मागे वळुन पाहताना..
मागे वळुन पाहताना
एक निरागस चेहरा
दिसतो मज मनसोक्त
खळखळुन हसताना
मागे वळुन पाहताना
तोच चेहरा दिसतो मज
भेदरलेल्या डोळ्यांनी
आसपास पाहताना
मागे वळुन पाहताना
लोकांचे चेहेरे न्याहाळताना
तो चेहरा दिसे मज
ओंगळवाण्या नजरा सहन करताना
मागे वळुन पाहताना
ओळखीच्या चेहेऱ्यांवरचे
पाहिले मी मुखवटे
एकावर एक चढवताना
मागे वळुन पाहताना
स्वतःला आरशात बघताना
पाहिले आहे मी
स्वतःचीच किळस करताना
गणितं..
आयुष्याच्या पाटीवरची
गणितं माझी चुकली
चुका लपवण्यासाठी
मी ती पटापट पुसली
मनाचा शिक्षक आहे थोर
कडक शिस्तीचा
पुसलेली गणितं
परत परत विचारली
उत्तर देता येईनात
झाली पळता भुई थोडी
माझे मनच होऊनी मैत्र
आता माझी शिकवणी घेई
शिकवणी झाली चांगली
मास्तरांनी सांगितला
एक जालिम उपाय
जुनी शिदोरी पाठीला
नवे अनुभव बांध गाठीला
निर्धास्त होऊन जग
मी आहेच तुझ्या सोबतीला
कधी दाटे मनात गहिवर कधी हास्याची लाट आहे
सोडून गेले सगेसोयरे अंधाराची साथ आहे
दूर टेकडीवर होता महाल त्यात होती सुवर्णशय्या
इंद्रालाही लाजवेल असा माझा थाट होता
नियतीची फिरताच चक्रे होते नव्हते सगळे गेले
सर्वस्व व्यापले अंधाराने राज्य संपले खचली हिम्मत
अंधाराच्या मगरमिठीतच प्रकाशाची कळली किंमत
एकदा की नै, स्वप्नांच आयुष्याशी लग्न होत. लग्नाच्या वऱ्हाडात आशा, अपेक्षा, इच्छा, आकांक्षा हे सगळे नातेवाईक आलेले असतात. जोडपं खूप आनंदात असत, कारण आहेरात खूप सार सुख आणि समाधान आलेलं असत. पण त्यांना माहीत नसत स्वप्नांच्या कुंडलीत एक वर्तमान नावाचा मंगळ घर करून बसलेला असतो.
आयुष्य
आयुष्याच्या वळणावर
जेव्हा मी मागे वळून बघितलं
नाचत होती भुतं
आक्राळ विक्राळ रूप घेऊन
माझ्या अतृप्त इच्छांची
कोसत होती मला
शिव्या शाप देऊन
असं वांझोटं सोडल्याबद्दल
अकाली गाडल्याबद्दल
पण मी ही असहाय होतो
काळाने बलात्कार केला तेव्हा
आणि प्रसवली
ही मृतबाळे जेव्हा
माझ्या इच्छा आकांक्षांची
केले मी त्यांना आता
मनाच्या बाटलीत बंद
बघायचे पुढे आता
नव्या आकांक्षा नवीन छंद
प्रिय मायबोलीकरांना सप्रेम नमस्कार,
दैवी कृपा
क्षण होते कितीतरी सुखाचें
अजुनी आठवणीत ताजे तवाने
बिलोरी आरशासमोर असूनही
मी आरशात तुलाच पाहते
रुबाबदार डोळ्यांतील तुझे हसणे
मनामनात सतत तरळत राहते
ऐटीत फिरणे आणि ना कुणासमोर वाकणे
वैशिष्ट तुझ्या जीवनाचे मज भावले
तुझीच होऊन राहणे खूप खूप आवडले
शक्य नव्हते तरीही दैवीकृपेने साध्य झाले
एक एकदा मन विचारते स्वतःलाच
दुसऱ्या कुणी सुख दिले असता का ग एवढे?
बंद झाली सारी कवाडे माझ्याच अशियाण्यातली ,
उधार जगणेही आता सावकारी दाम पुकाराया लागली ..
मी निद्रेत तरीही तरंगू लागलो स्वप्नांच्या झुल्यावर ,
दोर तेव्हा हळू हळ
आज तुटाया लागली ..
रेशमाच्या अस्तराने अभ्रावरी शालू पांघरला तोही विजार फाटका गळू लागला ,
अस्ता संगे टिपू लागल्या चांदण्या तेव्हा सूर्यही आसवे ढाळू लागला...
घुबडाच्या रात्री कितीसा जागल्या जगणे हि वटवाघळाची कैफियत होती ,
पुन्हा भावनेच्या डाली वडाच्या पारंब्यांना झुलू लागल्या ....
पारंब्यांना झुलू लागल्या .....
[पुरुषी मनाला विचार करायला लावणार. बाहेर समाजात वावरणारी स्त्री जिच्यावर अत्याचार होतो, जिला त्रास सहन करावा लागतो, ती तुमची आई, बहिण, बायको, मामी, मावशी कोणीही असू शकते. तेंव्हा स्त्रीचा आदर करा. ]
*********************
दुनियेचे जीवघेणे इशारे
आणि लचके तोडण्यास सरसावलेले हात
चौफेर वखवखलेली नजर
आणि अंग चोरून चालणारी ती…
दुनियेच्या खोचक कमेंट सहन करत
कानाडोळा करून, रस्ता कापणारी
थोडी घाबरलेली,
मनात असंख्य विचारांचं काहूर घेवून
एकटी घराबाहेर पडलेली ती….