“मैत्री शाळा 100 दिवसांची – आपल्या गावी” २०१४- २०१५
मेळघाट उपक्रमाचे स्वरूप.
मेळघाटामध्ये ‘मैत्री’चे काम सुरु झाले ते मुलांच्या व स्त्रियांच्या आरोग्यप्रश्नावर. ते काम पुढे नेत असताना मुलांच्या शिक्षणाची परिस्थिती अगदी बिकट आहे हे लक्षात येत होते. प्रत्येक गावात जिल्हापरिषदेची प्राथमिक शाळा असूनही मुलांना सातत्यपूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळत नाही हे सत्य डोळ्याआड करून चालणार नाही. सरकारी यंत्रणेला पर्यायी व्यवस्था करण्यामध्ये मर्यादा खूप येतात आणि बरेचदा स्वयंसेवी संस्थांचे उपक्रम हे बेटांसारखे राहतात. त्यामुळे सरकारी यंत्रणा अधिक परिणामकारक कशी होईल व ती होईपर्यंत मुलांना चांगले शिक्षण कसे मिळेल असा विचार आम्ही करत होतो.
आपल्या क्षमतेचा, बलस्थानांचा व मर्यादांचा नेमका अंदाज घेण्यासाठी पहिल्या वर्षी (२०११ -२०१२) आपण चिलाटी येथे संपूर्णपणे स्वयंसेवकांच्या मदतीने शाळाबाह्य ४० मुलामुलींकरता १०० दिवसांची निवासी शाळा चालवली. ते शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर पुढील वर्षाकरता आपण त्या सर्व मुलांना योग्य त्या आश्रम शाळेत प्रवेश मिळवून दिला. त्यानंतर २०१२-२०१३ मध्ये तीन गावांमध्ये जिल्हापरिषदेच्या शाळेत आपण वर्षभरात मिळून १०० दिवस स्वयंसेवक पाठवले. शिक्षक असताना त्यांना मदत करून व नसताना स्वत:च शिक्षक बनून आपण मुलांच्या शिकण्यामध्ये खंड पडू दिला नाही. त्या वर्षी सुमारे ७० विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचू शकलो. गेल्या वर्षीपासून (२०१३-२०१४) आपण १० गावांमध्ये स्थानिक युवकांच्या (गावमित्र) मदतीने शाळेला पूरक असे अभ्यासवर्ग व इतर उपक्रम यांची आखणी केली व त्यांच्या मदतीला १०० दिवस स्वयंसेवक गेले. याद्वारे सुमारे २०० विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचू शकलो आणि (गावमित्र) १० स्थानिक कार्यकर्ते शिक्षणाच्या कामासाठी तयार करू शकलो. स्थानिक कार्यकर्ते तयार होणे हे स्वयंसेवी कामामधील प्रमुख उद्दिष्ट असायला हवे कारण त्याशिवाय काम टिकाऊ होत नाही व दीर्घक़ाळ परिणाम करणारे पण होत नाही. यादृष्टीने गावमित्रांना बरोबर घेऊन शैक्षणिक उपक्रम चालवणे हीच दिशा आता आपण निश्चित केली आहे. त्याचे स्वरूप थोडक्यात असे आहे –
आराखडा शैक्षणिक वर्ष २०१४-१५
एकूण गावे – १०
कालावधी – जुलै २०१४ ते मे २०१५
एकूण स्वयंसेवक – ५५ (प्रत्येक महिन्यात ४ ते ५ या प्रमाणे वर्षभर)
एकूण मुले – २०० (अंदाजे प्रत्येक शाळेत 20 याप्रमाणे)
एकूण अपेक्षित निधी - अंदाजे रु. ७ लाख
वर्षभर गावमित्र आपापल्या गावातील शाळेत शाळेच्या आधी दीड ते दोन तास मुलांना भाषेची व गणिताची मूलभूत कौशल्ये शिकवतील.
दर महिन्यातून एक आठवडा ५ स्वयंसेवक पुण्यामधून जातील व या उपक्रमात सहभागी होतील.
स्वयंसेवक गावमित्रांना मदत करतील, शिक्षकाला मदत करतील, मुलांना हाताने करण्याच्या विविध कृती शिकवतील, गाणी शिकवतील, नाटके बसवून घेतील, गोष्टी वाचून दाखवतील.
