Grey teal

Submitted by उनाड पप्पू on 19 April, 2015 - 03:15

Grey teal हा बदकाच्या कुटुंबातला एक पक्षी असून पंखांवर तपकिरी रंगाचे ठिपके आणि सफेद+हिरव्या रंगांचे पट्टे असतात. नर आणि मादी यांच्या रंगात फारसा फरक दिसून येत नाही. नराच्या चेहऱ्यावर आणि मानेवर थोडे फिक्कट रंग असतात. हा पक्षी त्याच्या आवडीच्या तलावा जवळ किंवा एखाद्या झुडुपात जमिनीवरच घरटे करून राहतो. आपल्या नेहमीच्या बदका सारखी पक-पक नसली तरी बऱ्यापैकी आवाज करणारा आहे, खास करून रात्रीच्या वेळी. यातही नराचा आवाज थोडा कमी आणि मंजुळ असतो तर मादीचा मात्र काही प्रमाणात कर्कश्श असतो.
अतिशय सुंदर आणि शांत असणारा हा पक्षी प्रकाशचित्रणासाठी उत्तम...

हे प्रकाशचित्रण करताना
कॅमेरा : canon 600D
लेन्स : Sigma 50-500mm f/4.5-6.3 APO DG OS HSM
वापरले.

IMG_1425-2.jpgIMG_1422.jpgIMG_1420-4.jpgIMG_1433.jpgIMG_1435.jpgIMG_1438.jpgIMG_1444.jpgIMG_1456.jpgIMG_1474.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी ... अबुधाबी मध्ये कोर्निश जवळ एक लेक-पार्क आहे. त्या पार्कातल्या छोट्याशा तलावात हा पक्षी विहार करताना आढळला.

मस्त

धन्यवाद मित्रहो .... प्रकाशचित्रणातील बारकावे आत्मसात करण्याचे प्रयत्न चालू आहॆत.