पाळीव प्राण्यांसंबंधीची - प्रश्नोत्तरे, शंका निरसन, सल्ले इ.

Submitted by गजानन on 7 February, 2022 - 03:57

पाळीव प्राण्यांसबंधी पडणारे प्रश्न विचारण्यासाठी, उत्तरे देण्यासाठी, हा धागा काढत आहे.

ज्यांना कुत्रे, मांजरे किंवा इतर कोणतेही प्राणी पाळायची इच्छा आहे परंतु सध्याच्या जीवनशैलीत ते कितपत जमेल याचा नीट अंदाज बांधता येत नाही, अश्या लोकांना इथे येऊन प्रश्न विचारता येतील. Happy
असा धागा आधीच आहे का ते बघत होतो पण असा धागा सापडला नाही. असेल तर कृपया प्रशासकांनी हा धागा बंद करून त्या धाग्याची लिंक द्यावी.
(पाळीव प्राण्यांच्या किस्से, गंमती-जमती इ. लिहिण्यासाठी वेगळे धागे आहेतच).

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे काही प्रश्न हे मुख्यतः कुत्र्यांच्या आणि मांजरांच्या खाण्यासंबंधी आहेत.

कुत्री आणि मांजरे यांना घरात आपण जे अन्न खातो तेच अन्न देता येईल का? इथे त्यांच्या खाण्यासंबंधीच्या बर्‍याच पोस्टी वाचल्या आणि त्यावरून असे वाटले की त्यांचे असे स्पेशल खाणेच त्यांना द्यायचे असते / द्यावे. आम्ही कुत्रे, मांजरे पाळून आता बरीच वर्षे लोटली आहेत. त्यामुळे माझ्याकडे ताजा अनुभव नाही. (मधल्या काळात स्थळ, काळ, जीवनशैली आणि बरेच काही बदललेही आहे.) पण कुत्र्यांना दूध-भाकरी किंवा पातळ भाजी, उरलेला भात, भाकरी, चपाती असे खाऊ घालायचो आणि त्यात त्यांचे भागायचे. (किंवा भागत असावे कारण ती खूश आणि निरोगी वाटायची.)

आजच्या काळात मुंबईसारख्या ठिकाणी कुत्रा पाळायचा झाला तर -
१) त्याच्यासाठी कोणत्या किमान वस्तू घरात असणे गरजेचे आहे?
२) त्याच्या कोणत्या क्रिया/कामे नियमितरित्या अनिवार्यपणे कराव्याच लागतात. जसे खाणे-पिणे, शीशी-शूशू, आरोग्यविषयक इ.
३) त्याचा महिन्याचा खर्च साधारण किती येतो? हे कोणत्या जातीचा कुत्रा आहे यावर अवलंबून असते का?
४) अशी काही परिस्थिती (condition) आहे का ज्यामध्ये कुत्रा पाळणे हितकारक नसते?
५) घरी कुत्रा पाळायचा असेल तर त्याची नोंदणी कुठे करावी लागते का? सोसायटीत सांगावे लागत असेल असे वाटते, त्या व्यतिरिक्त इतर कुठे नोंदवावे लागते का?
६) कोणत्या प्रवासात कुत्र्यांना सोबत घेऊन जाऊ शकतो? इतर वेळी प्रवासाच्या काळात त्यांची खात्रीशीर व्यवस्था कशी करता येते?

आणखी प्रश्न येतील तसे विचारतो. मांजरांविषयीही विचारायचे आहेत.

बाहेरगावी फिरायला जाताना विमानातून कुत्र्याला सोबत कसे न्यावे? हॉटेलमध्ये कुत्र्याला कसे ठेवावे?

मूळ मुद्दा - जर, फक्त नैसर्गीक कच्चे अन्न देणे हे एक टोक असेल तर, आमचा बाब्या/बाबी फक्त याच महागड्या ब्रँडच फूड खातो हे दुसरे टोक आहे, हे मा.वै.म.
कुत्र्याच्या पुर्वजांपसुन जेव्हा कुत्रे, कुत्रे बनत होते तेव्हा ते त्यावेळच्या माणसांनी स्वतःसाठी तयार केलेले, टाकलेले, उष्ट असे अन्नच खात होते. त्यांच्या मूळ जीवशास्त्रात काही बदल झालेला नाही.
एक व्य्क्ती/समुह करत असलेल्या एखाद्या चुकीच्या गोष्टीमूळे इतर चुकीच्या गोष्टी आपोआप बरोबर ठरत नाहीत.

