गेल्या डिसेंबर मधे केप टाऊन ची ट्रिप झाल्या नंतर बर्याच दिवसात कुठे फिरायला जायला मिळाले नाही. परत एकदा क्रुगरची ट्रिप करायची आहे पण त्या साठी ३/४ दिवसांची सलग सुट्टी मिळाली पाहीजे जी सध्या तरी शक्य नाही.
अगदीच काही नाही त्या पेक्षा दुधाची तहान ताकावर भागवावी म्हणुन गेल्या विकांताला पिलानसबर्ग नॅशनल पार्क ची एक दिवसाची ट्रिप केली.
दक्षिण अफ्रिकेतील एक नामवंत बँक आमच्या कंपनीची क्लायंट आहे. गेल्या चार वर्षां पासुन आमच्या कंपनीचे ९०-९५ कर्मचारी दक्षिण अफ्रिकेत राहुन या बँकेला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सेवा पुरवतात. जुले॑ २०११ मधे माझी या प्रकल्पावर नियुक्ती झाली आणि मी कुटुंबासह दक्षिण अफ्रिकेत आलो.
आल्या दिवसा पासुन भेटलेला प्रत्येक सहकारी मला एकचं प्रश्न विचारायचा...
काय मग क्रुगरची ट्रिप झाली की नाहि?
नाहि आजुन. इती अस्मादिक
अरे काय हे? साऊथ अफ्रिका आ के क्रुगर नहि देखा तो क्या देखा? हे म्हणजे आग्र्याला जाऊन ताजमहाल न पहाण्या सारखे आहे. करा करा लवकर करा क्रुगर ची ट्रिप. लाईफटाईम एक्सपिरीन्स आहे तो. मिस नका करु.