पुळकेबाज लोक
आपल्याकडे असेल तरच
आपले झाकुन ठेवता येते
पण आपल्याकडे नसतानाही
लोकांचे वाकुन पाहता येते
ज्या गोष्टींची घ्यावी त्यांची
दखल कुणी ना घेत असतात
पण नको त्या गोष्टींचे पुळके
नको त्या व्यक्तींना येत असतात
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
दुखण्याचा आधार
जेलमधील जगण्याला
गुन्हेगार बेजार असतो
पण कोठडीतील व्यक्तींना
दुखण्याचा आधार असतो
ज्यांना सासर समजले
तेच कधी माहेर होतात
कायद्याने आत गेलेलेही
कायद्यानेच बाहेर येतात
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
विदारक सत्य
प्रत्येकाच्या विचारांतुन
प्रत्येकाची पारख असते
कधी वास्तव मधाळ तर
कधी ते विदारक असते
समोर आल्या घटनांनाही
मनी साचवाव्या लागतात
न पटणाऱ्या गोष्टी देखील
कधी पचवाव्या लागतात
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
राजकीय वगात
राजकारण प्रेमींनी
राजकारणातुन शिकावे
राजकारण करताना
टिका करून टिकावे
राजकारणात टिका हि वार
तर कधी कधी ढाल असते
पण खरं तर यांचीही अन्
त्यांची सुध्दा लाल असते
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
सावरा वसुंधरा
जगण्यासाठी जीवन हवं
जीवनासाठी जमीन हवी
हिच जमीन जपण्यासाठी
कर्तव्यात कमी न व्हावी
भविष्यात होणारा धोका
आता लक्षात यायला हवा
पृथ्वी वाचवण्याचा जीम्मा
माणसांनीच घ्यायला हवा
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
सुनता है गुरु ग्यानी ।
गगन में आवाज हो रही
झीनी झीनी ।
नभ मेघांनी आक्रमिले...घन घन माला नभी दाटल्या...त्या ढगांचा गडगडाट होतो आहे आणि लवकरच पाऊस सुरू होणार आहे ही सामान्य घटना कबीर एका वेगळ्या नजरेतून बघतात.
आणि त्यांच्या 'भाई साधो' लोकांना प्रश्न विचारतात..
सुनता है गुरु ग्यानी? गगन में आवाज हो रही, झीनी झीनी. माझ्या ज्ञानी मित्रा, तुला गगनात होणारा आवाज ऐकू येतोय ना?
बघ तर तुला काय सांगतो हा आवाज?
ज्या ढगांचा हा आवाज आहे त्यांच्या पलीकडे पाणी आहे. आणि त्या बिंदूच्या आधीही 'नाद' ऐकू येतो. साधनेत सर्वप्रथम 'अनहत नाद' च ऐकू येतो आणि मग बिंदू दिसतात.
पाहिले आये नाद बिंदू से
आमचा सल्ला
नैसर्गिक या दुष्काळात
राजकीय सुकाळ आहे
टिका आणि टिपण्यांचा
बहरलेला अवकाळ आहे
असे ऊकसत बसण्यापेक्षा
परिस्थितीचे भान धरावे
एकमेकांची खेचण्यापेक्षा
एकत्रितपणे काम करावे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
घोटाळ्यांत
घोटाळ्यांच्या शिडीवरती
भले भले स्वार असतात
त्यांच्या त्या भ्रष्ट प्रवृत्तीचे
सामान्यांवर वार असतात
जोवर मलाई मिळेल तोवर
भ्रष्टाचारी घोटाळ्यांचे फॅन
मात्र घोटाळा बाहेर येताच
पद प्रतिष्ठाही होते म्यान,..
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
लाच एक खाच
लाच घेणे आणि देणेही
कायद्यानेच गुन्हा आहे
तरी देखील लाचखोरीचा
व्यवहार पुन्हा पुन्हा आहे
हि लाचखोरी टाळण्यासाठी
जन जागरण आहे गरजेचे
तेव्हाच सामाजिक वातावरण
होईल सुव्यवस्थेच्या बेरजेचे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
हीरना समझ बूझ बन चरना ।।
कुणी तरी अमुक व्यक्ती चूक करणार आहे आणि ती चूक त्याच्या जिवावरच बेतणार आहे हे दुसऱ्या कुणा तमुक व्यक्तीला समजलं तर ती तमुक व्यक्ती अमुक व्यक्तीला सावध करेल. ती चूक करु नकोस म्हणून सांगेल. अमुक आणि तमुक जर खूप जवळचे असतील तर ज्या तळमळीने हे सावध करण्याचं काम होईल तीच तळमळ कबीरांची आहे आणि हे भजन गाणाऱ्या कुमारांचीही.
सुरुवातीचं 'हीरना'च असं काही म्हटलंय की ऐकताना ते आपल्यालाच उद्देशून आहे असं वाटतं.