भाग - १ येथे पहा - http://www.maayboli.com/node/32463
भाग - २ येथे पहा - http://www.maayboli.com/node/32483
भाग - ३ येथे पहा - http://www.maayboli.com/node/32508
प्रथम हा भाग टाकावयास ऊशीर झाल्याबद्दल क्षमस्व. कारण मध्यंतरी आम्ही सेनापती तसेच केदार यांचे बरोबर पानिपतावर गेलो होतो. तेथे आम्ही सर्वजण २५० वर्षांपूर्वी झालेल्या एका महाभयंकर युद्धावर समग्र चर्चा करण्यामध्ये व्यग्र होतो. तसेच पु. ल. देशपांडे या महान लेखकाच्या कलाकृतींवर एक सिनेमा आल्यामूळे त्यांच्याबद्दलचा आदर, त्यांच्याच शब्दातील ५० विनोदी किस्से प्रकाशीत करुन व्यक्त करुन घेतला. असो.
ऑकलंड शहरातच एका टेकडीवर ईडन गार्डन ही बाग निर्माण केली आहे. इथे आधी दगडाची खाण होती. ती बंद पडल्यावर एका खाजगी संस्थेमार्फत ईथे उद्यान विकसित केले गेले आहे.
तिकिटाच्या ऐवजी आपल्याला बागेचा नकाशाच मिळतो. तिथे ऋतूमानानुसार वेगवेगळी फुले फुलतात. सध्या लिटिल किसेस नावाची देखणी फुले आहेत (जानेवारी २०१२ ) तिथे ट्यूलिप्स पण भरभरुन फुलतात (साधारणपणे संप्टेंबर मधे)
बागात व्यवस्थित आखलेल्या वाटा आहेत. आपण त्या मार्गे डोंगरावर जाऊ शकतो. चढ जरा तीव्र आहे.
पण तशा सूचना तिथे आहेतच. (तब्येत ठिक आहे ना ? पायात बूट आहेत ना ? वगैरे. तिथे अनवाणी चालण्याची फॅशन आहे. मी पण तिथे तसाच भटकायचो,)
शनिवारी मायबोलीकर आशुतोष, इंद्रधनुष्य, ललिता, स_सा, कांदेपोहे यांच्या बरोबर "भिगवण" येथे पक्षी निरीक्षणाला जाण्याचा योग आला. या सार्यांच्या सोबत बर्याच नवीन पक्ष्यांची माहिती/नावे समजली. यातील कित्येक पक्षी तर मी पहिल्यांदाच पाहत होतो. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो तितकेसे खास नाही आलेत, म्हणुन हे फोटो मायबोलीवर प्रदर्शित करणारच नव्हतो :-), पण काही माबोकरांच्या आग्रहास्तव हा चित्रप्रपंच. :-).
या सर्व पक्ष्यांना प्रत्यक्ष पाहणे वर्णनातीत आहे. Rudy Shelduck, Stork आणि Purple Moorhen यांना प्रत्यक्ष उडताना बघणे हा एक जबरदस्त अनुभव आहे. पक्षी निरीक्षणाची आवड असेल तर हा भाग Must Watch!!!! ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रचि ०१
यावेळी भारतात जाताना, मालेश्वरला जायचे असे ठरवले होते. माझी आजी तिथे जात असे, त्यावेळी तिथे जायची वाट फार अवघड होती, असे ती सांगत असे. पुढे मिलिंद गुणाजीने काढलेला तिथल्या धबधब्याचा फोटो पण बघितला होता, पण माझे तिकडे कधीच जाणे झाले नव्हते.
मग इथे नंदीनी आणि जिप्सी ने पण लिहिले होते, या सगळे वाचून मला आपण अजून का गेलो नाही, असे वाटत राहिले.
मकरसंक्रांतीला श्री मार्लेश्वराचे गिरिजेशी लग्न लागते आणि त्यानिमित्त जत्रा असते ते माहीत होते पण यावर्षी मकरसंक्रांत १५ जानेवारीला येणार आहे ते लक्षात आले नाही. त्यामूळे आम्ही गेलो होतो तो दिवस, नेमका मंगलसोहळ्याचा होता. आणि वेळही शुभमुहुर्ताची.
