पहिला भाग इथे आहे. http://www.maayboli.com/node/22893
दुसरा भाग इथे आहे. http://www.maayboli.com/node/22950
तिसरा भाग इथे आहे. http://www.maayboli.com/node/23011
चौथा भाग इथे आहे, http://www.maayboli.com/node/23039
पाचव्या भागाचा पहिला भाग इथे आहे, http://www.maayboli.com/node/23131
संदर्भाच्या सोयीसाठी अनुक्रमांक पहिल्या भागापासून पुढे सुरु करतो.
इथला एखादा फोटो तूम्हाला आवडला नाही तर तो खुशाल माझ्या फोटोग्राफीचा दोष समजा. (तशी कारणे अनेक, प्रकाशाची दिशा, उंची, पार्श्वभूमीचे रंग वगैरे ) पण तिथले एखादे फूल सौंदर्यात उणे होते, असे मात्र म्हणू नका. (दिल टूट जायेगा यार, मेरा भी और उनकाभी !)
या फोटोंची एक कमतरता म्हणजे यावरुन तूम्हाला फूलांच्या मूळ आकाराची कल्पना येणार नाही. काही फूले २ मिमी व्यासाची तर काही १२ सेमी व्यासाची. इथे मात्र त्या सगळ्यांना एकाच आकारात बसवावे लागलेय.
दुसरे म्हणजे या फोटोवरुन, ते फूल ज्या झाडाला वा रोपट्याला लागले होते, त्याचीही कल्पना येणार नाही. तसा प्रयत्न मी एका फोटोच्या बाबतीत करतोय.
तर हे खरडणे आटोपते घेतो आता.
चला फेरफटका मारु या !!
४३.
४४.
४५.
४६.
४७.
४८.
४९.
५०.
५१.
५२.
५३.
५४.
५५.
५६.
५७. हि फूले तिथल्या टॉयलेटच्या कुंपणावर होती. काश, मी तूम्हाला या फूलांचा क्लोजप पण दाखवू शकलो असतो तर !!
५८.
५९.
६०.
६१,
६२.
६३. हे फूल १२ सेमी व्यासाचे होते !
६४.
६५.
६६.
६७.
६८.
६९. हे वरचे फूल जा झाडाला लागले होते त्याचे झाड बघा @
७०. या फूलाचा आकार माझ्या ओंजळीएवढा होता.
७१.
७२.
७३. या फूलांचा रंग खरेच इतका फ्ल्यूरोसंट होता.
७४.
७५.
७६.
७७.
७८.
७९.
८०.
८१.
८२.
८३.
८४.
तर हा ८४ फूलांचा नजराणा. असलेच तर यापुढचे जन्म मला या फूलांचे मिळावेत. (क्षणभंगुर असले तरी इतके सुंदर आणि अर्थपूर्ण जीवन !) मी भारावलो / हरखलो हे खरे आहे. पण त्याचे कारण हि फूले असण्यापेक्षा, त्यांचे एका ठिकाणी असणे हे होते. मी अजूनही उत्तर भारत बघितला नाही, पण आपल्या महाराष्ट्रातच अशी अनेक फूले फूलतात. त्यातल्या २५०० पेक्षा जास्त फूलांचे तर फोटोच आहेत माझ्याकडे. पण ती अशी एका ठिकाणी बघायला मिळती तर ?
आणि जी आहेत तिही सहजासहजी दिसत नाहीत (इथल्या भटक्यांच्या संग्रहात नेहमी तिच घाणेरीची फूले दिसतात, ती यामूळेच.. )
तर एवढे बोलून मी आपली रजा घेतो, (कारण झोपायची वेळ झाली.... )
दिनेशदा, काय फोटो आहेत ४६,४९,
दिनेशदा, काय फोटो आहेत ४६,४९, ७३ तर एकदम मस्त. क्रुपया कुठली फुले आहेत ते पण सांगा ( मला फुलातले रंग आणि वास याव्यतिरीक्त का.......................................हि कळत नाहि) अप्रतिम फोटो .
साक्षी, नावे कुठली ? कोई नाम
साक्षी, नावे कुठली ? कोई नाम ना दो, हेच खरे !!
मस्त फोटोज , कोई नाम ना दो,
मस्त फोटोज ,
कोई नाम ना दो, हेच खरे !! >>> भावनिक पातळीवर हे खर असलं तरी , मायबोलीकरांसाठी तरी दिनेश खरच नाव हवीत फुलांना . एक छान माहीती संग्रह बनेल हा.
अप्रतिम. हि सिरीज खरंच खजिना
अप्रतिम.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हि सिरीज खरंच खजिना आहे.
श्री, तिथे अनेक फूलांच्या
श्री, तिथे अनेक फूलांच्या नावाच्या पाट्या होत्या हे खरं. पण ती नावे लॅटीनमधली किंवा स्थानिक भाषेतील होती. त्यातून काही अर्थबोध झाला नसता. ती नावे लिहून घ्यायचा मी आळस केला, कारण हाताशी काही साधन नव्हते.
पण त्यातील काही फूलांबद्दल मी सविस्तर लिहिणार आहे. (त्या फूलांचे फोटो इथे दिलेले नाहीत.)
खरंच अप्रतिम आहे...
खरंच अप्रतिम आहे...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
८१ नंबर जबरीच आहे... आणि
८१ नंबर जबरीच आहे...
आणि जास्वंद पण मस्त रंगाची आहेत.. मी इतके दिवस मनानीच जे रंग जास्वंदीत भरत होतो त्यातले काही इथे दिसताहेत..
लाजवाब!
लाजवाब!
सुंदर फुले. ७० वे एकदम
सुंदर फुले. ७० वे एकदम खास.
दिनेशदा कॅमेरा जवळ असताना नावे लिहुन कशाला घ्यायची? त्या त्या फुलांबरोबर एक नावासकट फोटो पण घ्यायचा. म्हणजे मग रेकॉर्डला रहातं ते.
@सावली.. अनुमोदन...
@सावली..
अनुमोदन... टेक्नोसॅवी उपाय अगदी.. ![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
@दिनेशदा, एका एका लेखासोबत वेड लागत चाललय असं वाटतयं...
ह्म्म... तिथुन परत कसं काय येववलं तुम्हाला.. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आम्हाला एकदम फुल टु हरखुन
आम्हाला एकदम फुल टु हरखुन टाकलत.पुढिल जन्म ह्या फुलांच्या घोळख्यातल्या एखाद्या फुलाचा मिळावा हि आपलि इछ्हा मनाला भिडलि.आपणाला मनापासुन सलाम.
दिनेशदा, बेहद्द सुरेख फुले.
दिनेशदा, बेहद्द सुरेख फुले. त्यांच्या प्रचिंखातर मन:पूर्वक धन्यवाद!
हे घेऊ का ते घेऊ, दुकान उचलून का नेऊ!
मुक्ता, सुनिल, नरेंद्र --
मुक्ता, सुनिल, नरेंद्र -- अजून मनाने तिथे आहे ना मी.
सावली, तसे काहि फूलांच्या बाबतीत केलय मी. पण सगळ्याच नाही. नेहमीप्रमाणेच मेमरी कार्डाचा नाही, तर बॅटरीचा प्रॉब्लेम होता. (स्पेअर बॅटरी नव्हती जवळ !) जास्तीत जास्त फूले टिपायची होती ना !
अप्रतिम खरच दुसरे शब्दच नाहीत
अप्रतिम खरच दुसरे शब्दच नाहीत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
;