लिनक्स व मुक्तस्त्रोत - गैरमसजांचे स्पष्टीकरण आणि वा.वि.प्र - वारंवार विचारले जाणा-या प्रश्नांची उत्तरे.
आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की लिनक्स ही अॅपल मॅक आणि मायक्रोसॉफ्ट विंडोजप्रमाणेच एक संगणक चालवण्याची प्रणाली आहे. या प्रणालीबद्दलच्या अनेक गैरसमजांमुळे सामान्य माणुन आजही या पासुन दुर राहणेच पसंत करतो. या लेखात लिनक्स चा खरा हेतु व त्या बद्दलचे गैरसमज यांबाबत शक्य ती माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
आपल्या योजना
प्रत्येक योजने मधील
आहेत ठरलेले कडवे
कुणी करतात सक्ती
कुणी लावतात आडवे
कोण राजकारण करते
सामान्यांनाही कळते
जनतेचे हित देखील
या राड्यांनी बारगळते
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
जहाजांचा संगम
अहोय, हॅलो, नमस्ते म्हणत भारतीय नौदलाने विशाखापट्टणम येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय ताफा निरीक्षणासाठी जगभरातून आलेल्या सर्वांचे स्वागत - शुभंकर डॉल्फीन
संविधानाच्या आश्रयाने
संविधान हे या देशाच्या
स्वातंत्र्याची हो शान
होत राहील गौरव सदा
याचे गातोया गुनगाण
दिधली सत्ता प्रजे हाती
वाढला आमचा रूबाब
संविधानाच्या आश्रयाने
ही प्रजा रहाते सुखात
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
निशाणा
कधी-कधी हूकून-चुकून
तर मूद्दामहून कधी-कधी
साधताना निशाणा हल्ली
कुणी असतात धुंदीमधी
कुणी कुठून कसा केला
तर्क-वितर्क हेरला जातो
अप्रत्यक्ष केला वारही
निशाणेबाज ठरला जातो
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
वास्तव विश्वास घातकींचे
वरून गोड बोलुन कधी
करतात गनिमी कावा
त्यांच्या गोड शब्दांतही
असतोच कडवट डावा
जपावे जरा,सदा त्यांच्या
अविश्वास असतो भेटीत
खांद्यावरती ठेऊन हात
खुपसतात खंजीर पाठीत
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
राजकीय विरोध
जिथे संधी मिळेल तिथे
एकमेकांस भिडले जातात
सत्ताधार्यांना विरोधक
पावलो-पावली नडले जातात
मात्र सुत्र जुळून आले तर
ऊलटवारे फिरू लागतात
सत्ताधार्यांची पाठराखण
विरोधकही करू शकतात
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
गेल्या आठवड्यात माझ्या नातवाचं बोर - न्हाण केलं. जरा वेगळ्या पद्धतीनी.
आपल्या बाळांचे आपण निरनिराळे कार्यक्रम करतो त्यांबद्दल थोडंसं. त्यांना उत्सवमूर्ती म्हणायचं खरं, पण त्यांना त्यात अजिबात रस नसतो. कौतुक आपल्यालाच असतं आणि असावं देखील. आपण आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या उपस्थितीत ते साजरे करतो कारण आपल्याला आपला आनंद त्यांच्याबरोबर वाटण्याची इच्छा असते आणि ती सफलही होते. मात्र पाहुण्यांच्या दृष्टीनी हा अनुभव काही एकमेवाद्वितीय (unique) नसतो.
सणांचे डिजीटायझेशन
मोबाईल टू मोबाईल
घेता येतो-देता येतो
संक्रातीचा तिळ-गूळ
मनभरून पाहता येतो
रिती परंपरा वरतीही
आधुनिकतेचे जाळे आहेत
अन् सण-वारही हल्ली
जणू डिजीटल झाले आहेत
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
माफी चुकी
वादग्रस्त वक्तव्य
जबर गाजतात
वादग्रस्तांच्याच
खबर माजतात
घडल्या चुकांची
मागतात माफी
माफी मागूनही
करतात चुकी
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३