग वेड लावणारा असतो. मग तो आंबेतचा पुल असो वा कसालचा.

Pages