वारी ब्रसेल्सची / मेजवानी म्युरल्सची
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
अनेकांचे जे कॉमिक्स जगतातील दोन हिरो असतात त्यापैकी मी सुरुवातीपासुनच टिनटिनपेक्षा अॅस्ट्रिक्षचा जास्त चाहता आहे. पण ब्रसेल्सला पोचल्यावर टिनटिनच्या त्या शहरावरील दृष्य प्रभावाने आपणही प्रभावीत झाल्याशिवाय राहु शकत नाही. तिथे Hergé Museum तर आहेच (ब्रसेल्सच्या Georges Remi याने Hergé हे नाव वापरुन टिनटिनला घडविला), पण शहरात देखील अनेक म्युरल्स विखुरलेली आहेत. टिनटिन व्यतिरीक्त इतरही. एकानंतर दूसरे अशे ते सतत दिसत राहतात. बेल्जीयन लोकांचे कार्टुन्सवरील प्रेम जाणवल्याशिवाय रहात नाही. रंगवलेल्या भव्य भिंती रस्त्या-रस्त्यांवर त्याची ग्वाही देतात.
विषय:
प्रकार:
शेअर करा