गेल्या डिसेंबर मधे केप टाऊन ची ट्रिप झाल्या नंतर बर्याच दिवसात कुठे फिरायला जायला मिळाले नाही. परत एकदा क्रुगरची ट्रिप करायची आहे पण त्या साठी ३/४ दिवसांची सलग सुट्टी मिळाली पाहीजे जी सध्या तरी शक्य नाही.
अगदीच काही नाही त्या पेक्षा दुधाची तहान ताकावर भागवावी म्हणुन गेल्या विकांताला पिलानसबर्ग नॅशनल पार्क ची एक दिवसाची ट्रिप केली.
होली है !!!!!!!!
१)
२)
तीन भटके....कोण ते ??
- - - - - - - - - - -
शर्यत रे आपुली..... हवेतली....
(सुन्या, जिप्सी आणि मि.रॉक्स)
दोन योगेशनी इथे मस्त विश्वदर्शन घडवलेच आहे, माझाही खारीचा वाटा.
ऑकलंडमधल्या शेवटच्या दिवशी मी म्यूझियममधे होतो, ते आधी लिहिलेच आहे.
त्या म्यूझियमच्या टेकडीच्या पायथ्याशी, विंटरगार्डन नावाची वास्तू आहे. बसमधल्या
ऑटो गाईडने, उद्यानांची आवड असणार्यांनी तिथे अवश्य जावे असे सूचवले होते. (मला तो इशारा पुरेसा होता.)
तर लांबून काचेची इमारत आतमधे काय असेल याचा पत्ता लागू देत नव्हती. आणि
जवळ गेल्यावर मात्र, मला अलिबाबाची गुहा सापडल्यासारखेच झाले.
काचेचे अर्धगोलाकार छत असलेली एक इमारत, मधे मोकळी जागा, आणि मागे पुन्हा
तसलीच एक इमारत, एवढा पसारा.
रविवार, ४ मार्च रोजी 'बांधण जनप्रतिष्ठान' आयोजित पुण्यात झालेल्या चौथ्या 'गजलोत्सवा'तील ही काही प्रकाशचित्रे! यात अनेक माबोकरही होते, म्हणून इथे फोटो पोस्ट करत आहे. (जागेवरून अजिबात न उठता (कंटाळा!) कॅमेर्यातील उपजत झूमची देणगी वापरून सर्व फोटो घेतले गेले आहेत). मी उद्घाटन व पहिल्या मुशायर्यापर्यंत होतो, त्यामुळे तेवढेच फोटो माझ्याकडे आहेत. (सुटकेचा नि:श्वास अनुल्लेखित! ;))
प्रचि१: सुंदर, आकर्षक आणि नेत्रसुखद नेपथ्य -
मुन्नारमध्ये गेलात तर तेथील प्रसिद्ध अशा हॉर्टीकल्चर गार्डन ला जरुर भेट द्यावी.. इथे गेलो असता रंगीबेरंगी फुलांमध्ये रंगपंचमी खेळतोय असे भासत होते.. मी तर म्हणेन अशा गार्डनसाठी एक अख्खा दिवस द्यावा तरच समाधान होईल.. त्या फुलांना जवळून पाहताना तर आपणही भ्रमर बनुनी फुलांच्या पाकळ्यांमध्ये खेळावेसे वाटत होते... येथील प्रवेश शुल्क केवळ दहा रुपये व कॅमेर्यासाठी दहा रुपये.. इथे काही वनस्पतींची विक्रीदेखील होते..
|| श्री ||
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मागच्या आठवड्यात श्री अष्टविनायक मधील तीन गणपती (श्री क्षेत्र पाली, महड आणि मोरगाव), श्री क्षेत्र देहु - आळंदी, श्री क्षेत्र ज्योतिर्लिंग श्री भीमाशंकर, श्री बालाजी मंदिर, केतकावले गाव, श्री एकमुखी दत्त मंदिर, नारायणपुर, श्री अष्टविनायक मंदिर श्री क्षेत्र मोरगाव, व आमचे कुलदैवत श्री क्षेत्र जेजुरी चा खंडोबा येथे जाऊन येण्याचे योग आले.
माझे हे अनुभव, माझ्या सर्व मायबोलीकर मित्र मैत्रिणिंसाठी प्रकाशचित्र स्वरुपात share करत आहे.
अष्टविनायक श्री क्षेत्र पाली येथे असलेले डोंगर