प्रकाशचित्र
निवडुंग
Cactus
Hummingbird ...
ख्रिसमस एल्फ
गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीपण शाळेतून फॅन्सी ड्रेसची नोट आली होती. गेल्या वर्षीच्या अनुभवामूळे यावेळी मी स्वतःच जरा आधी काय काय बनवता येईल याची कल्पना घेतली होती. शाळेतली एक महत्वाची अट नाताळाच्या संदर्भातलीच वेशभुषा असावी अशी होती.
एल्फ, सँटा, ख्रिसमस ट्री, ख्रिसमस बेल असे काही पर्याय मुलाला दिले आणि नेटवर त्यांची चित्रं दाखवली तर त्याने आधी मला रावण बनायचंय असं सांगितलं. मग सँटा आणि सर्वात शेवटी एल्फ बनूंगा असं उत्तर मिळालं. (वर्गात दरवर्षी बरेच सॅन्टाक्लॉज येत असतात म्हणून एल्फच बन हे मला खूप वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगावं लागलं. )
माझे मातीचे प्रयोग - ५ (Crystalline glazes continued)
समर सेमिस्टर मध्ये जे क्रिस्टलाइन ग्लेझेस बद्दल काम करायला आम्हाला शिकवले तेच या फॉल सेम मध्ये स्वतःहून पुढे चालू ठेवायचे असे मी ठरवले होते. खर तर हे इतके जास्त वेळखाऊ काम होते की क्लास करतांना मी परत हे कधी करायला घेईन असे वाटले नव्हते. खर तर I never realized that I was actually addicted to crystalline glazes.
फॉल सेम मध्ये मी खर तर पाण्याचे जग/ चहाची किटली इ. (pouring vessels) क्लासमध्ये नाव घातले होते. ह्या क्लासच्या सगळ्या असाइनमेंट्स पूर्ण केल्यावर उरलेल्या वेळात क्रिस्टलाइन ग्लेझ करायचे असतील तर परवानगी मिळेल असे सरांनी सांगितले.
हॅपी हॉलिडेज.. !
अटलांटामधल्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये डिसेंबर महिन्यात नाताळ आणि नववर्षानिमित्त दिव्यांची रोषणाई केली जाते. संध्याकाळी सूर्यास्त होता होता म्हणजे साधारण पाच वाजता बाग उघडते आणि १० वाजेपर्यंत उघडी असते. तसही थंडीमध्ये बर्याच झाडांची पानं गळून गेलेली असतात, फुलं, पानं बघायला येणार्या पर्यटकांचा ओघ आटलेला असतो. ह्या रोषणाईच्या निमित्ताने लक्ष दिव्यांनी उजळून निघालेली पुन्हा एकदा पर्यटकांनी फुलून जाते. गेले दोन वर्ष ही रोषणाई बघायला जाणं राहून जात होतं, पण यंदा मात्र योग आला. तिथे काढलेल्या ह्या प्रकाशचित्रांसह तुम्हां सर्वांना आणि तुमच्या परिवाराला नाताळ तसेच नववर्षाच्या लखलखत्या शुभेच्छा !!
वारी ब्रसेल्सची / मेजवानी म्युरल्सची
अनेकांचे जे कॉमिक्स जगतातील दोन हिरो असतात त्यापैकी मी सुरुवातीपासुनच टिनटिनपेक्षा अॅस्ट्रिक्षचा जास्त चाहता आहे. पण ब्रसेल्सला पोचल्यावर टिनटिनच्या त्या शहरावरील दृष्य प्रभावाने आपणही प्रभावीत झाल्याशिवाय राहु शकत नाही. तिथे Hergé Museum तर आहेच (ब्रसेल्सच्या Georges Remi याने Hergé हे नाव वापरुन टिनटिनला घडविला), पण शहरात देखील अनेक म्युरल्स विखुरलेली आहेत. टिनटिन व्यतिरीक्त इतरही. एकानंतर दूसरे अशे ते सतत दिसत राहतात. बेल्जीयन लोकांचे कार्टुन्सवरील प्रेम जाणवल्याशिवाय रहात नाही. रंगवलेल्या भव्य भिंती रस्त्या-रस्त्यांवर त्याची ग्वाही देतात.
येती संत अॅना / आमुच्या पॅसॅडेना
पॅसॅडेना म्हणजे crown of the valley. आपल्या नावाला जागणारे हे टुमदार शहर वसले आहे संत मारीनो या गर्भश्रिमंताच्या खेड्याच्या उत्तरेला व संत गॅब्रीआल पर्वतरांगेच्या पायथ्याशी (विश्वाचा पसारा वाढवणाऱ्या हबलच्या शोधाची दुर्बीण असलेल्या माऊंट विल्सन फेम).
Jujubes ...
Pages