वर्षातून दोन वेळा चिलाटी येथे आपण मुलांसाठी एकत्रित कार्यशाळा घेणार आहोत, त्यावेळी शाळेत शिकवल्या जाणा-या विषयांखेरीज इतर म्हणजे विज्ञानप्रयोग, आरोग्यशिक्षण, सर्जनशील कृती, खेळांच्या स्पर्धा इ कार्यक्रम असतील. स्वयंसेवकांचा यात पूर्णवेळ सहभाग असेल.
याशिवाय मुलांना शिकण्यात आनंद वाटेल अशी वेगवेगळी साधने पण स्वयंसेवक मेळघाटात व पुण्यामध्येही बनवतील.
गेल्या वर्षीप्रमाणेच चिलाटीमध्ये रमेश आणि अशोक या उपक्रमाचे समन्वयक म्हणून जबाबदारी घेतील. ते दोघे प्रत्येक गावात जाऊन गावमित्रांना मदत व मार्गदर्शन करतील. तसेच दर महिन्यात शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका घेतील, पालकांच्या बैठका घेतील.
मे महिन्यामध्ये प्रकल्पाचा आढावा घेऊन पुढील वर्षाचे नियोजन केले जाईल.
या वर्षाचे आपले उद्दिष्ट:
लहान गट
अंकओळख संपूर्ण (वाचन, लेखन ओळखणे)
शब्द व छोटी वाक्य वाचणे व त्यांचा अर्थ कळणे
मूळाक्षरे व शब्द लिहिणे
मोठा गट
लहान गटाची सर्व आणि त्याशिवाय
लहानशी गोष्ट वाचणे व अर्थ समजणे
एखाद्या विषयावर बोलणे (किमान 5 वाक्ये.)
ही उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या दृष्टीने आपण सुरुवातीपासून काम करणार आहोत. आपल्या मुलांचे नियमित परीक्षण करुन त्यांच्यात होणारे बदल टिपणार आहोत. गेल्या वर्षी झालेले विशेष चांगले बदल म्हणजे मुले शाळेत आपणहून येऊ लागली, गावमित्रांशी त्यांचे छान नाते जुळले आणि गावमित्रांमध्ये शिकवण्याच्या बाबतीत खूप आत्मविश्वास वाढला. आता त्यापुढे पावले टाकूया आणि मुलांची शैक्षणिक समज वाढेल, त्यांच्या शाळेच्या परीक्षेत लक्षणीय बदल दिसेल असे प्रयत्न आपण या वर्षी करणार आहोत.
यामध्ये कोणकोणत्या प्रकारे सहभागी होता येईल?
• स्वयंसेवक म्हणून 8 दिवस मेळघाटात प्रत्यक्ष जाणे
• या उपक्रमासाठी आर्थिक मदत करणे .
• एका मुलाच्या शिक्षणासाठी येणारा खर्च पूर्ण वर्षासाठी रु. 3513 /-
• एका मुलाच्या शिक्षणासाठी येणारा खर्च एका महिन्यासाठी रु. 293 /-
• एका स्वयंसेवकाचा खर्च (प्रवास, राहणे, जेवण) रु. 2600 /-
• एका शिबिराचा खर्च (200 मुलांकरता, जेवणासहित) रु. 62250 /-
• एका मुलाचा शिबिरासाठीचा खर्च (2 शिबिरे, जेवणासहित) रु. 623 /-
• एका गावामध्ये शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्यासाठी येणारा खर्च रु. 5950 /-
• एका गावमित्राच्या प्रशिक्षणाचा खर्च रु. 4800 /-
• काही विषयांवर सोपी चित्रे काढून देणे. (चित्रवाचन, कोरकू शब्द यादी बनवण्याकरता)
• मुलांना करता येतील अशा हस्तकलेच्या गोष्टी स्वयंसेवकांना शिकवणे.
• मुलांसाठी शैक्षणिक साधनांचे संच बनवून देणे.
