यावेळेचे फोटो मला टप्प्याटप्यात दाखवावे लागणार आहेत. बरेच आहेत आणि निवड करणे कठीण आहे.
क्वांटासने दिलेला ताप वाचला असेलच, पण तो सोडला तर बाकी ट्रिप, अविस्मरणीय झाली. यावेळेस तिथल्या सार्वजनिक वाहनांचा म्हणजे बस सेवेचा भरपूर फायदा करुन घेतला. नाताळच्या सुट्टीमूळे रेल्वेसेवा बंद होती (पण त्यासाठी समांतर बससेवा होती.)
तिथल्या बससेवेचे नेटवर्क चांगले आहे. अमुक ठिकाणाहून तमुक ठिकाणी जाण्यसाठी, कुठल्या बसेस आहेत आणि त्यांच्या वेळा काय आहेत, याची माहिती, नेटवर वा सेलफोनवर मिळू शकते.
आणि यावेळी, मला फिरवण्याची जबाबदारी लेकीने घेतली होती. आणि तिने ती उत्तमरित्या पार पाडली.
तर सुरवात करुया, सिंगापूर विमानतळावरच्या ऑर्किड्सनी. वेगवेगळ्या वेळी तिथे गेलोय, तरी तिथली ऑर्किड्स अशीच नेहमी भरभरुन फूललेली दिसतात. बर्याच वर्षात सिंगापूर शहरात जाणे झाले नाही, आता जमवायला हवे.
ए ३८० चे हे पहिले प्रत्यक्ष दर्शन...
नेहमीच्या विमानात बाजूच्या भिंती (?) वक्राकार असतात, छतही तसेच, इथे मात्र भिंत सरळ होती.
थोड्याच वेळात असे ढग आले आणि विमानाला जबरदस्त हादरे बसू लागले. थोड्या वेळाने आणि जरा लांबचा वळसा घेतल्यावर तो त्रास कमी झाला.
सिंगापूर ते सिडनी हा हवाई मार्ग, बराचसा ऑस्ट्रेलियाच्या भूमीवरुन जातो. या भूभागावर मानवी वस्तीच्या खूणा दिसत नाहीत, पण निसर्गाची कलाकारी मात्र, नेत्रसुखद आहे, त्याचे काही नमूने.
सिडनीच्या रात्रीबद्दल लिहिले आहेच. ही पार्किंगची इमारत मला सोबत करत होती त्या रात्री.
पण त्या रात्रीच्या अंधारातही, मी फूले शोधलीच.
ही त्यांची खास निलगिरी...
शेवटी ती रात्र संपली एकदाची, सिडनी एअरपोर्टवरची पहाट..
ऑकलंड मधे फिरताना, हा स्कायटॉवर कायम दिसत राहतो. तिथे आम्ही पहिल्यांदा जायचे ठरवले. (हा फोटो बसमधून घेतला आहे.) तिथे बससाठी रस्त्यावर खास वेगळी लेन असल्याने, कार आणि टॅक्सीपेक्षा बसेस जलद जातात. ऑफिसेस च्या वेळांना तिथे फार ट्राफिक असते.
त्या टॉवरच्या प्रवेशदारातून आत शिरल्यावर मावरी (स्थानिक जमात) कलेचा एक नमूना दिसतो. बाजूला पाण्याचा कृत्रिम धबधबा आहे.
आपण ज्या लिफ्टने वर जातो, तिचा तळ काचेचा आहे.
वरुन साधारण ८० किमी पर्यंतचा परिसर दिसू शकतो. तिथे वेगवेगळ्या उंचीवर दोन तीन गॅलरीज आहेत. तिथून दिसणारे ऑकलंड.
ऑकलंड काही प्लॅन्ड सिटी नाही. तिथल्या इमारती आखीव रेखीव नाहीत. पण त्या विस्कळीतपणातही सौंदर्य आहेच.
तिथल्या गॅलरीच्या तळाचाही काही भाग काचेचा आहे. तो भाग काँक्रिटइतकाच मजबूत आहे, असे तिथे लिहिले असले, तरी त्यावर पाय ठेवायला जरा भितीच वाटते.
तिथल्या बंदराचा भाग..
अगदी काचेजवळ जायची ज्यांना भिती वाटते, त्यांच्यासाठी थोडी वेगळी सोयही आहे.
शहरात हिरवाई पण जपलीय.
धाडसी लोकांसाठी तिथे स्कायवॉकची सोय आहे. बाहेरच्या बाजूला दिसणार्या कठड्यावरुन चालत फेरी मारता येते. आपल्याला दोरीने बांधून ठेवलेले असल्याने, त्यात काहिही धोका नाही. (तिथून उडी मारायची पण सोय आहे.)
तिथे दोनतीन रेस्टॉरंटस आहेत. एक रिव्हॉल्व्हींग आहे (ते हे नव्हे )
बाहेरचा नजारा बघत, निवांत खाता पिता येते.
माझी तिथे खाण्याची अजिबात गैरसोय होत नाही बहुतेक ठिकाणी शाकाहारी खाणे मिळतेच. तिथले अनेक स्थानिक लोकही, माझ्यासारखेच कट्टर शाकाहारी आहेत. तर हा माझा खाऊ..
हा लेकीचा खाऊ..
आणि हा आमच्या दोघांचा खाऊ..