भाग - १ येथे पहा - http://www.maayboli.com/node/32463
बेडसे लेण्याच्या पायथ्यापाशी एक "पवना हट्स" नावाच्या रेसॉर्टला नाष्त्यासाठी ठीक ८:३० वा. पोहोचलो. ते एक चांगले ठीकाण आहे. नाष्त्याची क्वॉलिटी बघून दुपारच्या जेवणाचीसुध्धा त्यांनाच ऑर्डर दिली. ---------------पुढे चालु -
माझा यावेळचा भारत दौरा आणि पुढचा न्यू झीलंडचा दौरा खुपच अविस्मरणीय झाला. पहिले कारण
म्हणजे तीन तीन गटग झाली,शिवाय यावेळी न्यू झीलंड मधे जास्त दिवस मुक्काम करता आला आणि लेकीसोबत मनसोक्त भटकता आले.
गेलो त्या दिवशीच, घरी बॅग ठेवली आणि लगेच ठाण्याला जिप्स्याचे प्रचि प्रदर्शन बघायला गेलो. त्याबद्दल त्याने लिहिलेच होते. मामी, मोनालि, इंद्रा पासून थेट पंत, सेनापती असे सगळे भेटले. आणि
माझा जूना मायबोलीकर मित्र, बाँबे व्हायकिंग सहकुटुंब आला होता. निव्वळ त्या गटगची बातमी वाचून तो आला होता. खुप छान वाटले सगळ्यांना भेटून. तिथेच निसर्ग उद्यानातल्या गटगची चर्चा झाली होती.
०२ फेब्रुवारी, २०१२ रोजी आमच्या कंपनीच्या फोटोग्राफी क्लबचे वन डे एक्सकर्शन (एकदिवसीय भ्रमण) झाले. सकाळी ६:०० वा. पुण्यातून निघुन ६:४५ वा. कंपनीच्या प्रवेशदद्वाराशी पोहोचलो. तेथे पिंपरी - चिंचवड येथील ऊरलेल्या लोकांना घेऊन ठीक ७:०० वा. बेडसे लेण्यांसाठी प्रस्थान ठेवले. बेडसे लेण्याच्या पायथ्यापाशी एक "पवना हट्स" नावाच्या रेसॉर्टला नाष्त्यासाठी ठीक ८:३० वा. पोहोचलो. ते एक चांगले ठीकाण आहे. नाष्त्याची क्वॉलिटी बघून दुपारच्या जेवणाचीसुध्धा त्यांनाच ऑर्डर दिली. त्याचे हे काही फोटो.
![_MG_1594.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u36908/_MG_1594.JPG)
हंपी म्हटले कि लहानपणी ईतिहासाच्या पुस्तकात पाहिलेला उग्र नरसिंहाचा पुतळा आठवायचा. हंपी ला भेट देण्याचा विचार बरेच दिवस मनात होता. हा योग डिसेंबर २०१० मध्ये आला. हंपी कर्नाटकाच्या उत्तरेला आहे. इथले सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे होस्पेट.
हंपी तुंगभद्रा नदीच्या किनारी वसले आहे. सध्याचे हंपी म्हणजे पुर्वीचे विजयनगर (विजयनगर साम्राज्याची (१३३६-१५६५) राजधानी) आणि विजयनगर साम्राज्य म्हणजेच रामायणात उल्लेख असलेले किष्किंधा राज्य. इथे सर्वत्र विजयनगर साम्राज्याचे भग्नावशेष विखरुन पडले आहेत.
ईथे झालेल्या उत्खननात आदिमानवाने वापरलेली भांडी, भित्तीचित्रे ईत्यादी सापडली आहेत.
जानेवारी महिन्यातील १४ आणि १५ तारखेला ऑफिसच्या सहकर्मचार्यांसोबत पुन्हा एकदा राजमाचीला जाण्याचा योग आला. यात काहि जण सहकुटुंब आले होते. अगदी दिड वर्षाच्या जुळ्या शौर्य आणि शौनकसहित बरीच बच्चे कंपनी होती. मनरंजन गडावर मकरसंक्रांतीच्या निमित्ताने साजरा केलेला पतंगोत्सव, रात्री टेलीस्कोपने आकाशदर्शन आणि नंतर उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा खात कॅम्पफायर अर्थात सोबत राजमाचीच्या दोन बालेकिल्ल्याची (मनरंजन आणि श्रीवर्धन) यामुळे पुन्हा एकदा हा ट्रेक आठवणीत राहिला.
त्याच आठवणी प्रचि रूपात. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रचि ०१