• कोरकू-मराठी द्विभाषिक गोष्टीच्या पुस्तकांसाठी मदत करून – तीन पुस्तकांचा संच रु. 75/- (एका अथवा अनेक मुलांसाठीच्या संचाकरता आर्थिक मदत करुन)
• उपक्रमासाठी वस्तू रुपाने मदत करणे - पाठकोरे कागद, फाईल्स, चित्रकला/ हस्तव्यवसाय साहित्य
• उपक्रमाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे
मेळघाटात जाणार्या स्वयंसेवकांचे प्रशिक्षण
तुम्ही जाण्याच्या आधीच्या महिन्यात तिस-या रविवारी प्रशिक्षणाकरता किमान ३ तास यायचे आहे. तुम्ही मेळघाटात गेल्यानंतर काय काय करायचे आहे याबद्दल यावेळी सांगितले जाणार आहे, त्यामुळे हे चुकवू नये. तुम्ही भरून आणायच्या अहवालाचे नमुने तुम्हाला दिले जाणार आहेत. कदाचित तिथे नेण्याकरता काही साहित्य पण तुमच्या बरोबर दिले जाईल.
प्रत्यक्ष काम
मेळघाटात पोहोचणे
सर्वसाधारणपणे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी, स्वयंसेवक, संध्याकाळच्या गाडीने पुण्यामधून निघतील. रविवारी सकाळी ते परतवाडा येथे पोहोचतील आणि सकाळच्या 9 च्या एस. टी. बसने चिलाटीकडे निघतील. चिलाटीला दुपारी 1:30- 2:00 पर्यंत पोहोचतील.
प्रत्यक्ष काम
मुलांना शाळेत जाऊन शिकवणे
मुलांना बरोबर घेऊन गावमित्रांच्या मदतीने गावामध्ये काही काम करणे (शिक्षणाला पूरक असे)
मुलांना गाणी शिकवणे, गोष्टी वाचून दाखवणे
गावमित्रांना काही प्रमाणात मार्गदर्शन करणे
पुण्यात परत येणे
पुण्यातून निघाल्यापासून नवव्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी तुम्ही परत येण्याकरता चिलाटीमधून निघाल. त्याच दिवशी (रविवारी) संध्याकाळी / रात्री परतवाडा/अमरावती मधून बस /आगगाडीने निघून सोमवारी सकाळी पुण्यात पोहोचाल. चिलाटीला तयार केलेला अहवाल परत आल्यानंतर लगेच दुस-या दिवशी ‘मैत्री’ कार्यालयात पाठवावेत. (कोणी एकाने सर्वांचे आणून दिले तरी चालतात). प्रत्यक्ष येऊन देणे शक्य नसेल तर स्कॅन करुन इमेल द्वारा पाठवावेत. मात्र लगेच दुसऱ्या दिवशी हे काम आठवणीने करावे.
आल्यानंतरच्या रविवारी (महिन्याच्या तिसर्या) सकाळी जाउन आलेल्या सर्व स्वयंसेवकांनी ‘मैत्री शिक्षण’ गटाच्या बैठकीला यावे त्याच दिवशी पुढच्या महिन्यात जाणाऱ्या नवीन बॅचची मंडळी पण हजर असतात. त्यायोगे आपला अनुभव व अभिप्राय त्यांना ऐकायला मिळतो. असे केल्याने तिकडे जाणाऱ्या नवीन स्वयंसेवकांना त्या त्या वेळच्या स्थितीचे नीट आकलन होऊ शकते.
स्वयंसेवक वेळापत्रक
गट महिना पुण्यामधून संध्याकाळी निघून पुण्यात सकाळी पोहोचे पर्यंत
1 (जून-जुलै) २०१४ २८ जून (शनि) ते ७ जुलै (सोम)
2 ऑगस्ट २०१४ २ ऑगस्ट (शनि) ते ११ ऑगस्ट (सोम)
3 सप्टेंबर २०१४ ६ सप्टें (शनि) ते १५ सप्टेंबर (सोम)
4 ऑक्टोबर २०१४ ४ ऑक्टोबर (शनि) ते १३ ऑक्टोबर (सोम)
5 नोव्हेंबर २०१४ २६ ऑक्टोबर (रवि) ते २ नोव्हेबर (रवि) शिबिर
6 डिसेंबर २०१४ ६ डिसेंबर (शनि) ते १५ डिसेंबर (सोम)
7 जानेवारी २०१५ ३ जानेवारी (शनि) ते १२ जानेवारी (सोम)
8 फेब्रुवारी २०१५ ७ फेब्रुवारी (शनि) ते १६ फेब्रुवारी (सोम)
9 मार्च २०१५ ७ मार्च (शनि) ते १६ मार्च (सोम)
10 एप्रिल २०१५ ४ एप्रिल (शनि) ते १३ एप्रिल (सोम)
11 मे २०१५ ३० एप्रिल (गुरु) ते ०९ मे (शनि) शिबिर
(एखाद्यावेळी या वेळापत्रकात बदल होऊ शकतो) पण सध्या तरी सगळे सण सुट्ट्या पाहून हे आखले आहे)
स्वयंसेवकांची नावनोंदणी
• तुमची जाण्याची तारीख निश्चित झाली की ‘मैत्री’ कार्यालयात येऊन तुम्ही तुमची माहिती एका संमतीपत्रात भरून द्यायची आहे. त्याचवेळी तुम्ही नवीन असाल तर मेळघाटाविषयीची माहिती तसेच तिथे काय करायचे, काय टाळायचे हे तुम्हाला सांगितले जाईल.