आणि हे त्या टॉवरचे खालून होणारे दर्शन.
छानच की. आम्हाला घरबसल्या
छानच की. आम्हाला घरबसल्या स्कायटॉवर जाऊन ऑकलंडची सफर घडली.
मस्त फोटो. विमानातले आणि
मस्त फोटो. विमानातले आणि स्काय टॉवरचे फोटो खुप आवडले.
दिनेशदा एकदम सही फोटो आहेत
दिनेशदा एकदम सही फोटो आहेत सगळे
दिनेशदा खुपच छान सफर घडवली.
दिनेशदा खुपच छान सफर घडवली.
छानच दिनेशदा.. नेचर
छानच दिनेशदा.. नेचर मार्व्हलस् आणि man made marvels एकत्रच दाखवलेत.. मस्तच फोटो.. इथे फोटोत इतके सुन्दर दिसणारे ढग विमानाला असा त्रास देत असतिल अस वाटत नाही बघताना.. मला तर सरळ त्यान्च्यावर उडी मारायचीच इच्छा झाली.. असो.. ओर्कीड्स् चे अजुन फोटो येवु द्या..
अजून बरेच भाग येणार आहेत रे
अजून बरेच भाग येणार आहेत रे !!
मुक्ता मला उगाचच वाटत होतं, कि त्या अगडबंब विमानाला, हादरे बसणार नाहीत म्हणून !!
मस्त फोटो... मलाही त्या
मस्त फोटो... मलाही त्या काचेवर पाय ठेवायला भीती वाटेल.. तरीही बाहेरच्या स्कायवॉकवरुन चालावेसे मात्र वाटत राहिल..
विमानात असे हादरे बसायला लागले की वाट लागत असेल ना? आधारासाठी धरणार कोणाला?? सगळेच हवेत.....
@दिनेशदा... ते सावरीसारखे मऊ
@दिनेशदा...
ते सावरीसारखे मऊ ढग बघताना, ते विमानाल अलगद पुढे जावु देत असतिल आणि विमानही त्यान्ना फार धक्का लागणार नाही अशा हिशोबानेच जात असेल अस वाटत.. बालकल्पना..
मला काचेवरून चालायचे तर टावर
मला काचेवरून चालायचे तर टावर वाले डिपॉझिट घेतील. खास आहे सर्व. मुलगी पण चिकनबाउवाली ना
सो क्युट.
दिनेशद, मला ते ढग म्हणजे
दिनेशद, मला ते ढग म्हणजे खायचय कापुसवाल्याने पिंजलेला मऊमऊ कापुस वाटत आहे. विमानातुन बाहेर हात घातला की एकदम गोडगोडं मऊमऊ कापुस.. व्वा.. मस्त कल्पना..
खुप आवडले..
वा ! सुंदरच. घरबसल्या एवढी
वा ! सुंदरच. घरबसल्या एवढी सुंदर सफर घडवून आणलीत.
मस्त एकदम!
मस्त एकदम!
व्वा.. नवीन कॅमेर्याचा भरपूर
व्वा.. नवीन कॅमेर्याचा भरपूर उपयोग झालेला दिस्तोय.. आमचीही सफर मस्त घडतीये तुमच्या बरोबर..
तुम्ही कुठेही जा.. सुरेख फुलं येतातच तुमच्या भेटीला आपणहून
स्काय टॉवर सकट सर्व फोटो जबरदस्त!!!
मस्त एकदम!
मस्त एकदम!
दिनेशदा, वाह ! काय ऑकलंड भाग
दिनेशदा,
वाह ! काय ऑकलंड भाग १ आहे !!
दुसरा कधी येतोय ?
दिनेशदा, मस्त फोटो, काचेच्या
दिनेशदा, मस्त फोटो, काचेच्या तळाचा फोटो बघताना पण पायातले त्राण गेल्यासारखे वाटले .... हा हा हा ...... बाकी फोटो मस्त
अरेच्चा, मी किती उशीरा वाचतेय
अरेच्चा, मी किती उशीरा वाचतेय हे !
मस्त वर्णन आणि एकदम फ्रेश फोटो ! काचेवरुन चालायला भिती वाटेलच बै. अमा, डिपॉझिट
दोघांवाला खाउ पाहून तोंपासु.
पुढचे भाग वाचते आता.
मस्त फोटो भव्य दिव्य....
मस्त फोटो भव्य दिव्य....
मस्त ...येथे बसल्या बसल्या
मस्त ...येथे बसल्या बसल्या आमची सफर घडली.
क्या बात है!!! जाऊन
क्या बात है!!! जाऊन आल्यासारखं वाटलं...
खरंच, इथे बसल्या बसल्या आमची
खरंच,
इथे बसल्या बसल्या आमची सफर घडली
असं मलाही म्हणावसं वाटतय.
कित्तेक दिवस झाले वाचायचं
कित्तेक दिवस झाले वाचायचं होतं... आज निवात वेळ मिळाला... बघु किती भाग होतात ते...
हवामान छानच होतं. पायाखालची काच आणि स्कायवॉक आवडला!
दिनेशदा, मस्त फोटो काचेचा
दिनेशदा, मस्त फोटो
काचेचा तळ असलेल्या लिफ्ट इथे नाहीत बरं आहे. मला बघुनच चक्कर आली.
मी बहुतेक जिन्यानेच गेलो असतो.