ख्रिसमस एल्फ
गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीपण शाळेतून फॅन्सी ड्रेसची नोट आली होती. गेल्या वर्षीच्या अनुभवामूळे यावेळी मी स्वतःच जरा आधी काय काय बनवता येईल याची कल्पना घेतली होती. शाळेतली एक महत्वाची अट नाताळाच्या संदर्भातलीच वेशभुषा असावी अशी होती.
एल्फ, सँटा, ख्रिसमस ट्री, ख्रिसमस बेल असे काही पर्याय मुलाला दिले आणि नेटवर त्यांची चित्रं दाखवली तर त्याने आधी मला रावण बनायचंय असं सांगितलं. मग सँटा आणि सर्वात शेवटी एल्फ बनूंगा असं उत्तर मिळालं. (वर्गात दरवर्षी बरेच सॅन्टाक्लॉज येत असतात म्हणून एल्फच बन हे मला खूप वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगावं लागलं. )