राजकीय फडात
कधी कात्रीत कधी सैल
फैलावल्या जातात रेंज
परिस्थितीनुरूप कधी
स्टेज सुध्दा होतात चेंज
कधी लोकाचे आपले तर
आपले कधी लोकाचे असतात
राजकीय शत्रु अन् मित्रत्वाचे
कधीच निर्णय टोकाचे नसतात
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
निर्भय निर्गुन गुन रे गाऊँगा
काव्य म्हणून पाहता पहिल्याच ओळीत 'निर्गुणाचे गुण गाणे' असा वरवर विरुद्ध वाटेल असा शब्दप्रयोग आहे. निर्गुण! ज्याला काहीच गुण नाहीत असा एक अर्थ आणि जे सत्व,रज, तम या गुणांच्या पलिकडचे आहे असे असा दुसरा अर्थ. दोन्ही अर्थ त्या निर्गुणाच्या बाबत योग्यच आहेत, पण मला दुसरा अर्थ जास्त चपखल वाटतो.
शान महाराष्ट्राची
या भुमीवर शौर्य ऊजळती
अहो गरजती यश वल्गना
चरा चरातुन मिळतो सन्मान
नव पिढीच्या कला गुणांना
वैचारिक त्या क्रांतीमधली
इथे सदाबहर ही ऊत्तराची
महाराष्ट्रवासी राखु सदैव
जगी शान ही महाराष्ट्राची
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
विरोधक
कोणी विरोधक नसेल
तर लढायला मजा नाही
म्हणूनच तर जीवनात
विरोधकही खुजा नाही
स्वेच्छेने विरोध करणे
विरोधक मनावर घेतात
सर्वात जास्त प्रसिध्दी
विरोधकच तर देतात
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
आदर्श
आदर्श घडवताना
आदर्श घोटाळा झाला
आदर्शच्या बरखास्तीस
आदर्श वेटोळा आला
आदर्श कोर्ट कारवाईत
आदर्श घेरू शकते
आदर्श पाडली तर
आदर्श ठरू शकते
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
सहज प्रत्येक धागा वेगळा काढून झाला
असा हा 'मोकळा गुंता' कुणाहातून झाला
तशी तर स्क्रीनवर होती कुणी दुसरीच मुलगी
कितीवेळा तुझा मुखडा पुढे आणून झाला
किती दाटून येतो पण कुठे बरसून जातो
तुझा आवेग बहुधा कोरडा मान्सून झाला
कशाला अर्थ सांगू नेमका माझ्या मनाचा
तुला जो पाहिजे होता तुझा लावून झाला
तुला मिळणार नाही विठ्ठला माफी कधीही
मला हा रोग जो झाला..तुझ्यापासून झाला!
~वैवकु
सोनसाखळी चोरांनो
समाजात झाला
चोरांचा हुरसूळा
सोनसाखळी वर
चोरांचा डोळा
साखळी चोरांस
फसावं लागेल
पाच वर्षे कैदेत
बसावं लागेल
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
सोनसाखळी चोरांनो
समाजात झाला
चोरांचा हुरसूळा
सोनसाखळी वर
चोरांचा डोळा
साखळी चोरांस
फसावं लागेल
पाच वर्षे कैदेत
बसावं लागेल
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
काम देई नाम
काम करताना
राखावे भान
प्रत्येक कामात
जपावी शान
तरच जीवनात
मिळेल मान
नाही तर जीवन
क्षणात तमाम
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
उड़ जाएगा हंस अकेला।
जग दर्शन का मेला ।। धृ ।।
जैसे पात गिरे तरुवर के ।
मिलना बहुत दुहेला ।
ना जानू किधर गिरेगा ।
लग्या पवन का रेला ।। 1 ।।
जब होवे उमर पूरी ।
जब छूटेगा हुकुम हुजूरी ।
जम के दूत बड़े मजबूत ।
जम से पड़ा झमेला ।।2 ।।
दास कबीर हर के गुण गावे ।
वा हर को पार न पावे ।
गुरु की करनी गुरु जाएगा ।
चेले की करनी चेला ।। 3 ।।
- तसं समजायला सोपं असं हे निर्गुणी भजन.