विंटर गार्डन - ऑकलंड भाग १/४

विंटर गार्डन - ऑकलंड भाग १/४

Submitted by दिनेश. on 6 March, 2012 - 07:45

दोन योगेशनी इथे मस्त विश्वदर्शन घडवलेच आहे, माझाही खारीचा वाटा.

ऑकलंडमधल्या शेवटच्या दिवशी मी म्यूझियममधे होतो, ते आधी लिहिलेच आहे.
त्या म्यूझियमच्या टेकडीच्या पायथ्याशी, विंटरगार्डन नावाची वास्तू आहे. बसमधल्या
ऑटो गाईडने, उद्यानांची आवड असणार्‍यांनी तिथे अवश्य जावे असे सूचवले होते. (मला तो इशारा पुरेसा होता.)

तर लांबून काचेची इमारत आतमधे काय असेल याचा पत्ता लागू देत नव्हती. आणि
जवळ गेल्यावर मात्र, मला अलिबाबाची गुहा सापडल्यासारखेच झाले.
काचेचे अर्धगोलाकार छत असलेली एक इमारत, मधे मोकळी जागा, आणि मागे पुन्हा
तसलीच एक इमारत, एवढा पसारा.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - विंटर गार्डन - ऑकलंड भाग १/४