तत्त्वज्ञान
तडका - संयम
तडका - छुप्या कँमेर्याचे सत्य,.!
छूप्या कँमेर्याचे सत्य,..!
कुणा-कुणाच्या नैतिकतेत
नको तितकी खोट असते
त्यांच्यामुळेच माणूसकीला
पून्हा-पून्हा गाल-बोट असते
जणू अनैतिकतेच्या परामर्शाने
विचारच त्यांचे नासवलेले असतात
म्हणूनच महा-कोडगांच्या औलादींनी
कुठे छूपे कँमेरे बसवलेले असतात,..
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
तडका - कायद्याचा धाक
कायद्याचा धाक,...
निवडणूका म्हटलं की
कुणाचा तोल जाऊ शकतो
कधी प्रचारातुन आचाराचा
संहिता भंगही होऊ शकतो
मात्र प्रसंगावधान बाळगत
वर्तनुकीत ना बाक पाहिजे
कायदा आणि सुव्यवस्थेसाठी
कायद्याचाही धाक पाहिजे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
...
काढून टाकले काढून टाकले काढून टाकले काढून टाकले काढून टाकले काढून टाकले काढून टाकले
तडका - सन्मान
सन्मान,...
चांगले काम करण्याच्या
प्रत्येकाला संधी असतात
अन् प्रत्येकाच्या कार्याच्या
इथे सर्व नोंदी असतात
त्यांच्या सत्कार्याचा भाग
देशाचीही शान होतो
अन् प्रत्येकाच्या सत्कार्याचा
सन्मानानं सन्मान होतो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
तडका - निवडणूकातील निवडचूका
मानवी स्पंज आणि स्प्रिंग!
तुम्ही दु:खात आणि ताणतणावात असाल तर शक्यतो कुणाला सांगू नका. कारण दु:खावर खरी सहानुभूती देणारे तुम्हाला भेटणार नाहीत किंवा खूपच कमी भेटतील. उलट तुम्ही दु:खी मन:स्थितीत किंवा समस्यांनी वेढलेले आहात हे पाहून तुम्हाला आणखी त्रास देण्याचा प्रयत्न जरूर होईल. त्या मन:स्थितीचा फायदा घेतला जाईल. उदाहरण द्यायचे झाले तर आधीच चोळामोळा झालेला कागद रस्त्यावर पडलेला असला तर त्याला आणखी पायाखाली दाबून किंवा आणखी चोळामोळा करणारे आणि समुद्रात फेकून देणारे लोक जास्त असतील.
तडका - आरक्षणाचा विचार
निसर्ग नियम आणि मानवी जीवन..!!
हे जग निसर्गनियमानुसार चालते. म्हणजे जे पेरले ते उगवते. तसेच पुन्हा पुन्हा पेरले की पुन्हा पुन्हा उगवते. त्या नियमानुसार कोणतीही गोष्ट करण्यासाठी कधीही वेळ "निघून गेलेली" नसते. वेळ/काळ परत परत येत राहतो. जीवन आपल्याला पुन्हा पुन्हा संधी देत असते. ती आपल्याला फक्त दिसली पाहिजे. जीवनाकडे सकारात्मक दृष्ट्या पाहिल्यास काहीही अशक्य नसते. प्रयत्न करीत राहावे आणि फळ निसर्गावर सोडून द्यावे. चांगल्या गोष्टी पेरत जाव्या. निसर्ग नियमानुसार फळ मिळतेच. चांगल्या कर्माचे फळ चांगले मिळते आणि वाईट कर्माचे फळ वाईट मिळते. चांगले कर्म करा आणि चांगल्या फळाची अपेक्षा जरूर करा.
Pages
![Subscribe to RSS - तत्त्वज्ञान](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/misc/feed.png)