या सगळ्या ब्रँडेड फुडच्या कंपन्या शेअर होल्डर्सना नफा देण्यासाठी अस्तित्वात नव्हात्या, तेव्हाचे कुत्र्यांचे जीवशास्त्र काय सांगते? तेव्हाचे कुत्रे काय खायचे? नफा मिळायला लागल्यावर त्यांच्या जीवशास्त्रात नक्की काय बदल झाला?

कुत्र्याच्या पुर्वजांपसुन जेव्हा कुत्रे, कुत्रे बनत होते तेव्हा ते त्यावेळच्या माणसांनी स्वतःसाठी तयार केलेले, टाकलेले, उष्ट असे अन्नच खात होते. त्यांच्या मूळ जीवशास्त्रात काही बदल झालेला नाही.>>>

भारी अभ्यास, खूप महत्त्वाची माहिती मिळाली
स्पेशली कुत्र्याच्या पुर्वजांपसुन जेव्हा कुत्रे, कुत्रे बनत होते हे वाक्य महत्वाचे आहे
आज खरा इतिहास समजला Happy

गजानन, आमचा जिंजर ( मिक्स ब्रीड आहे) पोळी, भात खातो. त्याला प्रत्येक जेवणात अंडं किंवा चिकन लागतं. तो लहान असतात भाज्या उकडून द्यायचे गाजर, दुधी भोपळा वगैरे. पण आता तो भाज्या सोडून देतो आणि बाकीचे खातो.
यासोबतच डॉगफूडपण देतो. पण फक्त डॉगफूड देत नाही. त्याला फारसे आवडत नाही.
त्याला दुग्धजन्य पदार्थ फार आवडतात. त्यामुळे, दूध, दही, बटर, तूप, ताक त्याला अधूनमधून देतो. तूप दूध आवडत असल्याने गुलाबजाम, बेसन लाडू, मॅंगो आइस्क्रीम पण खातो. पण आम्ही जास्त देत नाही. पनीर मात्र देतो आठवड्यात एकदा. आणि रोज पोळी वर तूप.
बाकी आमच्या जेवणातले काही दिले तर तो खात नाही. मसालेदार पदार्थ, चॉकलेट वगैरे वास घेऊन सोडून देतो.

प्रवास - हल्ली तुम्ही पाळीव प्राण्यांना ट्रेन किंवा विमानाने बरोबर घेऊन जाऊ शकता.
ट्रेन मध्ये फर्स्ट क्लास कुपे बुक करावा लागतो. प्राण्याचे पण तिकीट काढावे लागते. तुमच्या बरोबर कुपेमध्ये तुमचे कुटुंब आणि पेट. विमानात बहुतेक सामानाच्या जागेत पिंजऱ्यात ठेवावे लागते. नक्की माहिती नाही.
आम्ही शक्यतो घरच्या गाडीनेच जातो जिंजरला बरोबर घेऊन. आत्तापर्यंत त्याने भरपूर प्रवास केला आहे. गेल्या वर्षी तर काही कारणाने सलग अठरा तास प्रवास करावा लागला. त्याने खूप सहकार्य केले. मध्ये मध्ये ब्रेक्स घेऊन त्याला फिरवून आणत होतो. जेवायला घरूनच पॅक करून घेतले होते.

प्राण्याचे पण तिकीट काढावे लागते. >>>
कुत्रा असेल तर त्याचे लसीकरण झाल्याचे सर्टिफिकेट पण लागते का सार्वजनिक वाहनाने प्रवास करताना?

हो. वॅक्सिनेशन बुक बरोबर ठेवायचे.
बुकिंग करतानाच ही माहिती द्यावी लागते. पेट बरोबर असणार याची कल्पना द्यावी लागते.
प्रवासाच्या आदल्या दिवशी फोनवरून चौकशी करून ते सांगतील त्या वेळेस स्टेशन वर जायचे. काही ठिकाणी दोन तास आधी चार्ट बनण्याअगोदर जावे लागते.
ही सगळी इतरांच्या अनुभवांती मिळालेली माहिती आहे. आम्ही अद्याप ट्रेन प्रवास केला नाही.

कुत्रे नैसर्गिक रित्या मांसाहारी असतात आणि त्यांना जेवणात ते असणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिने गरजेचे आहे.
म्हणून फ्रेश मीट रोज द्यावे की नाही ते आपण ठरवावे, कारण ते तसे महाग वाटू शकते. पण रेडिमेड डॉग फूड /किबल ची सोय आहे जे फार महाग नसते.
डॉग ब्रीड आणि आहाराप्रमाणे त्यांचा आहार कमी जास्त होऊ शकतो. तसेच त्यांना लागणारा व्यायाम कमी जास्त असतो. काही ब्रीड अत्यन्त अ‍ॅक्टिव असतात आणि त्यांना दररोज भरपूर व्यायाम दिला नाही तर ते अ‍ॅग्रेसिव होऊन घरात नासधूस करू शकतात. तेव्हा कोणते ब्रीड आपल्या लाइफ स्टाइल ला साजेसे आहे तेच घ्या.