• वैशाली कणसकर अथवा मधुकर माने ‘मैत्री’ कार्यालयात तुम्हाला भेटतील व माहिती देतील.
• तुमचे जाण्यायेण्याचे तिकीट पण लवकरात लवकर काढावे. तसेच मेळघाटामधील राहणे व जेवणाचे शुल्क दर दिवशी रु. 100 /- याप्रमाणे प्रत्येकाने कार्यालयात जमा करावे.
• ‘मैत्री’ कार्यालयात नावनोंदणी अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे सोम. ते शुक. 10:00 ते 5:00 किंवा शनिवारी 9:00 ते 12:00 या वेळात केव्हाही तुम्ही जाऊन हे करावे.
संपर्कासाठी: मैत्री कार्यालय - ०२० २५४५०८८२/ ७५८८२८८१९६ (वैशाली, मधू, लीनता ),
अश्विनी धर्माधिकारी : ९४२२० २५४३१
MAITRI : 32, ‘Kalyan’, Nataraj Society, Karvenagar, Pune 411052.
Phone: +91-20-25443134, Office: +91-20-25450882
Email : maitri1997@gmail.comwww.maitripune.net
Regn. No.: E 2898/PUNE.
मला इथे आपल्या मायबोलीकरांनी केलेल्या मदतीचा उल्लेख कृतज्ञतापुर्वक करणे औचित्यपुर्ण वाटते. त्यांनी मदत केली तेव्हा मी त्यापैकी कुणालाच समक्ष भेटलेलो नव्हतो. अजूनही असे काही जण आहेत ज्यांना मी भेटू शकलेलो नाहीये. त्या सर्व हितचिंतकांना भेटण्यास मी व मैत्री परिवार उत्सुक आहोत. त्याच बरोबर मी सर्वच मायबोलीकरांना आवाहन करतो की त्यांनी पुणेस्थित मैत्री-कार्यालयाला जरूर भेट द्यावी.
मायबोलीवर असलेले याआधीचे लेख
http://www.maayboli.com/node/39286
http://www.maayboli.com/node/44146
http://www.maayboli.com/node/45066
http://www.maayboli.com/node/49301
इथे वेळापत्रक कोष्टक स्वरुपात
इथे वेळापत्रक कोष्टक स्वरुपात देता येत नाहीये, ज्यांना तिकडे जाण्यात रुची असेल त्यांनी मला विपु केली तर त्यांना ईमेलमार्फत सविस्तर वेळापत्रक पाठवता येईल.
जून-जुलै साठी स्वयंसेवक मिळाले आहेत, ऑगस्ट मधे जाणारे स्वयंसेवक हवे आहेत, नोंदणी चालू आहे.
धन्यवाद
धन्यवाद माहितीबद्दल.
धन्यवाद माहितीबद्दल.
धन्यवाद हर्पेन !
धन्यवाद हर्पेन !
मैत्रिणीला लिंक पाठवली आहे.
मैत्रिणीला लिंक पाठवली आहे. तिला शिकवायच्या उपक्रमात काम करायचे आहे असे ती मागे म्हणाली होती.
धन्यवाद अकु मित्रांनो,
धन्यवाद अकु
मित्रांनो, आपापल्या मित्र मंडळानो, चेपु च्या भिंतीवर ह्या लेखाला मुक्तहस्ते फिरवाल तर बरे होईल.
