...

Submitted by प्रकु on 28 March, 2015 - 15:29

काढून टाकले काढून टाकले काढून टाकले काढून टाकले काढून टाकले काढून टाकले काढून टाकले

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोर संस्कृत व्याकरणकार पाणिनी यांच्याबद्दल एक दंतकथा प्रसिद्ध आहे. त्या दंतकथेनुसार पाणिनी महाशयांचे गुरु, अध्ययन न केल्याबद्दल त्यांना छड्या देत असतात. छड्या देता देता अचानक थांबून ते त्यांच्या हाताकडे बघतात वं म्हणतात, 'आरे बाळ, तुझ्या हातावर तर विद्येची रेखाच नाही! तुला येत नाही यात तुझी काहीच चूक नाही . कारण अध्ययन हे तुझ्या नशिबातच नाही. त्यामुळे हे तुला जमणारच नाही.' अस म्हणून ते महाशयांना गुरुकुलातून काढून टाकतात.
पाणिनी महाशयांच पुढे काय होत हा तर इतिहासच आहे.

दंतकथेतील चु.भू.दे.घे. आशय तेवढा लक्षात घेणे.

अशा कथांमुळे माझे असे मत झाले आहे कि नशीब भविष्य हे फक्त सामान्य माणसाला थांबवू शकतात. जेव्हा माणूस ठरवतो कि मी हे करणारच, तेव्हा तो ते करतोच. मग नशिबाला मान्य असो अथवा नसो.
अशा प्रकारे नशिबाने आखून दिलेली सीमारेषा ओलांडून जाणारे लोकं थोर म्हणवले जातात. आणि नशिबात लिहिल्याप्रमाणे आयुष्य व्यातीत करणारे लोक म्हणजे आपण सामान्य लोक !
हे माझं मत तुम्हाला कितपत बरोबर वाटत.?

अशा अजून काही कथा असतील तर कृपया share करा. positive आणि negative दोन्ही !

आणि त्या दिवशी अस करा, interview ला जाऊच नका. घरीच बसा. आणि बघा जॉब मिळतो का. १०१% नाही मिळणार.
बघा. बदललात कि नाही तुम्ही स्वतःच नशीब...!>>

असं तुम्हाला वाटतं.
खरं तर त्यादिवशी 'नशीब बदलण्यासाठी म्हणून इंटर्व्यूला न जाता तुम्ही नोकरी घालवून बसणार' हेच तुमच्या नशीबात लिहिलेले असणार.
Wink

प्रतिक,
मला खरं तर हेवा वाटतो, जे लोक नशीब / विधिलिखीत या सगळ्यावर विश्वास ठेवतात त्यांचा. त्यांच्या दृष्टीने किती मजबूत धागा असतो ना हा ? चांगले घडो वा वाईट घडो, नशीबात असेल तेच होणार / होनी को कौन टाल सकता है / जे काही होतं ते चांगल्यासाठीच बरं... अश्या वाक्यात त्याना सगळेच सहन करायचे बळ मिळते.

मी पुर्ण तयारी करून मुलाखतीला जाईन म्हणतो.. आणि निवड नाही झाली ना, तर " खुदा उन्हे और दिल दे, ना मुझको जुबाँ और " असे म्हणत त्यांचे भले चिंततो.

@साती ,
तुमचा शाब्दिक युक्तिवाद पटला. मुळ लेखनात त्या दृष्टीने थोडासा बदल केलाय.
कृपया आशय लक्षात घेऊन त्यावर मते मांडावीत हि विनंती..

@ दिनेश,
आपला मुद्दा वाचून मला जाणवले कि माझ्या मुळ धाग्यातील लिखाणात स्पष्टपणा नव्हता. क्षमा असावी. त्याप्रमाणे बदल केला आहे. त्यातील शेवटच पेरेग्राफ पाहावा.

माझा मुद्दा अजूनही तोच आहे !
कुणी विनोद कांबळीच्या पत्रिकेत क्रिकेट्चा आणि अमित कुमारच्या पत्रिकेत गाण्याचा योगच नव्हता हे बघून सांगेल काय ?

विधीलिखित बदलता येते की नाही माहीत नाही, पण ते असते एवढे मात्र खरे..
मला कित्येकदा पुढे घडणार आहे ते स्वप्नात दिसते..
डेजावू नाही हा.. कारण त्यात ते घडताना आपण हे पाहिल्यासारखे भासते.. मला आधीच पाहिलेले आठवत असते आणि ते घडायला सुरुवात होताच पुढे काय काय होणार हे मी चक्क एका कागदावर लिहू शकतो इतपत आठवते.. पण बस्स एक लिमिट आहे त्याला.. उगाच आठवायचे म्हटले तर प्रयत्न करून आठवत नाही, .. म्हणजे काय किती केव्हा आठवावे हे माझ्या हातात नसते..