मांजर पाळत असाल तर... चिकन मटण शिजवून द्या.. दूध देऊ नका... रात्री शक्यतो फिश द्या... तिन्ही वेळी मांसाहार असू द्या.. उगाच दूध चपाती असले प्रकार जबरदस्ती देऊन त्यांच्या हेल्थ शी खेळू नका...
कॅट फूड मिळते तेच द्या त्यात लेंटिल आणि व्हेजी मिक्स करून चिकन असते... ते बेस्ट...

प्रवासाबद्दल - लहान डॉग्ज कॅरियर मधे आपल्यासोबत विमानात प्रवास करू शकतात. पण ते शांतपणे त्यात बसले पाहिजेत आणि ते कॅरियर सीटखाली मावले पाहिजे असे काही काही नियम असतात. ते एअरलाइन्स च्या वेबसाइट वर बघून घ्यावे लागतात.
आम्ही अजून कधी माउई ला घेऊन फ्लाय केलेले नाही.

4. प्रेग्नंट बायकांनी मांजरीपासून जपून रहावे. कुठलातरी व्हायरस का पॅरासाइट असतो त्यांच्या अंगावर ज्याने मिसकॅरैज होऊ शकते. त्यांना काय खायला देता त्यावरही हे अवलंबून आहे.
https://www.winchesterhospital.org/health-library/article?id=156973

कुठंतरी वाचलेला किस्सा आहे.

भारतातले काही मोठमोठे लोक कोणत्यातरी परदेशात गेले होते. तिथं त्यांनी हॉटेलमध्ये आपल्या ऐपतीप्रमाणे भरपूर पदार्थ मागवले, आणि भारतात टाकतात तसे भरपूर उष्टेही सोडले. हॉटेलमधले इतर ग्राहक देखील श्रीमंत होते, पण त्यांनी आपले सारे अन्न सम्पवलेले होते. जेव्हा बिल द्यायची वेळ आली तेव्हा भारतीयांना त्यांनी मागवलेल्या पदार्थांच्या मूळ किमतीपेक्षा अधिक बिल देण्यात आले शिवाय उरलेले अन्न सोबत बांधून दिले गेले. याबद्दल विचारणा केली असता, हॉटेलकडून मिळालेले उत्तर: तुम्ही भरपूर श्रीमंत असलात, तुमच्याकडे अमाप पैसे असले, तरीही आमच्या देशाची साधनसामग्री मर्यादित आहे. तुम्ही वाया घातलेल्या अन्नातून कितीतरी लोकांचे पोट भरले असते, म्हणून हे जास्तीचे बिल दंड म्हणून दिले गेले आहे.

इतकेच

मध्यंतरी, पुण्यातच कोंढवा मुंढवा भागात चालणाऱ्या पर्शियन मांजरांच्या कारखान्याबद्दल बातमी/ विडिओ बघितलेला. खूप सुन्न झालो, पाळीव प्राण्यांचे ब्रॅण्डनुसार unnatural ब्रिडिंग, त्यातल्या फिमेलचे नन्तर होणारे हाल सगळं बघून ठरवलं, आयुष्यात कधीच प्राणी पाळायचे नाहीत.

आमच्या लहानपणी खेड्यावर आमचा लाडका टिपू कुत्रा होता. जात वगैरे तेव्हा माहीत नव्हतं, पण आता वाटतं कारवानी/ धनगरी असेल.. संध्याकाळी जेवणावेळी आमच्याच ताटातली एखादी भाकर किंवा चपाती फक्त प्रेमापोटी त्याला दिली जायची, आणि तो सुद्धा दिवसभर हुंदडून हादडून भाकरीच्या वेळीच यायचा. ती जी भाकर खायचा ती आम्ही द्यायचो ते प्रेम म्हणून आणि तो खायचा पण प्रेम म्हणूनच.. बाकी त्याचं पोट तो भरून घ्यायचा!

कुत्री ,मांजरी हे प्राणी पाळीव असतील तरी वाइल्ड animal चे गुण त्यांच्यात असतात
ज्यांची मोठी फॉर्म हाऊस आहे ,सभोवती विपुल नैसर्गिक वातावरण आहे.
त्यांनी हे प्राणी पाळावेत.
शहरात जिथे पाय ठेवायला जागा नसते .
त्यांनी कोणतेच प्राणी पाळू नयेत.

