पाळीव प्राण्यांसंबंधीची - प्रश्नोत्तरे, शंका निरसन, सल्ले इ.

Submitted by गजानन on 7 February, 2022 - 03:57

पाळीव प्राण्यांसबंधी पडणारे प्रश्न विचारण्यासाठी, उत्तरे देण्यासाठी, हा धागा काढत आहे.

ज्यांना कुत्रे, मांजरे किंवा इतर कोणतेही प्राणी पाळायची इच्छा आहे परंतु सध्याच्या जीवनशैलीत ते कितपत जमेल याचा नीट अंदाज बांधता येत नाही, अश्या लोकांना इथे येऊन प्रश्न विचारता येतील. Happy
असा धागा आधीच आहे का ते बघत होतो पण असा धागा सापडला नाही. असेल तर कृपया प्रशासकांनी हा धागा बंद करून त्या धाग्याची लिंक द्यावी.
(पाळीव प्राण्यांच्या किस्से, गंमती-जमती इ. लिहिण्यासाठी वेगळे धागे आहेतच).

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या माऊ (cashew न व्हेला) कॅट फूड खातात. ते पण एकाच ब्रँड च. रॉयल कॅनन. बाकी आठवड्यातून एकदा चिकन ग्रेव्हीय च ट्रीट च एक पॅकेट येतं ते दोघांत एक.

बाकी काही चाटवल पण काही दुसरं खात नाही. अगदी आपसन खातो ते चिकन न मासे ही

कुत्रा दिवसभर भुन्कतो, भुन्कण्यामुळे शेजारी त्रस्त होतात व शेवट रोजच्या भान्डणात होतो. बन्द फ्लॅटमध्ये आपल्यालाही त्याच्या भुन्कण्याचा त्रास होतो-हे अगदीच अमान्य आहे. एखादा अपवाद असेल. पण बरच कुत्रे घरात शांत राहतात. त्यांना बांधुन ठेवले तर भुंकणारच... घरात मोकळे सोडा. खेळतील बागडतील आणि मस्त झोप काढतील आणि हो तुम्ही लळा लावला असेल तर तुम्हाला पाहण्यासाठी अधून मधून kitchen हॉल बेडरूम मध्ये फेरी पण मारेल... घरी यायची वाट पाहिलं... बाहेर जाताना तुम्हाला सोडायला येईल... तुमच्याकडे फिरायला नेण्याचा हट्ट करेल... प्रेमाने तुमच्या जवळ येईल ... तुमच्याशी पकडापकडी, आणि लपा छुपी चा खेळ पण खेळेल.... त्याला बॉल दिला तर त्याच्याबरोबर पण खेळेल. .... कुत्रा आणि मांजर खुप प्रेमळ असतात.

वेमा ला का बरं आवडलं नाही या धाग्यावरील चर्चा?. इतर वायफळ धागे भरगच्च वाहतात. काही धागे तर एकमेकांची तंगडी खेचायलाच बनवले जातात. परस्पर टीका आणि बऱ्याच वेगवेगळ्या थरांवर जाऊन सुद्धा धागे चालू राहतात. मग या धाग्यावर का निर्बध? समजू शकेल का?

गजु भावोजी हे पन बघा.
https://www.maayboli.com/node/50262
प्रतिसादात् पण बरीच माहिती आहे.

त्या आधी पण एक कट्टेकर प्राणी प्रेमी होते त्यांचा फिशटँक व इतर प्राणी वाला धागा आहे.

मांजरांबद्दल साधनांचा व जरबेरा ह्यांचा धागा आहे. त्यांच्या लेखनात शोधा.

माझेही दोन शब्द पाळीव प्राणी घेण्यापूर्वी-
1.कुत्रा पाळणे ( फ्लॅट मध्ये) हे लग्न करणे किंवा मूल होवू देणे एवढे मोठा निर्णय आहे.
2. कमीत कमी 12-15 वर्षांची जबाबदारी असते हे लक्षात असू द्या.
3. घरात सर्वांनी कुत्र्याला नाही स्वीकारलं तर त्याला पण त्रास होवू शकतो.
4. कुत्रा , मांजर इत्यादी घरी असताना थोडी फार केस गळती होणारच.
5. कुठलाही प्राणी तुमच्या आधी जाणार , तुमची तशी मानसिक तयारी ठेवा. काही वेळा त्यांना झोपवावे लागते, थोडे मानसिक दृष्ट्या कणखर रहा.
6. कुठेही जाताना / घरातील कार्यक्रम मध्ये घरच्या प्राण्याची आधी सोय बघून ठेवा.
7. आर्थिक बाब ही अजून महत्त्वाची गोष्ट आहे, तुमच्या कुवतीनुसार ब्रीड घ्या.
8. तुमचा फिटनेस ठेवा , जेणेकरून तुम्ही त्याच्या बरोबर हिंडू फिरू शकाल.
9. तुमचा प्राणी हा तुमच्या कौतुकाचा विषय असतो. इतरांना तो आवडेलच अशी खात्री नाही, त्यांच्या मताचा आदर करा.
10. तुमचा प्राणी कुठेही घाण करू शकतो, ती साफ करायची तयारी ठेवा.
विचार करा आणि मगच प्राणी घ्या.
पुढच्या प्रतिसादात, शोभिवंत मासे घ्या आणि आनंदी रहा याची दहा कारणे.

Pages