कोकणच्या गालावरची खळी - "दापोली"
Submitted by जिप्सी on 10 May, 2015 - 09:42
दि. २८.११.२००९
रात्री १ वा. मुलुंडहून निघालो. सकाळी ६ वा दापोली. पावणेसातला सालदुरे (मुरुड) इथे पोहोचलो. आसुदच्या जोशींनी अनिष निवासमधील (प्रोप्रा प्रताप भोसले. फोन २३४६१५-२३४८९७) डॉरमेटरीमध्ये व्यवस्था करुन ठेवली होती. या जोशींचं आसुदमध्ये समाधान नांवाचं हॉटेल आहे. (फोन- (०२३५८) २३४५२६, २३४५६१). झटपट फ्रेश होवून, चहा घेउन मुरुड बीचवर गेलो. हंगाम असल्याने भरपूर सीगल्स होते.
प्रचि १