Submitted by deepak_pawar on 8 April, 2022 - 13:41
आठवतो आज पुन्हा
माझा गाव माझी माती
सारं काही सोडले मी
वितभर पोटासाठी.
बरसून येती मेघ
भिजूनिया जावे चिंब
ओंजळीत पावसाचे
झेलूनिया घ्यावे थेंब
घेवूनिया हाती काठी
जात होतो पोरं पोरं
माळावरी चरावया
घेऊनिया गुरं ढोरं.
रानपाखरांच्या जैसे
रानिवणी हिंडण्यात
किती आठवू ते दिस
मौज होती जगण्यात.
मग सरले ते दिस
हरवले बालपण
शहरात पोटासाठी
सुरू झाली वणवण.
उलटले दिस मास
किती काळ गेला पुढं
तरी मना अजूनही
आहे गवाचीच ओढ.
सारं काही छान आहे
दिस सरती सुखात
जाई मन उडूनिया
तरी गावाच्या रानात.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर कविता..!!
सुंदर कविता..!!
कवितेचे सादरीकरण हि उत्तम..!!
कविता छान. विडीओ बघितला. तो
कविता छान. विडीओ बघितला. तो ही आवडला. दृश्ये पाहून मन तृप्त झाले.
सुंदर सादरीकरण आणि कविता.
सुंदर सादरीकरण आणि कविता.
रूपाली विशे - पाटील, केशवकूल,
रूपाली विशे - पाटील, केशवकूल, सामो सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.