तुझं चालू आहे की सगळं
सुरळीत नियमित अव्याहत
वर्षामागून वर्ष जात आहेत
ऋतुमागून ऋतू बदलत आहेत
फाल्गुन संपला की चैत्राची चाहूल
नाविन्याकडे पुढलं पाऊल
शिशिरात सारं जीर्ण सोडून द्यायचं
आपली आपणच करायची डागडुजी
वसंतात पुन्हा बाळसं धरायचं
मोहोर, धुमारे, सुकुमार चैत्रपालवी
तू लाख शिकवशील हे सगळं, लाखवेळा
पण इथे वेड पांघरायच्या नाना कळा
तेव्हा तुझा आपलं चालू दे असंच
सुरळीत नियमित अव्याहत
कधीतरी येईल शहाणपण आम्हालाही
तुझ्याकडून काय, किती आणि कसं घ्यायचं?
कुठे वहात जायचं आणि कधी थांबायचं?
सूर्य महाराज एकदा खूप खूप चिडले
ताप ताप तापले अन् फटकन फुटले
छोटे मोठे गोळे इकडे तिकडे पडले
सूर्याभोवती सारे गोल फिरू लागले
पहिला झाला बुध, सगळ्यात जवळचा
एका वर्षात होतात त्याच्या चार चार फेऱ्या
दुसरा म्हणे मी शुक्र आहे फार तापट
सगळ्यात चमकतो, रंग माझा पिवळट
तिसरी आहे कोण? ही तर आपली पृथ्वी
पक्षी प्राणी माणसांनी इथेच केली वस्ती
चौथा आहे मंगळ पृथ्वीपेक्षा छोटा
माणसांनी शोधला इथे पाण्याचा साठा
पाचवा म्हणे बघा, मी आहे सगळ्यांचा गुरु
एकोण ऐंशी चंद्र माझे लागतात फेर धरू
आठवतो आज पुन्हा
माझा गाव माझी माती
सारं काही सोडले मी
वितभर पोटासाठी.
बरसून येती मेघ
भिजूनिया जावे चिंब
ओंजळीत पावसाचे
झेलूनिया घ्यावे थेंब
घेवूनिया हाती काठी
जात होतो पोरं पोरं
माळावरी चरावया
घेऊनिया गुरं ढोरं.
रानपाखरांच्या जैसे
रानिवणी हिंडण्यात
किती आठवू ते दिस
मौज होती जगण्यात.
मग सरले ते दिस
हरवले बालपण
शहरात पोटासाठी
सुरू झाली वणवण.
उलटले दिस मास
किती काळ गेला पुढं
तरी मना अजूनही
आहे गवाचीच ओढ.
मुलांनी जेंव्हा पहिल्यांदा दिवाळीचा किल्ला बनवला तेंव्हा चमचाभर मोहोरी आणि चमचाभर हळीव मी त्यांना मसाल्याच्या डब्ब्यातुन काढुन दिले. दिवाळी झाली. त्यानंतरही किल्ला होताच. त्यावर हिरवं जंगल दाटले होतं. मग त्या वाफ्यात काहीतरी लावायचं म्हणुन नाखुषीने किल्ला पण काढुन टाकला.
पाळीव प्राण्यांसबंधी पडणारे प्रश्न विचारण्यासाठी, उत्तरे देण्यासाठी, हा धागा काढत आहे.