मेळघाट मैत्री - आनंद मेळावा २०१६
मेळघाट मैत्री - आनंदमेळावा २०१६
मला गेले तीन वर्षे मेळघाटात जायला जमवता आले नव्हते. त्यामुळे मी यावर्षी अगदी ठरवलेच होते की आपण जाउन यायचे आणि अखेर तसे जमवलेच. मेळघाटातल्या ज्या शाळांमध्ये आपले काम चालते त्या सर्व मुलांकरता गेली ३-४ वर्षे दिवाळीनंतर एक आनंद मेळावा भरवला जातो. यावर्षी मला त्यात सहभागी होण्याचा योग होता.