अगदी क्रिकेटचा सामना बघतानाही मी हा अनुभव घेतलाय.. अरे हा सामना मी पाहिलाय असे आठवते.. मग पुढे कोण सेंचुरी मारणार, विकेट काढणार, वा विनिंग शॉट कसा असणार, किती फरकाने कोण जिंकणार वगैरे जसे आधी पाहिलेल्या पिक्चरची स्टोरी आठवावी तसे आठवते..

ऋन्मेष बाबा की जय!

प्लीज आजच्या मॅचचे काही प्रेडीक्शन पाहिले असतील तर इथे लिहून ठेवा.
आज किती ऑसिज पन्नास रंचा Wink करतील ते लिहीलंत तरी पुरे.
Happy

प्रतिक, आता मात्रं तुम्ही नव्या सापळ्यात अडकलात.
जगला वाचला तर हा धागा आता 'पत्रिका /ज्योतिष सत्य की थोतांड ' याच मार्गाने जाणार.
त्यावर माबोवर 'य' वेळा चर्चा झाली आहे.
Wink

असो. पण मला तुमचा मुद्दा कळला.
थोडक्यात तुम्हाला 'कर्मण्ये वाधिकारस्यै' म्हणायचंय.
जे मला पूर्णं पटतंय.
मात्रं, तरिही 'जे नशीबात असेल तेच होणार' यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
अर्थात हे नशीबाचे भाकित १०० टक्के कोणताही ज्योतिषी वर्तवू शकत नाही यावरही विश्वास आहे.
तेव्हा मनाला योग्य आहे असे पटेल ते आणि जितके पूर्ण प्रयत्न करता येतील तितके करून आपले कार्य करत रहावे असे मी म्हणेन.

प्रतिक..

काही केसेस घेउया.
१..माझा दहावीचा पेपर आहे. मी वर्षभर कसुन अभ्यास केला आहे. पेपरही उत्कृष्ट लिहिला आहे. यात १०० पैकी १०० मिळणारच ही मला खात्री आहे. आता हे पेपर्स परीक्षा केंद्रावरुन तपासण्यासाठी नेत आहेत. समजा ह्युमन एरर ने माझा पेपर ज्यात आहे तो गठठा गहाळ झाला, कुठे पडला, आता यात मी कितीही कर्तृत्ववान असलो आणि पेपर कितीही छान सोडवला तरी त्याचा काय उपयोग झाला?

२. मी विमानाचे तिकिट काढले आहे. वेळेवरही गेली. वेदरही छान आहे. पण समजा पायलटचे डोके फिरले आणि त्याने विमान पाडले (Recent case) यात माझी काहीच चुक नाही.. करेक्ट?

३. मध्यंतरी अभिनेते आनंद अभ्यंकर यांचे अपघाती निधन झाले त्यात त्यांची गाडी योग्य लेनमधेच होती..त्यांच्या गाडीवर विरुद्ध दिशेने जाणारी गाडी येउन आदळली. काय चुक केली होती त्यांनी?

तुम्ही जे उदाहरण घेतले आहे ते Oversimplification आहे. इंटरव्यु च्या दिवशी इंटरव्युला न जाता घरी बसणे हा मुर्खपणा कोणी नशीबावरुन अवलंबुन (भविष्यावर विश्वास ठेवणारा जरी असेल तरी) करेल असे वाटत नाही.

जेव्हा सगळे काही योग्य करुनही काही गोष्टी Workout होत नाहीत तेव्हा मग माणुस मग त्याची कारणे शोधायला लागतो..काहीच कारण नाही मिळाले मग "विधीलिखित" हेच एक कारण वाटते की हे असेच होणार होते.

तात्पर्य हेच की आपण आपल्या परीन योग्य काम करत जावेच त्याने यश मिळण्याची probability वाढतेच. पण जे External Factors असतात त्यावर आपले काहीच नियंत्रण नसते. त्यामुळे आपण आपले काम चोख करुन Hope for the best एवढेच आपण करु शकतो.

