नाताळच्या शुभेच्छा ... חג מולד שמח

Submitted by सेनापती... on 25 December, 2010 - 18:30

सध्या इस्राईल येथे असल्याने शीर्षकात लिहिले आहे ते 'हिब्रू'मध्ये 'नाताळच्या शुभेच्छा' असे लिहिले आहे... Lol

आपल्याकडे दिवाळी-दसरा तसा नाताळ हा पाश्चिमात्य देशांचा सर्वात मोठा सण.. आमच्याकडे बोटीवर सुद्धा ह्या निमित्ताने धमाल असते. आपला संता येतो आणि मग खूप धमाल. जेवण, नाचगाणी आणि खूप सारी चोक्लेट्स... हे काही कालचे फोटो... Happy

१. ख्रिसमस ट्री, खूप सारी चोक्लेत्स आणि वाईन (नॉन अल्कोहोलिक.. अल्कोहोल बोटीवर अलाउड नाही.)

२. केक्स, पाई आणि अजून काही स्वीट्स... Happy काल गोड खाऊन हालत खराब... Lol

३. फिश प्लाटर ..

४. लोंबसटर्स ... हे माझे एकदम आवडते...

५. अंड्यावर बहुदा गाभोळीची चटणी टाकलेली होती... Happy हे बेस्ट होते..

६. टर्की...

७. चला.. आता जरा जेवून घेतो..

८. अखेर संता आला.. Happy

९. संता की गोदी मे... मला माझे गिफ्ट मिळाले... Lol

१०. संता बरोबर... Happy

११. आणि शेवटी धमाल म्हणे आमच्या चेस / सप्लाय करणाऱ्या बोटीवरच्या लोकांसाठी आम्ही संताला घेऊन चक्क छोटी बोट घेऊन तिकडे गेलो... Happy

संता घोडागाडी तून वगैरे यायचा ऐकले/पहिले असेल.. पण चक्क बोटीतून... हे हे . Lol

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सुंदर ! कुठंही बोट ठेवायला जागा नाही !!
नवीन वर्षात असेच सुखसागरात तरंगत रहा, अशा तुम्हाला व सहकार्‍याना शुभेच्छा !

मस्त मस्त !!
रोहन मज्जाय तुझी. तुला संताने दत्तक घेतला म्हणजे पाहिजे ते मिळेल तुला. जरा त्याच्याकडे आमच्यासाठी चॉकलेट्स मागशील (एकदाही चॉकलेट्स आणली नाहियेस आमच्या साठी Angry Proud ). संताचा पाय बरा आहे ना? Wink

ते बाकीच्या सटरफटर पदार्थांचे फोटॉ छान आहेत मी खात नसले तरी Happy

अश्विनी...

एकदाही चॉकलेट्स आणली नाहियेस आमच्यासाठी.

>>> कितीदा भेटली आहेस गं??? एकदा? (ते मंजिरीच्या घराखालचे भेटणे नको हा सांगू... :P)
तू भेट पुढच्या वेळी... चॉकलेट्स आणतो.. वाट बघ.. Lol म्हणजे थोडी वाट बघ.. मी आणतो असे गं... Wink

आणि हा ते पदार्थ सटरफटर नव्हे... Proud खायला सुरवात कर... ताकद आता है.. मालूम!!! Wink

अव्वा !

दोनदा भेटले की ! एकदा मंजूच्या घराखाली Proud आणि एकदा राजमाताबाहेर. अपुनतो मित्र मैत्रिणींके साथ कांदाभजी खाके भी खुश होता हय. मी ते चॉकलेट्सचं आपलं तुला अलिखित रुल सांगण्यासाठी सांगितलं, बाकी काय नाय.

बहुतेक 31st ही झालेला दिसतोय प्रचि १ मध्ये.
धम्माल आहे तुम्चि यार्...ते सजवलेले पदार्थ बेस्ट.. तोंपासु... thumbsup.gif

मस्तच प्रचि रोहन.. अगदी तोंपासु.. Happy
अश्विनीला अनुमोदन.. (बादवे.. माझा हात बरा झालाय त्यामुळे दोन्ही हात भरभरुन चॉकलेट्स घेऊ शकेन.. Proud )

एक झब्बू. x-mas च अजून एक राहिलेलं. आमच्या इथल्या हॉस्पिटलमधल्या बच्चेलोकांनी बनवलेली जिंजरब्रेड हाऊसेस.

Gingerbread.jpg

लॉब्स्टर्स, टर्की, गाबोळीवाली अंडी... चॉकोलेट्स, केक्स, पाई... स्स्स्स्स्स्स्स्स्स्स खरंच तोंपासू! मस्त प्रचि पक्का भटक्या!
संताचा पाय बरा आहे ना? >> Lol अश्विनी अगदी अगदी!

आर्च, मुलांनी केलेले डेकोरेशन वाटतच नाहीये इतकं अप्रतिम... खरंच खुप खुप खुप मस्त हाऊसेस. माझ्याकडून सगळ्या बच्चेकंपनीचं खुप खुप कौतुक आणि हॅप्पी न्यू इयर सगळ्यांना :)!

भटक्या, फोटू मस्त आहेत. विशेषतः चॉकलेटचे. Proud ( मालदीवला आल्यावर आधी चॉक्लेटस द्यावे लागतील ह्म मला. तरच पुढची माहिती सांगीन.)
बाकीच्या पदार्थांबाबत अश्विनीला अनुमोदन. मीपण शाकाहारी.

संताचा पाय बरा आहे ना? >>

>>>सर्व संताच्या डाव्या पायावर बसत होते म्हणून मी उजव्या पायावर बसलो... Happy

रुणुझुणू ... आधी थोडी माहिती तर डे... Happy मग पुढे बघू... Wink

Pages