मुन्नार
रंगीबेरंगी !
मुन्नारमध्ये गेलात तर तेथील प्रसिद्ध अशा हॉर्टीकल्चर गार्डन ला जरुर भेट द्यावी.. इथे गेलो असता रंगीबेरंगी फुलांमध्ये रंगपंचमी खेळतोय असे भासत होते.. मी तर म्हणेन अशा गार्डनसाठी एक अख्खा दिवस द्यावा तरच समाधान होईल.. त्या फुलांना जवळून पाहताना तर आपणही भ्रमर बनुनी फुलांच्या पाकळ्यांमध्ये खेळावेसे वाटत होते... येथील प्रवेश शुल्क केवळ दहा रुपये व कॅमेर्यासाठी दहा रुपये.. इथे काही वनस्पतींची विक्रीदेखील होते..
माटटूपेट्टी डॅम व इको पॉईंट
माटटूपेट्टी डॅम.. जिल्हा इड्डूकी.. या परिसराची ओळख करुन द्यायची झाली तर केरळमधील मुन्नारपासून अंदाजे १३ किमी अंतरावर.. १७०० मी. उंचीवर असलेले.. हिरव्यागार डोंगरांनी वेढलेले... 'शोला' फॉरेस्टच्या कुशीत असलेले.. निसर्गसौंदर्य अनुभवण्याचे एक उत्तम ठिकाण... याचपुढे काही अंतरावर इको पॉईंटसुद्धा आहे.. इथेही तुम्हाला डोंगरकाठचा जलाशय ही चीज काय असते ते अनुभवता येइल..
![Subscribe to RSS - मुन्नार](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/misc/feed.png)