येडोबाच्या नावानं.........चांगभलं
Submitted by बाजीराव-अवी on 30 April, 2015 - 01:37
जवळपास सहा वर्षानंतर माझ्या आजोळी यात्रेला जाण्याचा योग आला. मा़झे आजोळ येराड ता. पाटण जि. सातारा हे श्री. येडोबा देवामुळे तिर्थक्षेत्र म्हणुन प्रसिध्द आहे. श्री.जोतिबा प्रमाणेच श्री. येडोबादेवाचे भक्तही संपुर्ण महाराष्ट्रात आहेत. दरवर्षी यात्रेला अलोट गर्दी असते. हनुमान जयंती म्हणजे पोर्णिमेपासुन यात्रा सुरु होते. पाच दिवस चालणार्या यात्रेत दोन दिवस सभिण्यांचे असतात. पहिल्या दिवसी धाकटा आणी दुसर्या दिवसी मोठा सभिणा, तिसरा दिवस देवाला पुरण पोळी वाहण्याचा तर बा़की दोन दिवस मोठा बाजार भरतो आणी पाचव्या दिवशी यात्रेची सांगता होते.
विषय:
शब्दखुणा: