परशुरामाच्या भुमीत.....
प्रचि ०१
मे महिन्याच्या सुरूवातीलाच आलेल्या सलग सुट्ट्यांचा फायदा उचलत चार दिवस दापोली बाईक भटकंतीची योजना आखली गेली. तसंही ब-याच दिवसात कुठलीही भटकंती झाली नव्हती, त्यामुळे हे चार दिवस वाया जाऊ द्यायचे नाहीच असं मनोमन ठरवलं आणि दापोली तेही बाईकने जायचं ठरलं. माझ्या विशलिस्टमध्ये पावसाळ्यात माळशेज घाटात आणि कोकणात बाईकने जायचे हे होतेच. त्यापैकी पावसाळ्यात माळशेज घाटात ब-याचदा जाऊन आलो आता बाईक सफर करायची होती ती कोकणची. मुंबईहुन दापोली साधारण २२५ ते २३० किमी अंतरावर आहे. याआधीही मी दोनदा दापोली भटकंती करून आलो.
मुंबई, दापोली परीसर, केळशी, वेळास आणि पुन्हा मुंबई असा आमचा प्लान साधारण होता. पुढे त्यात थोडासा बदल करून कोस्टल रूटने प्रवास करायचा ठरलं.
मुंबई - पनवेल - माणगाव - आंबेत मार्गे दापोली, पन्हाळकाजी (मुक्काम) व तेथुन बुरोंडी - लाडघर - मुरूड कर्दे - पाळंदे (मुक्काम) - हर्णे - आंजर्ले - केळशी - वेळास - बाणकोट - वेसवी (वेसवीहुन जंगल जेट्टीने बाईक्स बागमांडला पर्यंत) - बागमांडला - हरीहरेश्वर (मुक्काम) - श्रीवर्धन - दिवेआगर - दिघी (बोटीने बाईक राजापुरी पर्यंत) - मुरूड (जंजिरा किल्ला) - नांदगाव - काशिद - बोर्ली मांडला - रेवदंडा - चौल - नागाव - आक्षी - आलिबाग - पेण पनवेल मार्गे मुंबई.
याच प्रवासातील काही क्षणचित्रे.
चला सफरीला......
प्रचि ०२
कड्यावरचा गणपती (आंजर्ले)
प्रचि ०२
बुरोंडी
प्रचि ०३
तामसतीर्थ (लाडघर)
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
पन्हाळेकाजी लेणी
प्रचि ०७
प्रचि ०८
हर्णे बंदर
प्रचि ०९
प्रचि १०
पाळंदे
प्रचि ११
सुवर्णदुर्ग आणि हर्णे गाव
प्रचि १२
पाजपांढरी गाव
प्रचि १३
उटंबर
प्रचि १४
श्री महालक्ष्मी मंदिर (केळशी)
प्रचि १५
केळशीचा समुद्रकिनारा
प्रचि १६
प्रचि १७
कोकणचा मेवा
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
रातांबे
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
(पूर्वप्रकाशित)
सुगंधीतकोकण
सोनचाफा
प्रचि ०२७
तामण
प्रचि २८
देवचाफा
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
किती सुंदर फोटो आहेत हे.
किती सुंदर फोटो आहेत हे. कोकणकिनारा कितीदा पाहिला तरी मन भरत नाही. दापोलीला अजुन कधी गेले नाही. आता नक्की जाणार.
सर्वच प्रचि नेहमीप्रमाणेच
सर्वच प्रचि नेहमीप्रमाणेच सुंदर!!!!!!!!!
नेहेमी प्रमाणे
नेहेमी प्रमाणे मस्तच....
एकतिसाव्या फोटोसाठी जोरदार निषेध>>>++१११११
मस्त प्रचि..
मस्त प्रचि..
दापोली माझ्या वडीलांचे
दापोली माझ्या वडीलांचे जन्मगाव त्यामुळे भावना दाटुन आल्या. आजही एक सात/बारा आमच्या उर्वरीत जमिनीचा ठाव ठिकाणा दर्शवितो.
उन्हाळा समुद्रकिनारी सुखावह नसला तरी दापोली उंचावर असल्यामुळे व अद्याप अमापवस्ती न झाल्याने बर्यापैकी सुखावह आहे.
दापोलीला जाऊन रहाणे फक्त विहीरींचे पाणी नसल्यामुळे उन्हाळ्यात त्रासदायक असते.
तामसतिर्थावर शामची आई या सिनेमाचे चित्रीकरण झाले होते. अश्या अनेक आठवणी जाग्रूत झाल्या. मी आता पक्का पुणेकर नव्हे तर चिंचवडकर झाल्याने जागा असुन दापोलीला पुन्हा जाऊन राहिन असे वाटत नाही. आता फारसे नातेवाईक नाहीत. एक मामा होता तोही हयात नसल्यामुळे दापोली हे स्वप्न रंजन आहे.
हॉटेलात रहाण्याचा मुड बनत नाही. सकाळी पक्षांच्या चिवचिवाटात उठावे, द्रोणीतल्या पाण्याने तोंड घुवावे. विहिरीतले पाणी लाटुन नारळ / सुपारीच्या फांद्या जाळुन तापणार्या बंबात नाहीतरी चुलीत अंघोळीला तापवावे. वाडीतुन फेरफटका मारावा. मामीच्या हातचे दडपे पोहे चापावेत. गावच्या वडीलधार्यांना नमस्कार करुन वाईच चा प्यावा. जालगावच्या गणपतीचे दर्शन घ्यावे. उत्सवाचे लळीत ऐकावे. भालदार/ चोपदार - पालखी डोळेभरुन पहावी हे सुख आता पारखे झाले आहे. मंत्र्यांसारखा दापोलीचा दौरा करण्यात काही गंम्त नाही.
