ऑकलंड शहरातच एका टेकडीवर ईडन गार्डन ही बाग निर्माण केली आहे. इथे आधी दगडाची खाण होती. ती बंद पडल्यावर एका खाजगी संस्थेमार्फत ईथे उद्यान विकसित केले गेले आहे.
तिकिटाच्या ऐवजी आपल्याला बागेचा नकाशाच मिळतो. तिथे ऋतूमानानुसार वेगवेगळी फुले फुलतात. सध्या लिटिल किसेस नावाची देखणी फुले आहेत (जानेवारी २०१२ ) तिथे ट्यूलिप्स पण भरभरुन फुलतात (साधारणपणे संप्टेंबर मधे)
बागात व्यवस्थित आखलेल्या वाटा आहेत. आपण त्या मार्गे डोंगरावर जाऊ शकतो. चढ जरा तीव्र आहे.
पण तशा सूचना तिथे आहेतच. (तब्येत ठिक आहे ना ? पायात बूट आहेत ना ? वगैरे. तिथे अनवाणी चालण्याची फॅशन आहे. मी पण तिथे तसाच भटकायचो,)
पहिला भाग इथे आहे. http://www.maayboli.com/node/22893
दुसरा भाग इथे आहे. http://www.maayboli.com/node/22950
तिसरा भाग इथे आहे. http://www.maayboli.com/node/23011
त्या बोटॅनिकल गार्डन मधे, सगळीकडे फूलझाडे विखुरलेली आहेत. गुलाबाची झाडेही तशीच. पण एका ठिकाणी मात्र त्यांचा अप्रतिम संग्रह आहे.
त्यांची लागवड पण अत्यंत कलात्मकतेने केलेली आहे. त्यांचे विभाग आहेत ते रंगानुसार. म्हणजे एका विभागात एकाच रंगाच्या गुलाबांची झाडे. मग त्यात पाकळ्यांच्या वेगवेगळ्या रचना, आकार आणि संख्या. त्यातल्या पायवाटाही अशा रचल्या आहेत, कि प्रत्येक फूलाचे निरिक्षण करता यावे.
पहिला भाग इथे आहे. http://www.maayboli.com/node/22893
दुसरा भाग इथे आहे. http://www.maayboli.com/node/22950
ऑकलंड बोटॅनिकल गार्डन हे शहराला लागूनच आहे. ६४ हेक्टर्सवर पसरलेली हि बाग म्हणजे माझ्यासाठी स्वर्गच होता. नैसर्गिक उंचसखल भागांचा वापर करुन हि बाग वसवली आहे आणि त्यात नवनवीन विभागाची भर पडतेय.
आणखी एक नवलाची बाब म्हणजे या बागेसाठी कुठलीही प्रवेश फ़ी नाही.
सध्याच्या दिवसात, तिथे हवामान खूपच उष्ण असते. उन्हात गेल्यास चटका बसतो तर सावलीत थंडी वाजते.
पहिला भाग इथे आहे. http://www.maayboli.com/node/22893
ऑकलंडला माझे वास्तव्य, नॉर्थ शोअर भागात असे. तिथे ताकापूना नावाचे एक छोटे उपनगर आहे.
बस बदलायला वगैरे आम्हाला तिथे जावे लागे. तिथे एक समुद्रकिनारा आहे, आणि त्या किना-या
समोर एक पसरट डोंगर आहे. सगळीकडून हा डोंगर दिसत राहतो.
त्या ताकापूना गावात छान फूलबागा आहेत. मी त्यातल्या प्रत्येक फूलाचे फोटो काढले, हे वेगळे
सांगायला नकोच. माझ्या सकाळच्या फेरफटक्यातही, काही अनोखी फूले दिसत असत. पण ते
सगळे फोटो इथे द्यायचा मोह आवरुन काही मोजकेच देतोय.
लेकीच्या आग्रहावरुन आम्ही दोघे, मिशन बे भागात फिरायला गेलो होतो. तिथे जाण्यासाठी त्यांच्या
यावेळेचे फोटो मला टप्प्याटप्यात दाखवावे लागणार आहेत. बरेच आहेत आणि निवड करणे कठीण आहे.
क्वांटासने दिलेला ताप वाचला असेलच, पण तो सोडला तर बाकी ट्रिप, अविस्मरणीय झाली. यावेळेस तिथल्या सार्वजनिक वाहनांचा म्हणजे बस सेवेचा भरपूर फायदा करुन घेतला. नाताळच्या सुट्टीमूळे रेल्वेसेवा बंद होती (पण त्यासाठी समांतर बससेवा होती.)
तिथल्या बससेवेचे नेटवर्क चांगले आहे. अमुक ठिकाणाहून तमुक ठिकाणी जाण्यसाठी, कुठल्या बसेस आहेत आणि त्यांच्या वेळा काय आहेत, याची माहिती, नेटवर वा सेलफोनवर मिळू शकते.
आणि यावेळी, मला फिरवण्याची जबाबदारी लेकीने घेतली होती. आणि तिने ती उत्तमरित्या पार पाडली.