उपक्रम अतिशय सुंदर व
उपक्रम अतिशय सुंदर व वाखाणण्यासारखेच आहेत तुमचे. कुवैत ला असल्यामुळे कसे सहभागी होता येईल असा विचार करतेय. सप्टेंबर च्या दुसऱ्या आठवड्यात पुणे भेट आहे माझी...तेंव्हा कार्यालयात नक्की येईन...
धन्यवाद हर्पेन. तपशीलवार
धन्यवाद हर्पेन. तपशीलवार कार्यक्रम मिळाल्यामुळे काही विचार करणे, ठरवणे सोपे होणार आहे.
हर्पेन, ईमेल केली आहे ....
हर्पेन, ईमेल केली आहे .... रि आला की पुढचे काम करीन ...
धन्यवाद जुईली, आपले स्वागतच
धन्यवाद जुईली, आपले स्वागतच होईल.
सई तपशीलवार कार्यक्रम सगळ्यांनाच सोयीचा पडतो. रजा टाकायला.....
जमले तर एखादा महीना मायबोली करांचा ठरवता येईल का ते बघूया का? कशी वाटते कल्पना...
मेळघाट गटग
सुहास्य, मेल अजून बघीतली नाहीये, रात्री बघतो आणि उत्तर देतो
हो हर्पेन, हरकत नाही विचार
हो हर्पेन, हरकत नाही विचार करायला. गटग पेक्षाही एकमेकांना ओळखणारे लोक सोबत असतील तर कामात जास्त सहजता येईल असं वाटतं.. दिवाळीच्या आसपास बघू या जमतंय का.
धन्यवाद हर्पेन. स्वयंसेवक
धन्यवाद हर्पेन. स्वयंसेवक म्ह्णून जायची इच्छा तर होती, पण सध्या कार्यबाहुल्यांमुळे ते शक्य नाही. तुला फोन करुन सविस्तर सांगेनच..
बँक डिटेल्स टाकायचे राहीले
बँक डिटेल्स टाकायचे राहीले होते.
तर हे घ्या,
ONLINE DOMESTIC DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank
Branch: Kothrud, Pune
Account Number : 01491450000152
Account Name: Maitri
MICR: 411240009
Details for RTGS / NEFT / IFS Code : HDFC0000149
सुहास्य मला मेल मिळालीच
सुहास्य मला मेल मिळालीच नाहीये, परत एकदा पाठवाल का?
सई - अगं गटगाचे मी असेच बोललो होतो, पण नक्की बघुया, दिवाळीच्या आसपास जमतय का ते!
पिंगु - तुझ्या फोनची वाट बघतो!
वस्तुरुपाने किन्वा आर्थिक मदत
वस्तुरुपाने किन्वा आर्थिक मदत करता येइल मैत्री कार्यालयात जाउन आल्यावर कळवतो.
लिन्क शेअर करत आहे.
धन्यवाद जम्बो
धन्यवाद जम्बो
जुलैची बॅच जाऊन आली.
जुलैची बॅच जाऊन आली. ऑगस्टसाठी नोंदणी केलेल्या दोन स्वयंसेवकांना प्रचंड पावसामुळे (व ते दोघेही ज्ये. ना. असल्यामुळे) नंतर पाठवायचे घाटत आहे, तरी एकूण ५ स्वयंसेवकांची गरज आहे, १५ ऑगस्ट आणि पतेती च्या सुट्ट्यांना जोडून जायचे असल्यास तशी लवचिकता दाखवण्यात येईल.
आहेत का कोणी जाऊ इच्छीणारे स्वयंसेवक?
हर्पेण, मी प्रत्यक्ष जाउ शकत
हर्पेण,
मी प्रत्यक्ष जाउ शकत नाही. आर्थिक मदत करायची इच्छा आहे. मंगळवारी असेल न कोणीतरी कार्यालयावर ? फोन करुन यावे लागेल का?
अतरंगी, फोन करून जाणे हे
अतरंगी, फोन करून जाणे हे उत्तम धन्यवाद
अतरंगी, मैत्री ऑफीस मधे चौकशी
अतरंगी, मैत्री ऑफीस मधे चौकशी केली आणि उद्या ते चालू आहे अशी माहीती मिळाली. तेव्हा खुशाल जा.