@ दिनेश
>>>>>>>>>>>>>> नशीबात असेल तेच होणार / होनी को कौन टाल सकता है / जे काही होतं ते चांगल्यासाठीच बरं... अश्या वाक्यात त्याना सगळेच सहन करायचे बळ मिळते. <<<<<<<<<<<<<<<<<<<<<

अशा वाक्यांमुळे सहन करण्याचे बळ मिळते हे बरोबर असेलहि , पण याचा एक negative परिणाम सुद्धा असतो.
माणूस नशीब होनी इ.इ. करणे देऊन स्वतःच्या चुका त्यामागे लपवायला लागतो .
त्याएवजी नशीब न मानणारे (अथवा कधी कधी मानणारे) परखडपणे स्वतःच्या चुका शोधतात. त्या सापडतात सुद्धा . त्यावेळी वाटत नशीब वगेरे असं काही नसत. नशिबाच नाव सांगून आपल्या चुका लपवण्यापेक्षा त्या शोधून सुधारून खूप जास्त प्रगती करता येईल अस मला वाटत...

@ mansmi ,
तुमचे सर्व मुद्दे मला मान्य आहेत. जेव्हा असे external uncontrollable factors असतात तेव्हा विधीलिखीत हे म्हणावेच लागणार. आणि त्यात काही गैर पण नाही . परंतु आजकाल नशीब हा factor सरसकट सगळीकडे मानवी चुका झाकण्यासाठी वापरला जातो.
त्याला माझा आक्षेप आहे.

@ साती,
>>>>>>>>>>> असो. पण मला तुमचा मुद्दा कळला.
थोडक्यात तुम्हाला 'कर्मण्ये वाधिकारस्यै' म्हणायचंय.
जे मला पूर्णं पटतंय.<<<<<<<<<<<<<<<<<

अगदी बरोबर, धन्यवाद.

आणि तुम्ही म्हण्नल्यासारखे ज्योतिष सत्य कि थोतांड कडे जाऊ लागला तर मी हळूच इथून पळ काढेल Wink

काहीहि घडल तरी ते विधिलिखिताप्रमाणेच घडला असा युक्तिवाद करता येतो. विधिलिखित हे ब्रह्मदेवाने लिहिले असते व त्याची फोटोकॉपी मिळण्याची सोय नसल्याने ज्योतिषी जे सांगतात ते आपण विधिलिखित मानतो.
मला अगोदर वाटल विधिलिखित म्हणजे आदिनाथ साळवीं च ब्रह्मवाक्य.

'विधिलिखीत बदलता येतं का' ह्या प्रश्नात एक गृहितक आहे की ते आधी वाचता येतं. मला वाटतं की एखादी घटना घडून गेल्यावर, 'ते असच घडणार होतं' ही hindsight असते. तसही, घडलेली गोष्ट बदलता येत नाही. मग तुम्ही त्या घटनेला वस्तुस्थिती म्हणून स्विकारा किंवा विधिलिखीत म्हणून. स्वतःचा पार्ट व्यवस्थित करावा आणी निकाल जो लागेल तू स्विकारावा. त्यातून काही शिकण्यासारखं / करण्यासारखं असेल, तर जरूर शिकावं / करावं, अन्यथा पुढे जावं.

माझे विधीलिखीत काय आहे हे मला माहितच नाही. तेंव्हा फक्त प्रयत्न करणे एव्हढेच माझ्या हाती. आता नशीब म्हणाल तर हे शास्त्र पुरेसे अभ्यासले गेले नाही, त्यात चुका होण्याची, अपूर्ण असण्याची शक्यता अधिक. त्यामुळे त्यावर अवलंबून रहाण्यात अर्थ नाही.
गीतेत देवाने अर्जुनाला नुसतेच लढणे हे तुझे कर्तव्य आहे, जिंकशील याची खात्री नाही, पण मेलास तर स्वर्गात जाशील जगलास तर राज्य उपभोगशील असे मोघम सांगितले आहे. नक्की काय हे जर देव सुद्धा आपल्या अतिप्रिय शिष्याला सांगणार नसेल तर आपल्यासारख्यांनी कशाला त्याच्या नादी लागायचे?
वाटले तर प्रयत्न करावेत, नाही जमले तर नाही. प्रयत्न केल्याचेहि समाधान असते, जर मनःपूर्वक प्रयत्न केले तर. पण जे श्रीमंत झाले, यशस्वी झाले त्यांचा हेवा करू नका, त्यांनी लबाडी केली असे बिनपुराव्याचे आरोप करू नयेत.
ज्यांना काही न करता, आळशासारखे बसून यशस्वी व्हायचे असते ते यावर विश्वास ठेवतात, नि जे स्वस्थ न बसता, अश्या लोकांना लुबाडण्याचे का होईना, कष्ट घेतात त्यांना पैसे मिळतात. बाकीचे मागून उगीचच नसते आरोप त्यांच्यावर करत बसतात - पण जाम काम करायचेच नाही ही वृत्ति!