नाताळ

हॅपी हॉलिडेज.. !

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

अटलांटामधल्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये डिसेंबर महिन्यात नाताळ आणि नववर्षानिमित्त दिव्यांची रोषणाई केली जाते. संध्याकाळी सूर्यास्त होता होता म्हणजे साधारण पाच वाजता बाग उघडते आणि १० वाजेपर्यंत उघडी असते. तसही थंडीमध्ये बर्‍याच झाडांची पानं गळून गेलेली असतात, फुलं, पानं बघायला येणार्‍या पर्यटकांचा ओघ आटलेला असतो. ह्या रोषणाईच्या निमित्ताने लक्ष दिव्यांनी उजळून निघालेली पुन्हा एकदा पर्यटकांनी फुलून जाते. गेले दोन वर्ष ही रोषणाई बघायला जाणं राहून जात होतं, पण यंदा मात्र योग आला. तिथे काढलेल्या ह्या प्रकाशचित्रांसह तुम्हां सर्वांना आणि तुमच्या परिवाराला नाताळ तसेच नववर्षाच्या लखलखत्या शुभेच्छा !!

विषय: 

नाताळच्या शुभेच्छा ... חג מולד שמח

Submitted by सेनापती... on 25 December, 2010 - 18:30

सध्या इस्राईल येथे असल्याने शीर्षकात लिहिले आहे ते 'हिब्रू'मध्ये 'नाताळच्या शुभेच्छा' असे लिहिले आहे... Lol

आपल्याकडे दिवाळी-दसरा तसा नाताळ हा पाश्चिमात्य देशांचा सर्वात मोठा सण.. आमच्याकडे बोटीवर सुद्धा ह्या निमित्ताने धमाल असते. आपला संता येतो आणि मग खूप धमाल. जेवण, नाचगाणी आणि खूप सारी चोक्लेट्स... हे काही कालचे फोटो... Happy

१. ख्रिसमस ट्री, खूप सारी चोक्लेत्स आणि वाईन (नॉन अल्कोहोलिक.. अल्कोहोल बोटीवर अलाउड नाही.)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आमचा एंजल

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

५-६ दिवसांपूर्वी लेकाच्या शाळेतून डायरीवर नोट आली, २४ तारखेला मुलांना सांताक्लॉज, एंजल, फेयरी यापैकी एका वेशभुषेमध्ये पाठवावे.
तर आज एंजलच्या वेशभुषेत आयाम शाळेत गेला होता. त्यासगळ्याची ही कृती.

सर्वात आधी २२ तारखेला पुपुवर चर्चा सुरु केली. बरेच वेगवेगळे सल्ले मिळाले. त्यातला रैनाने सुचवलेला रिसायकल कपड्यातून सरळ सोप्पा सांताक्लॉज बनवण्याचा पर्याय सगळ्यात सोप्पा वाटला. तरीही त्याकडे दूर्लक्ष केलं. नीरजा, प्राची आनि इतरांनी एंजल बनण्यासाठी काय काय साहित्य लागेल हे सांगितल्यावर घरात असलेल्या साहित्य शोधून ठेवलं. नसणार्‍या वस्तूंसाठी पर्यायी काय वापरता येईल याचा अंदाज घेतला.

प्रकार: 

ग्लुवाईन (Glühwein)

Submitted by रूनी पॉटर on 5 January, 2009 - 16:43
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
पाककृती प्रकार: 
Subscribe to RSS - नाताळ