Submitted by अदिती ९५ on 27 April, 2022 - 23:20
सूर्य महाराज एकदा खूप खूप चिडले
ताप ताप तापले अन् फटकन फुटले
छोटे मोठे गोळे इकडे तिकडे पडले
सूर्याभोवती सारे गोल फिरू लागले
पहिला झाला बुध, सगळ्यात जवळचा
एका वर्षात होतात त्याच्या चार चार फेऱ्या
दुसरा म्हणे मी शुक्र आहे फार तापट
सगळ्यात चमकतो, रंग माझा पिवळट
तिसरी आहे कोण? ही तर आपली पृथ्वी
पक्षी प्राणी माणसांनी इथेच केली वस्ती
चौथा आहे मंगळ पृथ्वीपेक्षा छोटा
माणसांनी शोधला इथे पाण्याचा साठा
पाचवा म्हणे बघा, मी आहे सगळ्यांचा गुरु
एकोण ऐंशी चंद्र माझे लागतात फेर धरू
सहावा शनी फिरतो भोवती घेऊन कडी
वायुंच भांडार हे, इथे ढग करती कडी
सातवा येतो घेऊन रंग हिरवा अन् निळा
अरुण आहे नाव हा तर बर्फाचा गोळा
वरुण माझं नाव, मी ग्रह आहे आठवा
आपल्या सूर्यमालेतला सगळ्यात शेवटचा
सूर्य म्हणे सगळ्यांना मी आहे राजा
तुम्ही सगळे ग्रह अन् मी आहे तारा
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
छान कविता
छान कविता
छान.
छान.
छान आहे. युरेनस आणि नेपच्यून
छान आहे. युरेनस आणि नेपच्यून यांना मराठीत अनुक्रमे अरूण आणि वरूण म्हणतात हे आधी माहीत नव्हते. मला अरूण म्हणजे सूर्य हे माहीत होते.
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
@हरचंदजी, मलाही माहित नव्हते, पण कवितेत यूरेनस आणि नेपच्यून खटकत होतं, म्हणून जरा शोधाशोध.
छान कविता.
छान कविता.
अरूण आणि वरूण ही नावं मलाही माहिती नव्हती.
@ह.पा. अरूण म्हणजे सूर्य की सूर्याचा सारथी?
अरुणोदय झाला sssssssssss
अरुणोदय झाला sssssssssss म्हणतो ना आपण .
हर्षल पण म्हणतात.... बहुतेक
हर्षल पण म्हणतात.... बहुतेक युरेनसलाच
युरेनस म्हणजे हर्षल
युरेनस म्हणजे हर्षल
पण हर्षल हे त्याच्या
पण हर्षल हे त्याच्या शोधकरत्यावरून दिलेलं नाव आहे. पण त्याआधी त्याचा उल्लेख आपल्याकडे करण्यात आलेला आहे. प्रजापती असा अजून एक नाव वाचनात आलं होतं.
मस्त कविता.. आता एक डवार्फ
मस्त कविता.. आता एक डवार्फ ग्रहांबद्धल येऊ द्या..
@ च्रप्स ... धन्यवाद...
@ च्रप्स ... धन्यवाद... प्रयत्न करीन
वावे, बरोबर. अरुण म्हणजे
वावे, बरोबर. अरुण म्हणजे सूर्याचा सारथी. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
अरुणोदय झाला - इथे कदाचित रक्तवर्णी या अर्थाने अरुण असावा (संदर्भ - विकी काका. मला हा संदर्भ द्यायला सहसा आवडत नाही, पण इथे कदाचित बरोबर आहे). किंवा अरुण (आकाशात लाल रंग) आधी येतो व पाठोपाठ सूर्य उगवतो अशी काहीतरी कल्पना असावी.
सारथी अरुण आधी येतो आणि
सारथी अरुण आधी येतो आणि पाठोपाठ सूर्य येतो म्हणून अरुणोदय झाला म्हणतात असं मला वाटत होतं. अरुण म्हणजे लाल रंग हे अजिबात माहिती नव्हतं.
छान कविता.
छान कविता.