पुण्यामध्ये हिंजवडी, राजाराम ब्रिज भागात पेट सीटर्स आहेत
काही दिवस बाहेर जायचे असेल तर ते पेट ( कुत्रे च) सांभाळतात.
व्यवस्थित जेवण, बाहेर फिरायची सोय, इतर कुत्र्यांबरोबर मस्ती वगैरे असल्याने कुत्री देखील तिकडे राहायला तयार असतात ( मित्राचे पेट खळखळ न करता तिकडे राहते)

1 -2 रात्रीं करता ट्रिप ला जात असाल तर हा चांगला उपाय आहे.
मोठ्या ट्रिप साठी या साठी वेगळे बजेट ठेवायला लागेल.

एका घरी मालकीणची डिलिव्हरी होती( आधीचे मूल लहान होते) म्हणून सोसायटी मधल्याच एका कुटुंबाने पेट सांभाळले होते 3 4 महिने.
नंतर परत देताना खूप कटकट केली , दोन्ही फॅमिलींनी एकमेकांना धमक्या दिल्या वगैरे किस्से झालेले.

पूर्वी पाळले जाणारे कुत्रे = देशी /गावठी कुत्रे यांच्या मागण्या कमी असतात.
आताचे ब्रिडेड कुत्रे पाळलेत तर त्यांचा डाएट संभाळवाच लागेल
लॅबरेदोर, गोल्डन रित्रीवर ला पोळी/ब्रेड दिली तर त्याचे केस गळतात वगैरे गोष्टी बिल्डिंग मध्ये पहिल्या आहेत (ग्लूटेन इनटोलरन्स).

सायबेरियन हसकी वगैरे निवडला तर घरी AC सुद्धा लावावे लागेल..

कुत्रा घरी आणणे हा मोठा डिसीजन आहे, माबो वरच्या ब्रो सायन्स वर अवलंबून तो घेऊ नका, पेट सीटर्स, व्हेट्स यांच्याशी बोला आणि उपलब्ध जागा, त्याला लागणाऱ्या फ़िसिकल ऍक्टिव्हिटी साठी तुम्ही देऊ शकणारा वेळ, आक्रमकता, घरी असणारी येऊ घातलेली मुले, त्या ब्रीड च्या स्पेशल गरजा या सगळ्याचा ताळमेळ घालून निर्णय घ्या

मला एक प्रश्न आहे. माझ्याकडे pug आहे. तिची skin खूप कोरडी पडते. सध्या तर जास्तच. काही घरगुती उपाय आहे का? परवा पेपर मध्ये तेल सान्गीतले होते.

>>>>>>>>लहान डॉग्ज कॅरियर मधे आपल्यासोबत विमानात प्रवास करू शकतात. पण ते शांतपणे त्यात बसले पाहिजेत
ह्म्म्म!! प्रॅक्टिस करवुन घ्यायची महीनाभर.

Anagha gokhle sesame seed oil will work. But please check with your vet. He will prescribe correct oil. Also do not bathe her every weeek

कुत्री ,मांजरी सगळ्यान्चे केस खूप गळतात आणि फर्निचर, जमिनीवर, कपड्यावरती चिकटतात सो ते पण लक्षात ठेवा. रोज स्वच्छतेची तयारी असू देत.

घरात जास्तीची मोकळी जागा असेल म्हणजेच जर घर मोठे असेल तरच कुत्रा पाळा नाहीतर नको. अगदीच हौस असेल तर पोमेरियन बघा. कुत्रा दिवसभर भुन्कतो, भुन्कण्यामुळे शेजारी त्रस्त होतात व शेवट रोजच्या भान्डणात होतो. बन्द फ्लॅटमध्ये आपल्यालाही त्याच्या भुन्कण्याचा त्रास होतो. एखाद्या लहान मुलासारखे कुत्र्याला सतत पाहावे लागते. त्याचे करणे हा फुल टाइम जॉब होउन बसतो.

मान्जरे स्वयम्पुर्ण असतात, छोट्या घरातही आरामात राहतात. लहान खेळकर पिल्लु मिळाले तर आपलाही वेळ मजेत जातो.

शहरात सहसा डॉग व कॅट फुड दिले जाते. इथे गावीही मी हेच देते आमच्या स्पॉटी व सायाला. तरिही बाहेर फिरुन ते दोघे स्वतःची सोय लावतात. स्पॉटीची बाजारात वडापाववाल्यान्शी दोस्ती आहे, तिला वडा पाव आवडतो.. क्वचीत शेजार्यान्ची कोम्बडीही ती खाते, सुदैवाने अजुन नुकसान भरपाईची मागणी झालेली नाही. Happy

साया बोका मात्र कॅट फुडसाठी हट्ट धरुन बसतो. आपण जे अन्न खातो ते प्राण्याना देउ नये असे मला वाटते. त्यान्च्या आरोग्यावर परिणाम होतात हे पाहिले आहे.

Pages