तडका - सशक्त जीवनासाठी
सशक्त जीवनासाठी
तंबाखु गुटखा
पान मसाला
जीवाला घातक
हौस कशाला
सशक्त जिवनाचे
सुर पहावे
व्यसना पासुन
दूर रहावे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
सशक्त जीवनासाठी
तंबाखु गुटखा
पान मसाला
जीवाला घातक
हौस कशाला
सशक्त जिवनाचे
सुर पहावे
व्यसना पासुन
दूर रहावे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
वाटणीचे सत्य
विदर्भाचे जनक होण्यासाठी
स्वप्नांची धडपड ऊशाला
एका आण्याचा केक कापुन
जीवाची तडफड कशाला,.?
वेगळा संसार थाटण्या साठी
आता भलतेच आतुर आहेत
पण घराची वाटणी करण्या
घरातलेच फितुर आहेत,...!
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
एका खाजगी बैठकीत शरद पवार यांनी एका विद्वानाला भाक्रा नांगलचे नियोजनकर्ते कोण असा प्रश्न विचारला तेव्हां त्यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू असे उत्तर दिले ( नेहरुंच्या नावावर अनेक प्रकल्प आहेत, त्यात वाद्च नाही). तेव्हां पवारसाहेबांनी मिश्कील हसत डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे उत्तर देऊन त्या विद्वानांना खजील आणि गप्प केले होते. हे विद्वान दलित होते. खरं म्हणजे बाबासाहेबांची पूर्ण माहिती सर्व भारतियांना नाही
संतकृपादीपक
नित्य समाधान | संतांची संपत्ती | स्वस्थ चित्त वृत्ती | सर्व काळ ||
अहर्निश वृत्ती | वसे भगवंती | कसलीच खंती | उरेचिना ||
वैराग्य विवेक | बाणतो नेमक | सहजचि एक | योग घडे ||
असोनी संसारी | विरक्त अंतरी | नित्य सदाचारी | धन्य जगी ||
संत सहवास | घडता सहज | जीवनाचे काज | कळो येई ||
शांति लाभतसे | भाविका अपूर्व | वासना त्या सर्व | नष्ट होती ||
प्रेम जडतसे | सहज साधनी | अलिप्त राहूनी | करी कर्मे ||
उद्धरुन ऐसे | जाताच साधक | विशेष हरिख | संता वाटे ||
संतकृपा ऐशी | भाग्याने लाभता | येतसे पूर्तता | जीवनाते ||
नव्या योजना
काढायच्या म्हणून ऊगीच
नव्या योजना काढू नयेत
नव्या योजनांनी जनतेच्या
मनात असंतोष वाढू नयेत
जनतेची करण्या लुबाडणूक
नव्या योजनेचा फतवा नसावा
योजना या जनकल्याणी हव्या
कर वसुलीचा बटवा नसावा
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
भावना सादर करताना
कधी कधी जोडतात
कधी कधी मोडतात
या मनातील भावना
मना-मनात दौडतात
जिथे भावनेला आदर
तिथेच कराव्या सादर
जिथे होत नाही कदर
तिथे पसरू नये पदर
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
ह्या सगळ्या बातम्या ऐकून जरा नाराजच झाले मी.
म्हणाले त्यांना,
'देवा , न्यायप्रीय म्हणून तुमची ख्याती.
तुमच्यावर किती विश्वास आमचा!
आणि तुमच्या देवळातही , केवळ शारिरीक फरकावरून तुम्ही आम्हाला प्रवेश नाकारावा!'
त्यावर ते हसले, म्हणाले,
'बेटा, तुला खरच असं वाटतय का की प्रवेश नाकारणारा मीच आहे?
असं असतं तर पेटवल का असतं मी हे रान माझ्याच ठेकेदारांविरुद्ध?
मी न्यायाची खात्री देतो, पण संघर्षाशिवाय तो मिळावा/मिळेलच, असं कुठे आहे?
असं स्वत्वाकरता लढताना माणूस जसा झळाळून निघतो ना, तीच माझी खरी कृपा असते.
न्याय मग आपसूकच पदरात पडतो'.
परंपरेची फारशी काळजी मी आताशा करत नाही.
लालची लोक
जोपर्यंत विरोध आहे
तोपर्यंत विरोध करतात
एकदा विरोध मावळता
क्षणात रंगही बदलतात
जिथे स्वार्थ वाटत नाही
तिथे हे लोक थपकतात
जिथे मलिदा दिसेल तिथे
नंबर मारण्या टपकतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
कर्जातलं जीणं
गरजा भागत नाहीत
भागवाव्या लागतात
सुखी मनाच्या आशा
जागवाव्या लागतात
डोईवरती कर्ज घेऊन
दिवस ढकलले जातात
जगता-जगता माणसं
सहज पेकाळले जातात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
सोशियल मिडीयात
सोशियल मिडीया वापरणं
जणू कोंडी भासत होती
जेव्हा व्यक्ती स्वातंत्र्याला
कायद्याची गदा ढासत होती
आता मात्र आय.टी. अॅक्ट
स्वातंत्र्यापुढे नमला आहे
सुप्रिम कोर्ट निर्देशामुळे
६६ (अ) हा शमला आहे
हि श्रेया सिंघालची जीत मात्र
आनंद तर नेटकर्यांचा आहे
तरी मिडीयात विवेकी वागणं
जिम्मा मात्र सार्यांचा आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३