Submitted by बेफ़िकीर on 11 June, 2015 - 13:56
नवी गझल - ओळखी, मैत्री, बहकणे, प्रेम इत्यादी
ओळखी, मैत्री, बहकणे, प्रेम इत्यादी
पावसाळ्याच्या चुकांची अर्धवट यादी
एकटा पडल्यामुळे मी हारलो होतो
पण तुझ्या हद्दीत माझी गाजली प्यादी
स्त्री कधी धजलीच नाही हे कळवण्याला
कोणत्या वेळी तिला मानू नये मादी
एकमेकांशी कधीही बोललो नाही
पण तरीही राहिले हे प्रेम संवादी
जग हवे तेव्हा मला लाथाडते आहे
ती हवे तेव्हा जगाला लावते नादी
हे कुठे सांगीतले होतेस तू गांधी
कंबरेखाली कधी नेसू नये खादी
लोक माझ्या रोज तक्रारी करत बसले
मी कुणापाशी करू ह्या सर्व फिर्यादी
कोणता इतिहास नोंदवणार आहे हे
कोण वादी व्हायचा अन् कोण प्रतिवादी
'बेफिकिर' होतास तू ह्या जीवनाबाबत
आणि चिंताक्रांत गाजवतात ही गादी
======================
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अ फ ट !!! निव्वळ अफाट. खूप
अ फ ट !!!
निव्वळ अफाट. खूप आवडला आशय.
एकटा पडल्यामुळे मी हारलो
एकटा पडल्यामुळे मी हारलो होतो
पण तुझ्या हद्दीत माझी गाजली प्यादी
लोक माझ्या रोज तक्रारी करत बसले
मी कुणापाशी करू ह्या सर्व फिर्यादी
कोणता इतिहास नोंदवणार आहे हे
कोण वादी व्हायचा अन् कोण प्रतिवादी
हे शेर आवडले...
तिस-या शेरामधील प्रतिपादन आवश्यक आहे काय? निर्णय आपला आहे.
अफाट.........लोटांगण....दंडवत
अफाट.........लोटांगण....दंडवत......काय जे म्हणाल ते....!!!
जबरी !
जबरी !
>>>तिस-या शेरामधील प्रतिपादन
>>>तिस-या शेरामधील प्रतिपादन आवश्यक आहे काय? <<< अत्यावश्यक आहे
अतिशय सुंदर बेफि
अतिशय सुंदर बेफि
अप्रतिम! दुसरा शेर खुप आवडला
अप्रतिम! दुसरा शेर खुप आवडला