मस्त फोटो. मला तर लेखाचे
मस्त फोटो. मला तर लेखाचे नावही (कोकणच्या गालावरची खळी - "दापोली") खूप आवडले. एकदम सूट होते
एकच नंबर! ............
एकच नंबर! ............ अप्रतिम ............ खुपच मस्त ...........
यो सॉलिड फोटोज .
यो सॉलिड फोटोज .
मलाही लेखाचे शीर्षक खूप भावले
मलाही लेखाचे शीर्षक खूप भावले आणि अर्थातच फोटोसुध्दा!
सुन्दर ,,,,,, कोकन खुनवतो
सुन्दर ,,,,,, कोकन खुनवतो आहे....
तुला काहीही दिलं तरी त्याचा
तुला काहीही दिलं तरी त्याचा प्रचि पण ऑसम काढतोस तू तर हे तर साक्षात कोकण!
फोटो मस्त आलेत हे वे सां न ल!
मस्त प्रचि , सुंदर कोकण. ३१
मस्त प्रचि , सुंदर कोकण.
३१ वा प्रचि टाकुन जळवतोयस ना ?
नेहमीप्रमाणेच सर्व फोटो
नेहमीप्रमाणेच सर्व फोटो सुरेख.
अप्रतिम !
अप्रतिम !
शब्दच नाहीत __/\__
शब्दच नाहीत __/\__
झक्कास फोटो
झक्कास फोटो
भारी रे... त्या गावाचा फोटो
भारी रे... त्या गावाचा फोटो अतिसुंदर
प्रची १६ मस्तच - अस्सल
प्रची १६ मस्तच - अस्सल कोकणाचा फील देणारा.
खल्लास रे खल्लास ......
खल्लास रे खल्लास ......
काय सुरेख फोटोज आजच दोन
काय सुरेख फोटोज
आजच दोन दिवसांची दापोली कर्दे सहल करून आलो परत. मस्त परिसर आहे. श्री ना पेंडसे पदोपदी आठवतात.
चिपळूणच्या हॉटेल अभिषेकचे इतके नाव ऐकले होते की प्रत्यक्ष नक्कीच तितके चांगले नसणार असे वाटत होते; पण असे काही झाले नाही सुदैवाने, अप्रतिम जेवण.
झकास... नेहमीप्रमाणे जिप्सि
झकास... नेहमीप्रमाणे जिप्सि टच..
प्रतिसादाबद्दल मनापासुन
प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद!!!
नितीनचंद्रजी, प्रतिसाद आवडला
योगेश.... योगायोग
योगेश....
योगायोग पाहा.....कालच मी आणि अमेय खेड तालुक्यातील जामगे या गावी भाचीच्या लग्नानिमित्ताने गेलो होतो. एक दिवस अगोदर गेल्यामुळे काहीसे पुढे जाऊन दापलो-कर्दे बीचवर अगदी आनंदाने तेथील शांतपणा अनुभवत होतो. दापोलीमार्गेच क्रर्देकडे गेलो होतो. खेडवरून तिकडे जाताना पाजपांढरी गाव लागले होते...समुद्रकिनार्यावरील वस्ती आणि हालचाली तुम्ही ज्या अधिकारवाणीने आणि सौंदर्य यथार्थ पकडून टिपल्या आहेत, तितकी कला आमच्या बोटी नसल्याने केवळ फोटो काढले आम्ही इतपतच म्हणू शकतो. आज तुमच्यातर्फे इथे सादर झालेले फोटोज पाहताना नेमक्या याच ठिकाणी आम्हीही या एकदोन दिवसात होतो हे आठवून अतिशय आनंद झाला.
चिपळूण येथील हॉटेल अभिषेक येथील जेवणही अप्रतिम असेच....तुम्हीही त्याचा आस्वाद घेतला असणारच. विविध मत्स्यप्रकारासोबत तिथे मिळालेल्या सोलकढीनेच गारेगार होऊन गेलो अगदी.
कोकणचे हे काही धागे, अर्थात
कोकणचे हे काही धागे, अर्थात त्यातल्या फोटोंना जिप्सीच्या फोटोंची सर नाहीच. एक | दोन | तीन | चार
अप्रतिम !
अप्रतिम !
क्या बात है!! सुरेख
क्या बात है!! सुरेख प्रकाशचित्रे!!
नितीनचंद्र यांचा प्रतिसादही आवडला.
अप्रतिम फोटोज हे कांय तुला
अप्रतिम फोटोज हे कांय तुला आता सांगायची गरज नाही ये
असेच निसर्गाचे दर्शन तुझ्या नजरेतून आम्हाला घडवत जा,
असंख्य शुभेच्छा
जीप्स्या तुम्ही २ मे रोजी पेण जवळून जाताना पाहिली होती ही गाडी (प्रची ३३)
झ्याक फोटो! ५, १० १७, २३, २७
झ्याक फोटो! ५, १० १७, २३, २७ विशेष आवडले. फिश थाळीचे तर कातिल! पुन्हा भूक लागली
अप्पाकाका, तुम्ही उदाहरणाखातर
अप्पाकाका, तुम्ही उदाहरणाखातर दिलेल्या (एकाच लेखकाच्या) धाग्यावरील फोटोही छान आहेत..
फोटोग्राफर आपली नजर, ज्ञान आणि फोटोग्राफी गिअर (कॅमेरा, लेन्सेस आणि एक्सेसरीज) नुसार हौसेने फोटो काढतो.. त्याची तुलना नको..
डीडी, अनेक धन्यवाद. त्यातला
डीडी, अनेक धन्यवाद. त्यातला फोटोग्राफर मीच होतो. जरा विनय दाखवला इतकेच.
Pages